आयुषात कधी कधी अचानक आपल्याला अनोळखी असे कोणीतरी सहप्रवासी म्हणुन भेटते.आणि हा सहप्रवास चालू होतो तशी ओळख देखिल वाढत जाते. व ध्यनी मनी नसताना अत्तापर्यंत वेगवेगळे असलेल्या दोन जीवनगाण्याचे सूर जुळू लागतात. कालांतराने या ओळखीचे रुपांतर दृढ स्नेहाच्या मैत्रीत होते. मग रोजच्या व्यवाहारात आपण एकमेकांची सुख दु:खे वाटून घेऊ लागतो. अडीअडचणीत एकमेकाला मदतीचा हात देऊ करतो. आणि हळुहळू या क्षणमात्र प्रवासाची अविट गोडी वाढत जाते. ओळखीच्या झालेल्या त्या अनोळखीचा प्रवास अता नेहमीच हवा हवासा वाटू लागतो. दोघांतील कुणाच्यातरी अंधारलेल्या आयुष्यात कधी न्हवे ते टिपूर चांदणे उगवून येते. रोज रुसणारे ऋतू आज हसणारी फ़ूले घेऊन येतात आणि सारं आयुष्यच कसं बहरून जात. परंतू आपल्या आसुयेनं बरबटलेल्या नियतीला नेमकं हेच नको असतं. कोणतही नातं कितीही दृढ झालं तरी आपलं वैयक्तिक, वेगळं, स्वत:च असं एक जग असत की, ज्यामध्ये आशा काही गोष्टी असतात की त्या आपण इतर कोणालाही सांगू शकत नाही. आणि ज्या कोणाला खरेच सांगायचे असते ती व्यक्ती आणि सांगण्याची वेळ नियती कधीच जुळू देत नाही. मनात तर खुप काही गजबजलेलं असतं. आत खोल कुठेतरी एक अनावर भावकल्लोळ माजलेला असतो. आणि नेमका याच वेळी सहप्रवासही संपलेला असतो. अत्तापर्यंत आपल्याच नकळत मनात घर करून बसलेलं कोणीतरी जायला निघतं. त्याला हसर्या चेहनं निरोप द्यायची वेळ येते. पण हसनंच कुठे हरपलेलं असतं. आणि निरोपाच्या क्षणी हे मन मोकळ करणं केवळ अशक्य असतं. अता वेळ निघून गेल्यावर बोलण्यात ही काही अर्थ नसतो.
मन कसं अगदी सैरभैर होतं. आपण भानावर येण्याधीच, जाणारा तो आपल्या वाटेने चार पावले पुढे निघूनही गेलेला असतो. आपण शिताफ़ीने चेहर्यावर हसू आणत एक हात उंचावून निरोप देऊ लागतो. पण व्याकूळलेल्या मनात मात्र विरहाचे थेंब पागोळ्याप्रमाणे ठिबकत असतात.......
मेरी बात रही मेरे मन में,
कुच्छ केहेना सकी उलझन में ।
मेरे सपने अधूरे, हुये नही पुरे,
आग लगी जीवन में ।
मेरी बात रही मेरे मन में........
ओ रसीयॉं मन बसीयॉं,
नसनसमें हो तुम ही समायें
मेरे नयना करे बैना,
मेरा दर्द ना तुम सुन पायें ।
जिया मोरा प्यासा रहा सावन में ।
मेरी बात रही मेरे मन में........
कुच्छ केहेते, कुच्छ सुनते,
क्युं चले गये दिल को मसल के?
मेरी दुनिया हुइ सूनी,
बुझा आस का दिपक जल के
छाय रे अन्धेर मेरि अखियन में
मेरी बात रही मेरे मन में................
... शकील बदायुनीचे शब्द, आशाचा दर्द भरा आवाज आणि हेमंत कुमार यांच हृद्द करणारं संगीत.(चित्रपट- साहब बिवी और गुलाम-गुरुदत्त)
या गाण्याला त्याच्या आशया इतकाच वहिदाचा भावव्याकूळ चेहरा लाभला आहे. गाण्याचा संवेदनशील कान असणार्या प्रत्यकालाच हे गाणे ओतप्रोत आनंद देऊन जाते. इथे एका विरहानं उसवलेल्या मनाच्या कितीतरी आवस्था चित्रमयपणेच रेखाटल्या आहेत. शेवटी असाह्य होऊन ती प्रेयसी म्हणते....
तुम आओं.. की, न आओं
पिया याद तुम्हारी मेरे संग है ।
तुम्हे कैसे..., ये बताऊ
मेरे प्रीत का निराला इक रंग है।
... काहीतरी कायमच हरवून गेलं आहे. आणि येणार्या भविष्याचा प्रत्येक दिवस केवळ आठवणीवरच जगायचा आहे. किती अवघड असतं हे जगणं, नाही का?
फारच छान विरह भावना चांगलीच
फारच छान
विरह भावना चांगलीच व्यक्त केली आहे
छान आहे ललित
छान आहे ललित
वाह्........सुरेख्..........म
वाह्........सुरेख्..........मस्त लिहीलेत.......
मस्त लिहील्येय.. मेरी बात रही
मस्त लिहील्येय.. मेरी बात रही मेरे दिलमे... माझ एक आवडत गाण.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
छानच रे . आवडले हे ललित
छानच रे .
आवडले हे ललित
छान! सुन्दर लिखाण!!
छान! सुन्दर लिखाण!!
वा! छान लिहिलयं खुप...
वा! छान लिहिलयं खुप...
वैभू - बिनधास्त - मधवी --
वैभू - बिनधास्त - मधवी -- तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार.
सुरेख!!!!!
सुरेख!!!!!