चंद्रस्वप्न एकले

Submitted by भारती.. on 5 August, 2012 - 04:43

चंद्रस्वप्न एकले

जरी इथून जायचे पुनश्च आणखी कुठे
मनात घोळवेन मी सकंप गीत येथले

जनातला मनातला किती अपार गलबला
निजेत जागवेन मी चंद्रस्वप्न एकले

मी हिशेब मांडला समग्र कागदावरी
आसवात वाहत्या आकडे विसावले

वाट डोंगरातली नी लाट सागरातली
साद दे दूरून जरी शहर गात्री बिंबले

सधन मेघमालिका उदार आज वर्षू दे
दिठीत गोंदवेन मी सतंद्र वृक्ष हर्षले ..

http://www.youtube.com/watch?v=DNUB9leN9TA&feature=plcp

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.. ..अफलातून Happy भारतीजी!.. आख्खी कविता इतकी आवडली की काळजात कुठेतरी जपून ठेवावीशी वाटली.

.... आज खुप दिवसातून तुम्ही माझ्यासारख्या एका भुकेलेल्या वाचकाला भरभरून आनंद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

आपल्या या कवितेत ग्रेस यांच्या 'चंद्रमाधवीच्या प्रदेशामधील' मातीचा सुगंध आहे म्हणून ही विशेष आवडली.

अभिनंदन. Happy

वा ऑर्फी मस्त प्रतिसाद ......

भारतीताई : मस्त कविता.
अप्रतीम गझल होवू शकली असती नक्कीच !!
काही काही ठिकाणीच वृत्त गडबडतेय बस्...बाकी मस्त

कवाफी एकदम नवीन अन् टवटवीतय.

खूप खूप छान

ऑर्फिअस..कुठे होता ? तुमचा प्रतिसाद वाचून खूप आनंद वाटला.माझ्यावर ग्रेसांचा संस्कार असेलही..
ही माझी एकमेव गझलसदृश रचना..काहीही न ठरवता उतरलेली..
वैभव,आभार नेहेमीप्रमाणे मनःपूर्वक केलेल्या विश्लेषणाबद्दल.गझलचे व्याकरण तुम्हालाच ठाऊक :)) कधीतरी नकीच समजून घेईन/ घ्यावे लागेल :)) तुम्हा सर्वांशी गाठ आहे ना..

आवडली भारतीताई. विशेषतः चंद्रस्वप्न हा शब्द पण खूप सुरेख आहे. वहीत लिहून घेणार तुमची म्हणून. Happy

"जनातला मनातला किती अपार गलबला
निजेत जागवेन मी चंद्रस्वप्न एकले " >> पोहोचलेच आत... माझ्या मनातला अर्थ जुळला इथे... आवडलीच!

(अजून यू ट्यूब वर पाहिलेली नाही)

पण कवितेतील पहिली द्विपदी मला आवडली.

(कलिंदनंदिनी नीट पाळायला हवे होते असे वाटून गेले. )

सर्वांचे खूपखूप आभार..या कवितेचं गाणं करण्याचं श्रेय माझं नाही.चंद्रस्वप्न ही ध्वनीफीत माझ्या मित्रमैत्रिणींनी मला दिलेली गिफ्ट आहे.
जागेपणीचं स्वप्न. असो.
बेफिकीर,
'(कलिंदनंदिनी नीट पाळायला हवे होते असे वाटून गेले. )' म्हणजे काय? जरा समजून सांगाल काय? मी खरोखरच केवळ उत्स्फूर्तपणे लिहिते,त्याबद्दलचा माझा अवेअरनेस वाढेल.

कवितेतील पहिली द्विपदी एका विशिष्ट अक्षरगणवृत्तात आहे. (त्या वृत्ताचे नांव कलिंदनंदिनी). ते वृत्त बाकी कवितेत पाळले गेलेले नाही. ('कवितेसाठी' ही काही फार मोठी चिंतेची बाब नाहीच, पण एवीतेवी पहिली द्विपदी स्वच्छ वृत्तात आहेच म्हणून इतकेच म्हणालो की) इतरही कवितेत ते पाळले गेले असते तर मजा अधिक आली असती.

छानच !

कवितेतला आशय मस्त आहे.
"मी हिशेब मांडला समग्र कागदावरी
आसवात वाहत्या आकडे विसावले "
या ओळी सहज-साध्या शब्दांमुळे अधिक आवडल्या, प्रभावी वाटल्या.

बाकीच्या काही ओळींमधे शब्दांचं पारडं आशयापेक्षा
जड झालंय की काय असं वाटलं. अर्थात हे वैम. कृगैन.

बेफिकीर यांच्या वृत्ताबाबतच्या मताशी सहमत.

मुक्तेश्वरजी,उल्हासजी, आभार
गंमत वाटली उल्हासजी, नेमकी हीच द्विपदी गाण्यातून वगळलीय संगीतकाराने.
खरेय, ही वैयक्तिक मतमतांतरे.

Back to top