माझी बाळी :)

Submitted by शेळी on 8 August, 2012 - 13:01

कलिंदनंदिनी वृत्तातली पहिलीच बाल- गझल.... माझ्या बाळासाठी ... Happy

तुझे लहान ओठ का खट्याळ होत फाकती
बघून आज स्तब्ध मी तुझ्या नव्या करामती

दिव्यादिव्यात पेटली कितीतरी निरांजने
शशी रवी तुझ्यासमोर रोज होत आरती

तुला दिलाय जन्म मी कि तू मला , न आकळे
तुझ्यासवे मलाच बाल्य लाभले शरारती

कणाकणात जाणवे तुझाच स्पर्श रेशमी
चिऊ मन्या तुझ्याचभोवती हसून नाचती

क्षणोक्षणी चितार तू धुळाक्षरे नवीनवी
मुखात कोकिळा पदात पैंजणे निनादती

या वृत्तात एकंदरच अनुप्रास मनसोक्त वापरता येतो असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.
एकेका शेरात एकेक मस्त कल्पना ...............जगावेगळी !!

मस्त वृत्तनिवड
उत्तम शब्दसान्गड
छान शेळीताई छान !!

खूप आवडली रचना .........भावूक करून गेली अगदी!!

बादवे : शेळीच्या बाळाला काय म्हणतात ?????

धन्स इब्लिसराव !!
_______________________

तुला दिला गं जन्म का मलाच तू न आकळे
तुझ्यासवे मलाच बाल्य लाभले शरारती>>>>>

यात जरा तान्त्रिक त्रुटी आसावी अशी शन्का आहे

तुला दिलाय जन्म मी कि मला तू न आकळे>>>>>>>>>>>>>>>असे केल्यास जमेल बहुधा
(गं = अशा प्रकारे दिलेल्या अनुस्वारावेळी त्या अक्षराच्या २ मात्रा धरतात असा माझा अनुभव आहे )

पण असो ; हाच शेर मला सर्वात जास्त आवडलाय !!

चिऊ मन्या तुझ्याचभोवती हसून नाचती>>>ही ओळही भन्नाट !!

वैवकु, शेळी ते असे करावे लागेल..
तुला दिलाय जन्म मी कि तू मला , न आकळे

तरच वृत्तात बसेल..( आगाऊपणाबद्दल क्षमस्व)

उत्तम काव्य.. फार चांगली पकड आहे हो तुमची शब्दांवर.
वृत्त खूप नादमय आहे आणि त्याचे नावही सुरेख.
अनुप्रासाला खरंच योग्य आहे.
मला वाटतं हे वृत्त जुन्या संस्कृत स्तोत्रांसाठी वापरले गेले असावे. अशा मीटरमधली काही तमिळ ( कार्नेटिक शैलीतील) गायकांची संस्कृत स्तोत्रे ऐकल्याचे आठवतेय.
लिहीत रहा.

क्षणोक्षणी चितार तू धुळाक्षरे नवीनवी
मुखात कोकिळा पदात पैंजणे निनादती
<<<

छान!

कवितेच्या स्वरुपाची गझलतंत्रातील लाघवी बाळरचना आहे

कलिंदनंदिनी नावाचे वृत्त आहे हे!

(२१८८९ की काहीतरीमध्ये मी) म्हंटल्याप्रमाणे अनेक वृत्तांना स्वतःची वृत्ती असल्यासारखे जाणवते. त्यातील कलिंदनंदिनी हे अतिशय मोहक, तरल व (सहसा) प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी सुयोग्य असल्याचे जाणवत राहते. जसे आनंदकंद हे सहसा स्पष्ट, रोखठोक व सामाजिक अंग असल्यासारखे जाणवते तसेच. (अर्थात, एकेका वृतात पारंपारीकरीत्या विशिष्ट प्रकारच्या रचना अधिक झाल्यानेही तसे होत असेल. पण होते खरे. कलिंदनंदिनी हे नृत्यासाठीही सुयोग्य असल्याचे जाणवते.)

===========

अवांतर - ही रचना माझ्या 'करून पाहुया पुन्हा जगायच्या उचापती' या जमीनीतील झालेली आहे. माझी रचना आठवली म्हणून त्यातील चार पाच शेर सहज आस्वादायला द्यायचा मोह होत आहे.

करून पाहुया पुन्हा जगायच्या उचापती
कधी इथे खुशामती कधी तिथे खुशामती

प्रियेस आणि जिंदगीस फक्त ऐकवायच्या
हिला तिच्या कुरापती तिला हिच्या कुरापती

समोर जो दिसेल तो प्रमेय मांडतो नवे
जणू उभाच मी सदैव घ्यायला मुलाखती

बरेच देव पूजले बरेच संत पाळले
कधीच जीवनात ना घडायच्या करामती

रदीफ 'बेफिकीर' होत काफिया बनायची
तरी न जीवनात भंगवायचो अलामती

-'बेफिकीर'!

शेळीताईंना व त्यांच्या कोकराला अनेक अनेक शुभेच्छा

Happy

व्यासोच्छीष्टम जगत सर्वम ..... व्यासानी सगळे जग उष्टे करुन ठेवले आहे.

बेफिकिर उच्छिष्टम कवाफी सर्वम ... बेफिकिरानी सगळ्या कवाफी उष्ट्या करुन ठेवल्या आहेत. Happy

शेळीताई अनेक दिवसापासून मी मनातल्यामनात हे वाक्य म्हणत असे
पण ते जरा असे होते

बेफ्योच्छिष्टं गझल् सर्वम् !

-बेफीजिन्नी सर्व गझल(विधा) उष्टी करून ठेवली आहे

अगदी माझा अन् तुमचा खयाल टकराया है बघा !!
धन्यवाद या वक्यासाठी (उक्ती)

_/\_

छान!
<तुला दिलाय जन्म मी कि तू मला , न आकळे
तुझ्यासवे मलाच बाल्य लाभले शरारती >> हा शेर जास्ती आवडला Happy