पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणिक घट्ट भिजवली कि भाजलेल्या पोळीत पाण्याचा अंश रहाणार नाही व पोळी कोरडी होईल..मऊसर भिजवुन वरुन तेलाचा हात फिरवावा..[फुलके असतील तर कणकेत तेल -मोहन- घालु नये]तव्यावर पोळी टाकण्याआधी जास्तीची पिठी काढुन टाकावी..१/२ दाच कमी पिठी लावुन पोळी लाटावी..कोंबट पोळ्या एकावर एक ठेवाव्या..प्रत्येक पोळी पूर्ण थंड होईपर्यत वाळवु नये..

कदाचित जमेल पण प्रामाणिकपणे सांगायच झाल तर मला इतर उद्योग सांभाळत रोजच्या पोळ्या जरा महान काम वाटतय. कामाचा उरक वाढवला पाहिजे. >>>>> धनश्री, नको गं स्वतःवर अन्याव करूस...पोळ्या आण...इट्स ओके...तुझा दिवस गडबडीचा असेल तर आवडतं ते कर दहा मिनिटं...पोळ्या न येणं, न उरकणं हे ओके आहे गं.....

धनश्री
अगदी रोज ताज्याच जमत नसतील तर वेळ असेल तेंव्हा थोड्या जास्तीच्या करून ठेवायला जमेल का ?
साधे फुलके किंवा पोळ्या पूर्ण गार करून एका वेळी लागतील इतक्याच , पेपर टावेल किंवा सुती पातळ कपड्यात गुंडाळून घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रीज मधे ठेवाव्या. किचन पेपर टावेल वर दोन थेंब पाणी शिंपडून त्यावर फुलके ठेवून २०-२५ सेकंद माय्क्रोवेव्ह करावे, मस्त गरम पोळ्या / फुलके तयार .
अमेरिकेतल्या फ्रीजमधे २-३ दिवस आरामात टिकतात पोळ्या.

लालू धन्स!

दुसरी करून पाहीली आहे. चवीला चांगली होते. पण काम जरा किचकट होते बाजरी/ज्वारी लाटताना.

प्रश्णास कारण की ग्लुटेन सोसत नाही Happy

मि ज्या भागात रहाते तिथ्ल्या Indian Store मधे aashirwad aata मिळ्न बन्द झालय, मि दिप आन्लय पन ते तर अगदिच वाइट आहे. त्याचा color पन normal गव्हाच्या पिठा सारखा नाहिय.. खूपच जाडसर आहे. आनि कनिक पन अगदि मैद्या सारखि होते. कुनि दुसर्या company च पिठ use केलय का? आनि घेताना नक्कि बरिकसर आनि चागल पिठ आहे हे कस ओळखाव?
-- सोनु

सुजाता कंपनीची कणीक चांगली असते असा अनेकांचा अनुभव आहे माझ्या शेजारीपाजारी. सुजाता इंडिया. कारण सुजाता चाच एक कॅनडा ब्रॅण्ड पण असतो, आणि तो घेऊ नये अशी माहिती मला समजली. (मी कायम आशीर्वाद वापरते. इतर कंपन्यांचा थेट अनुभव मला नाही)
सुजाता मल्टिग्रेन पण चांगला आहे अशी इथेच कुठेतरी पोस्ट आहे. बहुतेक परदेसाई यांनी लिहिलाय त्यांचा अनुभव.
स्वर्णा ब्रॅण्ड मी एका काकूंना विकत घेताना बघितला, पण कसा आहे ते नाही विचारलं. तोही चांगला असावा. लहान पॅक मिळालं तर थोडंसं वापरून मग तुम्हाला ठरवता येईल.

हो सध्या आशिर्वाद मिळण दुरापास्त झालाय. मला नाही मिळाला यावेळी. म्हणून सुजाता आणलाय. वापरून बघेन आणि इथे सांगेन.

मी नेहमी सुजाताच आणलाय. खुप आवड्तो. मग एकदा सुजाता चा छोटा पॅक मिळणं बंद झालं तेंव्हा,
घाबरत घाबरत आशिर्वाद आणला. तो ही ठीक वाटला Happy आता सुजाता मिळतो म्हणून तो परत सुरु केला.

मध्यंतरी रोटीलँड च्या पोळ्याचे पॅकेट आणले. पण ते काही ठीक झाले नाही. काय चुकले काही कळालं नाही. पण पोळ्या फार चिवट लागल्या आणी त्या पॅकेट वर दाखवतात तसं ट्म्म फुगल्या पण नाहीत. चित्रात पोळी पांढरी शुभ्र दाखवली आहे, ही जरा ब्राऊनिश/ रेडिश कलर ची झाली.

सुजाता आटा आता अमेझॉन वर पण मिळतो.
मोन्टाना फ्लौर चा "prairie गोल्ड" वॉल मार्ट मध्ये मिळतो त्याच्या पण पोळ्या चागल्या होतात.

मला सुजाता ची कणीकच सगळ्यात चांगली वाटते. आशीर्वाद मैदा मिक्स वाटतो.
कणिक भिजवताना त्यात ३/४ चमचे तेलाचे मोहन घालावे म्हणजे पोळ्या मऊ होतात.

छान

अश्विनी होमीओ फार्मसीने ब्रँडेड डायबेटिक्स साठी उपयुक्त आटा बाजारात उपलब्ध केला आहे. भारतातील वयस्कर नातेवाइकांना हवा असल्यास. जरा वेग्ळे वाटते पहिल्यांदा.

शॉप राइट मध्ये आहे.

मऊसूत फुलके होण्यासाठी टिप्स हव्या आहेत.. फुलका जेव्हा थेट विस्तवावर टाकते मी, तेव्हा तो फुगतो वगैरे, पण ज्योत मोठी असल्याने, पटकन जळतोही Sad नंतर जळालेला भाग कडक होतो Sad ज्योत लहान ठेवली, तर फुगत नाही.

फुलका थेट विस्तवावर टाकला, की नक्की काय करावे- जेणेकरून तो जळणारही नाही, फुगेलही आणि मऊही राहील?

फुलका पहिल्यांदा तव्यावर टाकतो ती बाजू अगदी कमी भाजावी. लगेचच उलटवावी. खालची बाजू छान खरपूस भाजावी. म्हनजे वरची बाजू गॅसवर टाकली की फुलका चटकन फुगतो अन लगेच बाजूला घेता येता, मग नाही कदक होणार.
रच्याकने माझा व्हिडिओ पाहिला का?
http://rasanaarati.blogspot.in/ इथे खाली आहे बघा. ( चला तेव्हढीच रिक्षा फिरवता आली Wink )

शिवाय कणिक भिजवल्यावर थोडा वेळ झाकून ठेवावी, नंतर पुन्हा मळून मग फुलके करावेत.
कणिक भिजवताना चमचा भर दही घालावे. फुलका भाजल्यावर त्याला साजूक तुपाचा हात लावावा. यानेही फुलके नरम राहतात.

फुलका भाजताना एकतर गॅसच्या लहान बर्नरवर भाजून बघ.

मी फुलके करताना लहान बर्नरच वापरते. तव्यावर फुलका टाकते त्यावेळी आच मिडियम असते. टाकल्यावर लगेच २०-३० सेकंदामध्ये उलटते. (दुसर्‍या फुलक्याचा पेढा कणकेत घोळवून किंचीत लाटून होतो तोपर्यंत) उलटल्यावर वर येणारी बाजू पूर्ण भाजलेली नसते. नंतर परत ३०-३५ सेकंदांमध्ये तव्यावरून उचलून आचेवर ठेवते आणि आच पूर्ण वाढवते. (हे होईपर्यंत पोळपाटावरचा फुलका जवळपास पूर्ण लाटून झालेला असतो). थोडासा फुगला कि पलटते तोपर्यंत तो पूर्ण फुगतो.

(बर्‍याचदा फुलके बनवायची स्पीड चांगली असेल तर आचेवर डायरेक्ट फुलका भाजतानाच हातातल्या रिकाम्या तव्यावर पोळपाटावरचा फुलका पण टाकून होतो. )

माझीहि पद्धत अल्प्ना प्रमाणेच...पौर्णिमा मी फुलका मोठ्या विस्तवावर टाकला कि फुगला कि लगेच काढते.थोडा भाजलेला असतो (तेवढाहि भाजला नाहि तर कच्चा लागेल) वरुन तुप किंवा तेल लावते त्यामुळे नरम हि राहतात.काहि वेळेला फुगला कि विस्तव कमी करते आणि थोडा भाजु देते हि प्रक्रिया अगदि चार पाच सेकंदाची असते.नाहितर फुलका करपतो.

माझ्या सा.बा.नुसार चपात्या किंवा फुलके झाल्यावर झाकुन ठेवावे नरम राहतात.
आमच्याकडे तेल किंवा तुप कधितरि लावतात एरवि कोरडे फुलके सा.बा.आणि सा.बु. ना लागतात.तरिहि फुलके नरम राहतात

पौर्णिमा, तुला डब्यात न्यायचे असतात का फुलके? चालत असेल तर दोन फुलक्यांच्या मध्ये किंचीत साजून तुप लावून ठेव फुलक्यांना. ड्ब्यात नेताना फॉइलमध्ये पॅक करायचे. मऊ रहातात.
लगेच तासा-दोन तासात खायचे असल्यास तुप लावायची गरज नाही.

कोणाला रोटीमेकरचा अनुभव असल्यास कळविणे. खरेच किती उपयोगी असतो, कोणत्या मेकचा चांगला आहे, इ.

Pages