Submitted by पुरंदरे शशांक on 6 June, 2011 - 12:33
थेंबाथेंबातून आला
आला पाऊस कोवळा
चहूबाजूंनी धावला
मेघ सावळा सावळा
थेंबाथेंबाची ही साद
पाखरांच्या कंठी येई
स्वर आलाप सावळे
रानभरी मुक्त होई
थेंबाथेंबांचे हे गाणे
गाता गाता थरथरे
एका सावळ्या नादाने
आसमंत लुब्ध सारे
थेंब थेंब येता रानी
रत्न मोती झळाळती
पाचू सौंदर्य सावळे
अलंकार मुक्त होती
थेंबाथेंबांची कहाणी
नित्य सफळ संपूर्ण
सावळ्याच्या अंगस्पर्शी
झाली झाली परिपूर्ण
थेंबाथेंबांनीच केला
गुंता मोकळा कळेना
हिरवे का रान सारे
सावळे का आकळेना
सावळी चैतन्यकळा १ : http://www.maayboli.com/node/22004
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
स्वर आलाप सावळे>>>
स्वर आलाप सावळे>>> छानच!
संदीप खरेंच 'कसा सावळा रंग होतो मनाचा' आठवलं.
कविता अतिशय सुरेख!!
"थेंबाथेंबांचे हे गाणे गाता
"थेंबाथेंबांचे हे गाणे
गाता गाता थरथरे
एका सावळ्या नादाने
आसमंत लुब्ध सारे "
..... छान ..... अष्टाक्षरी चांगलीच जमलेय.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख, सुरेल....
सुरेख, सुरेल....
थेंबाथेंबांनीच केला गुंता
थेंबाथेंबांनीच केला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुंता मोकळा कळेना
हिरवे का रान सारे
सावळे का आकळेना >>>>>>
आवडली
सगळे शब्दथेंब आनंदाने चिंब
सगळे शब्दथेंब आनंदाने चिंब करणारे
प्रत्येक चरणाची सुरूवात थेंबाने करण्याचा यशस्वी प्रयास...अभिनंदन्!!!
पु.ले.शु
मस्त ! संपूर्ण कविता आवडली!
मस्त ! संपूर्ण कविता आवडली!
पुन्हा एकदा थेंबांचा सोहळा
पुन्हा एकदा थेंबांचा सोहळा सुरु झालाय....
थेंबाथेंबांचे हे गाणे गाता
थेंबाथेंबांचे हे गाणे
गाता गाता थरथरे
एका सावळ्या नादाने
आसमंत लुब्ध सारे
-------------------- खुप छान............ खर म्हणजे सगळीच कविता मस्त आहे.
तुमच्या या सुंदर कवितेला तसेच
तुमच्या या सुंदर कवितेला तसेच सुंदर संगीत व आवाज मिळाला तर एक सुंदर कलाकृती घडेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! यशस्विनी +१
वा !
यशस्विनी +१
हीसुद्धा मनमोहक .. आता ३ ची
हीसुद्धा मनमोहक .. आता ३ ची प्रतीक्षा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनापासून आभार्स
सर्वांचे मनापासून आभार्स .......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच छान लिहिलय
फारच छान लिहिलय नेहमीप्रमाणेच. यशस्विनी च्या प्रतिसादाला अनुमोदन. सुरेखच.
सुरेख कविता आणि सुरेलही होऊ
सुरेख कविता आणि सुरेलही होऊ शकते.
यशस्विनी +१
सुंदर !
सुंदर !