तो घरात येताच नोकरावर ओरडला,
"ए, बघतोस काय माझे बूट काढ"
पत्नी तिथे येऊन विचारती झाली,
"कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जाता, की तुमचे बूट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?"
मोठ्याने हसत, उर्मटपणे तो म्हणाला,
"हे जाणून घेण्याची गरज तुला काय? माझ्या मोठ्या पदामुळे, आलेली सत्ता, संपत्ती हे सगळे तू उपभोगायचे आणि आनंदी रहायचे..."
ताड ताड पाऊलं टाकत तो आपल्या खोलीत निघून गेला...
नोकराला त्याच्या बाईसाहेबांची विमनस्क स्थिती पाहवली नाही, तो खालमानेने उत्तरला,
"बाई,
लोभ, माया, व्यसनं, मत्सर, राग, वासना, ह्या सम्द्याचा चा तो रंगबेरंगी च्चिख्खल आहे....
आलोच म्या ह्यो अहंकाराचे बुट सोच्छ करुन, उद्या पुन्यांदा त्यास्नी घालायला लागतील"
बाई लगबगीने पुढे येत म्हणाली,
"त्यापेक्षा घराबाहेर फेकून दे हे बूट, सर्व समस्यांचे हेच कारण आहे कळल्यावर क्षणाभरही ते घरात नकोत, निदान त्यानंतर, सगळे काही असूनही, नसलेले 'सौख्य' आपल्या पावलानं चालत येईल घरी..."
.
.
मला कळलीच नाही ग
मला कळलीच नाही ग
हम्म, रीया!
हम्म, रीया!
लेख अन कविता यात काही फरक
लेख अन कविता यात काही फरक दिसत नाहीये
कमी शब्दात चांगला "message "
कमी शब्दात चांगला "message "
वैभव, अजूनतरी कवितेत दुहेरी
वैभव,
अजूनतरी कवितेत दुहेरी अवतरण घालून संवाद यायचेत, म्हणून ह्याला तू लेख समजून घे!
धन्स रतन!
धन्स रतन!
निदान त्यानंतर, सगळे काही
निदान त्यानंतर, सगळे काही असूनही, नसलेले 'सौख्य' आपल्या पावलानं चालत येईल घरी..." .>>>>
आवडले!
बाग्ज, मान गये ! अगं तु आहेस
बाग्ज, मान गये ! अगं तु आहेस केवढीशी आणि केवढे गहन विचार करतेस गं. हुशार आहे मुलगी !
आवडलं. फारच छान लिहिलं आहेस. अहंकार टाकुन दिल्यावर आलेलं सौख्य ! ही शेवटची ओळ तर मस्तच.
हे तुम्हीच लिहिलं आहेत का?
हे तुम्हीच लिहिलं आहेत का?
हो बेफिकीर, जिब्रान कथांचा
हो बेफिकीर,
जिब्रान कथांचा अनुवाद वाचून झाल्यानंतर झालेला हा साईड इफेक्ट आहे.
जिब्रान कथांचा अनुवाद वाचून
जिब्रान कथांचा अनुवाद वाचून झाल्यानंतर झालेला हा साईड इफेक्ट आहे.
<<<
मी तेच लिहिणार होतो की हा अनुवाद आहे की काय असे! कारण हे वाचून झेन कथा आठवल्या. मग त्यावरच्या चर्चा, तक्रारी, मग झेन कथांना तत्वज्ञान ही कॅटेगरी प्रदान केली जाणे हे सगळेच आठवले
(साईड इफेक्ट कशाला वापरताय पण? ओरिजिनल इफेक्टच व्यवस्थित असताना? )
कारण हे वाचून झेन कथा
कारण हे वाचून झेन कथा आठवल्या. मग त्यावरच्या चर्चा, तक्रारी, मग झेन कथांना तत्वज्ञान ही कॅटेगरी प्रदान केली जाणे हे सगळेच आठवले
>> मी ह्या सगळ्यांत नव्हते... म्हणून काहीच माहिती नाही.
हा अनुवाद नाही.. हे सुचलेले लिहीले आहे
साईड इफेक्ट ह्यासाठी म्हणाले, की माझा नेहमीच्या लिखाणापेक्षा वेगळंच काहीतरी सुचलंय, लिहीलय... आणि ते स्पेसिफीकली त्या जिब्रान कथा वाचल्यानंतरच सुचलंय...
वेगळे नक्कीच आहे
वेगळे नक्कीच आहे
कसं काय सुचतं बागे तुला ? कमी
कसं काय सुचतं बागे तुला ?
कमी शब्दात खूप...
वर्षुतै +१