अहंकार...

Submitted by बागेश्री on 10 August, 2012 - 08:04

तो घरात येताच नोकरावर ओरडला,
"ए, बघतोस काय माझे बूट काढ"

पत्नी तिथे येऊन विचारती झाली,
"कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जाता, की तुमचे बूट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?"

मोठ्याने हसत, उर्मटपणे तो म्हणाला,
"हे जाणून घेण्याची गरज तुला काय? माझ्या मोठ्या पदामुळे, आलेली सत्ता, संपत्ती हे सगळे तू उपभोगायचे आणि आनंदी रहायचे..."
ताड ताड पाऊलं टाकत तो आपल्या खोलीत निघून गेला...

नोकराला त्याच्या बाईसाहेबांची विमनस्क स्थिती पाहवली नाही, तो खालमानेने उत्तरला,
"बाई,
लोभ, माया, व्यसनं, मत्सर, राग, वासना, ह्या सम्द्याचा चा तो रंगबेरंगी च्चिख्खल आहे....
आलोच म्या ह्यो अहंकाराचे बुट सोच्छ करुन, उद्या पुन्यांदा त्यास्नी घालायला लागतील"

बाई लगबगीने पुढे येत म्हणाली,
"त्यापेक्षा घराबाहेर फेकून दे हे बूट, सर्व समस्यांचे हेच कारण आहे कळल्यावर क्षणाभरही ते घरात नकोत, निदान त्यानंतर, सगळे काही असूनही, नसलेले 'सौख्य' आपल्या पावलानं चालत येईल घरी..."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

बाग्ज, मान गये ! अगं तु आहेस केवढीशी आणि केवढे गहन विचार करतेस गं. हुशार आहे मुलगी ! Happy

आवडलं. फारच छान लिहिलं आहेस. अहंकार टाकुन दिल्यावर आलेलं सौख्य ! ही शेवटची ओळ तर मस्तच.

जिब्रान कथांचा अनुवाद वाचून झाल्यानंतर झालेला हा साईड इफेक्ट आहे.
<<<

मी तेच लिहिणार होतो की हा अनुवाद आहे की काय असे! कारण हे वाचून झेन कथा आठवल्या. मग त्यावरच्या चर्चा, तक्रारी, मग झेन कथांना तत्वज्ञान ही कॅटेगरी प्रदान केली जाणे हे सगळेच आठवले

(साईड इफेक्ट कशाला वापरताय पण? ओरिजिनल इफेक्टच व्यवस्थित असताना? ) Uhoh

कारण हे वाचून झेन कथा आठवल्या. मग त्यावरच्या चर्चा, तक्रारी, मग झेन कथांना तत्वज्ञान ही कॅटेगरी प्रदान केली जाणे हे सगळेच आठवले
>> मी ह्या सगळ्यांत नव्हते... म्हणून काहीच माहिती नाही.

हा अनुवाद नाही.. हे सुचलेले लिहीले आहे

साईड इफेक्ट ह्यासाठी म्हणाले, की माझा नेहमीच्या लिखाणापेक्षा वेगळंच काहीतरी सुचलंय, लिहीलय... आणि ते स्पेसिफीकली त्या जिब्रान कथा वाचल्यानंतरच सुचलंय...