बीचवर जाऊ या नं...
Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2012 - 01:57
बीचवर जाऊ या नं वाळूमधे खेळायला
मज्जा येते कस्ली आई पाण्यातून चालायला
किल्ला करु वाळूमध्ये नाहीतर चिमणीचे घरटे
चला बास चा पाढा तुझा, लाऊ नको तू मधे मधे
इतकी छान नक्षी आई वाळूत या काढतं कोण
पुसून टाकते लाट तरी पुन्हा येते कुठून वर
शंख-शिंपले जमवणार मी छान छान अन् मोठाल्ले
नेताना हे म्हणू नकोस तू, बस इथेच मी घरी चाल्ले
छान छोटे घर बांधू इथेच या वाळूवर
अभ्यास, खेळ, खाणे सगळे इथेच मस्त बीचवर.........
विषय:
शब्दखुणा: