युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर माझं काही खरं नाहीये. >> खरंच ?? Proud
माझंही साखरपुड्याचं एवढ छान शर्ट होतं क्रीम कलरचं , बायकोनं तिच्या एका ड्रेसबरोबर भिजवलं अन वाया गेलं , ते डाग काढण्यासाठी सर्व काही प्रयत्न करुन झालेत पण डाग काही गेले नाही , जपून ठेवलय तसंच डागासहीत कपाटात Proud
-------------------------------------------------------------------------
लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी : उतरून टाकायला अन 'उतरवायला' Proud

आमच्याकडे म्हणुनच प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे अन वेगवेगळ्या दिवशी धुतले जातात.. एकदा माझ्या सा.बां.नी त्यांच्या पिवळ्या ड्रेस बरोबर माझ्या नवर्‍याची पांढरी लोअर मशिनीत धुतली.. लोअरचा रंग क्रिम झाला होता अगदी बाहेरुन डाय करुन आणल्या..असच त्यांनी एकदा त्याच्या टीशर्टचा पण रंग बदलला, तेव्हापासुन माझा नवरा कोणत्याही बायकी कपड्यांबरोबर स्वतःचे कपडे धुवु देत नाही... त्यापेक्षा स्वतः वीकएंडला धुतो सगळे कपडे.. Proud

आयला ही आयडीया मी सुरवातीलाच वापरायला पाहिजे होती..... कपड्यांचा लोड कमी झाला असता Proud

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

चक्क कूकर मधे शर्ट (कॉटनचा असेल तरच) भिजेल एवढे पाणी घाल, थोडा सर्फ घाल. झाकण लावून चक्क एक शिट्टी काढ. शिट्टी झाली नाही तर पुरेपूर प्रेशर धरलंय याचा अंदाज घेवून गॅस बंद कर. प्रेशर काढून टाकून झाकण उघड. आतला गरम गरम शर्ट गावीने (चिमट्याने) धरुन सिंक मधे टाक व गार पाणी सोड. हातात धरण्याजोगा गार झाला की चांगल्या पाण्यातून खळबळून काढ.

हा सगळा मी जोक सांगत नाहिये. ९०% वेळा डाग ढूंढते रह जाओगे. इतरही हात पुसायचे टॉवेल्स, किचन टॉवेल्स पण आपण मधून मधून काढू शकतो.

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

अश्विनी, तू मला आशेचा अंधूक किरण दाखवला आहेस, त्याबद्दल तुझे अंधूक आभार... झळझळीत आभार मी ९०% त आल्यावर मानेन. Proud

पण एक साम्ग, फक्त सर्फच की घरी वापरतो तो डिटर्जंट चालेल????

कूकरचा हा एक ऑफिशियल उपयोग आहे. कुठलाही डिटर्जंट चालेल.

खरच छान उपाय आहे हा कुकरचा.

दूधाच्या बाटल्या, लहान बाळाची वाटी चमचा वगैरे निर्जंतूक करण्यासाठी पण कूकरचा उपयोग होतो.

सान्डगे, पापड, कुरडया , मी मायक्रोवेव्ह मध्ये तीस सेकन्द ठेवतो. तेलाशिवाय छान होतात.
पापड अगदीच कोरडे असतील तर तेलाचे एक दोन थेम्ब लावून मग मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतो.

असे कोरडे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये ठेवले विषेशतः पापड तर ठिणग्या उडतायत. काय कराव? मायक्रोवेव्ह नीट पुसूनपण घेतला. काही उडाल असेल का म्हणून.

माझा पण एक प्रश्न. दाणे मायक्रो मधे भाजता येतात का? कोणी करत असेल तर कसे करता?

येतात. दाणे मायक्रोवेवेबल भान्ड्यात घालून मायक्रोवेवमधे ठेवायचे आणि मायक्रोवेव चालू करायचा.
अर्च मी कधी ठिणग्या पहिल्या नाही. जास्तवेळ थेवला की पापड काळा होतो. दाणे पण काळे होवू शकतात.

Arch
मायक्रोवेव्ह खराब झाला असेल बहुतेक्..माझा मायक्रोवेव्ह खराब झाल्याचे असेच समजले होते मला:) ...मी पण पापड वगैरे मायक्रोवेव्ह मधेच भाजते. छान भाजले जातात....

दाणे भाजताना एका प्लेट मधे एक लेयर मधे पसरुन ठेवावे. १-२ मिनिटात चांगले भाजुन होतात.

मी तर पापड नेहमीच भाजते. तो सुद्धा कच्चा ठेवून मायक्रोवेव मध्ये. तेल न लावता. पण खाली पेपर टॉवेल ठेवते. पण त्याशिवाय न ठेवून पण कधीच प्रॉबलेम नाही.
शेंगदाणे सुद्धा भाजलेत. त्यासाठी शेंगदाणे मायक्रोवेव बॉउलमध्ये घालून ते बंद करून पॉपकॉर्न चे बटण वापरले तर एकदम ३ मिनीटात खुटखुटीत शेंगदाणे. काही प्रॉबलेम झाला नाही.

मायक्रोवेव मधे मसाला शेंगदाणे फारच सुंदर होतात. अगदी तेलात तळल्या प्रमाणे अरळ होतात.

नविन प्रयोग, नाचणि इडली. तान्दुळ replaced by whole grain nachani..(पिठ नाहि.) १:२ तेच. मस्त लागते.

>>मायक्रोवेव मधे मसाला शेंगदाणे फारच सुंदर होतात. अगदी तेलात तळल्या प्रमाणे अरळ होतात.

कृपया रेसिपि टाकाल ?

वा बरेच काम वाचेल शेंगा गॅसवर भाजायचे.. थँक्स मुलीनो. Happy

माझ्याकडे Cuisinart Coffee Grinder आहे.
त्यात मी चुकुन शेंगदाण्याचा कूट करायचा प्रयत्न केला :(. त्याचा सगळा लगदा तर झालाच पण सगळे तेल निघाले. सगळा कूट बाहेर आलाच नाही. ह्यात फक्त कोरडे मसाले निघतात हे माहित होते तरीही ही चूक झाली.
आता माझा प्रश्न - हे साफ कसे करायचे. गुगल केले तर बहुतेक साईटवर १ वाटी कोरडा तांदुळ ग्राइंड करायला सांगीतला आहे, हे मशिन साफ करायला. यापेक्षा काही वेगळा सल्ला, अनुभवाचे बोल असतील तर सांगा.

.

फुटाणे ( डाळ म्हणतो ती, हरभरा डाळ नव्हे, चिवड्यात घालतो ती ) ग्राइंड केले तर तेलकटपणा जातो.

बोर्नव्हिटा किंवा तत्सम पदार्थात चमचा घालताना तो पूर्ण कोरडा आहे याची काळजी घ्यावी. पाण्याचा अंश जरी त्याला लागला तर त्याचा दगड बनतो

>>>
बोर्नविटा अगर नेस्कॅफे यांचा माझ्याकडे नेहमीच दगड होतो. यावरून हे पदार्थ मुळातच दगडापासून बनवले जातात याबद्दल माझी अगदी खात्री पटलेली आहे

Proud

यावरून हे पदार्थ मुळातच दगडापासून बनवले जातात याबद्दल माझी अगदी खात्री पटलेली आहे>>>smiley36.gif

रुनी, मी कॉफी ग्राईंडर मस्त पैकी साबणाच्या पाण्याने धुतला आहे एकदा तेलकटपणा काढण्यासाठी - सिंकमध्ये उलटा धरून Happy

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

माझ्याकडे एकच ग्राइंडर आहे. तो कॉफीला अन मसाल्यांना आलटून पालटून वापरायची वेळ आली तर मी व्हिनेगरमधे नॅपकिन बुडवून त्याने पुसते. वास जातो बर्‍यापैकी.

शोनू,
याला नुसतेच तेल नाहीये, दाण्याचा थोडा कूट पण अडकलाय तो पण निघायला हवा ना.
गौरी तुझ्याकडे पण http://www.cuisinart.com/catalog/product.php?product_id=306&item_id=415&... हाच ग्रायंडर होता का? मला तो पाण्याने धुतलेला चालतो हे माहित नव्हते.

रुनी, तू एक कच्चा बटाटा ठेचून रस नी लंबू रस टाकून ठेव थोड्या वेळ(२० एक मिनीटे). मस्त बाहेर निघेल चिकटलेला कूट. (केमीकल थिअरी आहे ही, फॅट(शरीरातले) कमी करायचे असेल तर लिंबू नी कच्चा बटाटा रस सकाळी प्यायचा. ह्याच धर्तीवर मी तेलकट मासे तळलेले तवे साफ केलेत/करते. तेव्हा इथे ते बहुधा चालसे वाटतेय. ) Wink

मी आल-लसुन paste करते पण ती fridge मधे टिकत नाहि काय कारण असेल मी पेस्ट करताना salt टाकते.

मनु तुझी कृती कशी चालेल? इथे मिळणार्‍या कॉफी ग्राईंडर मधे ओले काही केले की तो गेलाच कामातुन. माझा एक दाण्याचे कूट करताना मोडला आणि एक बदामाचे कुट करताना. तेव्हापासून मी रीवेल चा वापरते.

Pages