Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2012 - 01:57
बीचवर जाऊ या नं वाळूमधे खेळायला
मज्जा येते कस्ली आई पाण्यातून चालायला
किल्ला करु वाळूमध्ये नाहीतर चिमणीचे घरटे
चला बास चा पाढा तुझा, लाऊ नको तू मधे मधे
इतकी छान नक्षी आई वाळूत या काढतं कोण
पुसून टाकते लाट तरी पुन्हा येते कुठून वर
शंख-शिंपले जमवणार मी छान छान अन् मोठाल्ले
नेताना हे म्हणू नकोस तू, बस इथेच मी घरी चाल्ले
छान छोटे घर बांधू इथेच या वाळूवर
अभ्यास, खेळ, खाणे सगळे इथेच मस्त बीचवर.........
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे गायबली ही कविता ????
कुठे गायबली ही कविता ????
मस्त रे
मस्त रे
हुश्श - कोणाला तरी दिसली
हुश्श - कोणाला तरी दिसली अखेर.....
धन्यवाद रे किरण......
धन्यवाद कसले रे माझ्यासारखाच
धन्यवाद कसले रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्यासारखाच तू ही शोधून वाचणारा एक आहेस
( तुझ्याआडून स्वतःची स्तुती करण्याचा उद्देश आहे )
मस्त!!
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान...
छान...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनापासून आभार.....
सर्वांचे मनापासून आभार.....
शशांक... मस्तय कविता... (अजून
शशांक... मस्तय कविता... (अजून थोडं काम केलं तर अधिक लयीत येईल असं मला वाटतय)
मस्त कविता आणि कल्पना
मस्त कविता आणि कल्पना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानछान.. ही मिस झाली
छानछान.. ही मिस झाली होती..यावेळी मुंबईला आलीय बच्चेकंपनी :))