अनाकलनीय मित्र

Submitted by पुरंदरे शशांक on 28 October, 2010 - 07:23

अनाकलनीय मित्र

पावसाचे एक कधीच कळत नाही
मैत्र जुळूनही अनोळखपण संपत नाही

सौम्य -रौद्र स्वरूपातून अरूपाची ओळख देत नाही
सरसर दरदर कोसळूनही मौन काही सोडत नाही

सप्तरंगी खेळ कधी नजर उचलून पहात नाही
हिरवे लेणे लेववून धरा कवेत घेत नाही

अंगाखांद्यावर हात ठेवतो सखा कधी होत नाही
स्पर्शून जातो मनामनाला आठव कधी ठेवत नाही

विसंवादी सूर याचे ताल मेळ जमत नाही
मल्हाराशी याचे नाते तोडूनही तुटत नाही

भरभरून आला तरी शोष काही संपत नाही
दंवावाटे कधी उतरून नातं कधी तोडत नाही

मनातून पुसायचा म्हटला तरी जात नाही
आंसूवाटे कधी ओघळेल सुख-दु:ख याला नाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाचे एक कधीच कळत नाही
मैत्र जुळुनही अनोळखपण संपत नाही

हे खूप खरे आहे .आवडले !!

नमस्कार "प्रकाश" व "नितीनचंद्र",
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .