Submitted by अवल on 23 July, 2012 - 10:18
माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !
त्याचीच ही रुपे :
१. हे झाडावर झुलणारे
२. घरभर त्याचा सुवास फुलावा म्हणून एक घरात आणले
३. फक्त पुढूनच नव्हे तर मागूनही किती सुंदर दिसते पहा
४. हे बाजूनी
५. आणि हे बरोब्बर समोरून
६. अन त्याच्या गोड वासाने आकर्षित झालेले हे सनबर्ड्स
७. त्यात दोघांची भांडणं झाली. मग त्यातला एक उडून आला मधुमालतीवर
गुलमोहर:
शेअर करा
फोटो सुंदर आहेत, माझ्या
फोटो सुंदर आहेत, माझ्या माहेरी देखील कृष्ण कमळाचे झाड आहे, माझ्या आईबाबांना खुप आवडतात ही फुले, त्यावर फुल उमलले की हमखास काहीतरी चांगली बातमी कळणार असे त्यांना वाटते, खुपदा असे घडल्यामुळे त्यांची पक्की खात्री झाली आहे
तुम्ही सांगितलेली कथाच माझ्या आईने सांगितली आहे.
धन्यवाद वर्षा अन अहो कशाला?
धन्यवाद वर्षा
अन अहो कशाला? अगंच बरं आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>त्यावर फुल उमलले की हमखास काहीतरी चांगली बातमी कळणार< अरेच्च्या हे मला नव्हतं माहिती. हां तसं बरोबर असावं, ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला
छान आहेत. अवल या कूळात, पिंक
छान आहेत.
अवल या कूळात, पिंक लेडी किंवा लॅव्हेंडर लेडी असा नवीन वाण विकसित झालाय, दुरंगी फुले असते ते. नर्सरीवाल्याकडे मागणी केल्यास मिळू शकेल.
व्वा. प्रचि ६ एकदम भन्नाट
व्वा. प्रचि ६ एकदम भन्नाट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहा काय सुंदर! बालपणी हे फुल
अहा काय सुंदर! बालपणी हे फुल सतत एक मित्र म्हणून सोबतील असायचं. ज्याला त्याला ह्या फुलाची गोष्ट सांगायची मला सवयच पडून गेली होती.
वॉव पिंक लेडी काय भारी दिसेल
वॉव पिंक लेडी काय भारी दिसेल नाही, दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांग, धन्यवाद
बी, अगदी अगदी
ही फुलं उमलायला लागली अन
ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला <<<<<<
छान छान , अभिनंदन तुमच्या सॉरी तुझ्या मुलाचे
तुझ्या कृष्णकमळालादेखील आनंद झालेला दिसतोय म्हणुन असे आंनदाने एकदम झोकात फुलले आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! सुंदर फुले आणि छान
अरे वा! सुंदर फुले आणि छान प्रकाशचित्रे. आवडली.
भवताली दश पाकळ्या उमलती, अवतार दहा ते म्हणू |
उकलती शंभर दले जंबू ती, कौरवच की शत, ते गणू ||
मध्ये पांडव पाच ते प्रकटती, गमतसे कीर्ती त्यांची कथू |
लीला परमेश्वरी अशी बहरते, वर त्रिमूर्ती त्याचीच जणू ||
अवल, मस्त फोटो आहेत.ह्याला
अवल, मस्त फोटो आहेत.ह्याला वास असतो मला माहित नव्हते.तुझ्या लेकाचे अभिनंदन!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप मोहक वास असतो ह्याला. एक
खूप मोहक वास असतो ह्याला.
एक आवडीचे फूल.
व्वाह!!! सगळेच फोटो खासच
व्वाह!!! सगळेच फोटो खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोळेकाका, मस्त प्रतिसाद.
मस्तच!!
मस्तच!!
मस्तय ..
मस्तय ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आलेत फोटो ! सनबर्ड
मस्तच आलेत फोटो ! सनबर्ड चेही छान आलेत. मुख्य म्हणजे तुला त्यांना फोटोत पकडता आले, हे विशेष! आमच्या घराजवळ याचे झाड होते, पण ते खुप मोठे म्हणजे जांभळाच्या झाडासारखे होते. तुझ्या टेरेस वर आहे ते असेच मोठे होते का?
सुरेख दिसतय कृष्णकमळ.
सुरेख दिसतय कृष्णकमळ.
अवल माझ्या शाळेत जायच्या
अवल माझ्या शाळेत जायच्या रस्त्यात के.ए.म हॉस्पिटल होत त्याच्या आवारात होत याच झाड. ही फुल फुलायला लागली की आम्ही मुलं कंपाऊंडच्या तारांमधुन आत घुसायचो ह्या फुलांसाठी. सकाळी सकाळी बालपणाची सुरेख आठवण समोर दिसली.... दिवस नक्की चांगला जाणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, लेकाच अभिनंदन आणि फोटो खासच
धन्यवाद सर्वांना वर्षा,
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG_4547.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_4547.jpg)
वर्षा, पूर्वा, विनार्च
गोळेकाका, वा, वा, मस्त प्रतिसाद, धन्यवाद
विद्याक, नाही गं, वेल आहे ही
ही अशी
मस्तच आलेत फोटो ! सनबर्ड चेही
मस्तच आलेत फोटो ! सनबर्ड चेही छान आलेत. मुख्य म्हणजे तुला त्यांना फोटोत पकडता आले, हे विशेष! >>> +१
सहीये..........सुंदर........
सहीये..........सुंदर........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवाट्च्याचे फ्रेमिंग अफाट
शेवाट्च्याचे फ्रेमिंग अफाट सुंदर आहे. क्लॅरीटी आणखी असती तर सोने पे सुहागा होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर... फारच गोड दिसतयं
सुंदर... फारच गोड दिसतयं
वॉव अवल! कस्सले पकडलेस
वॉव अवल! कस्सले पकडलेस सनबर्डस! माझ्याकडेही सध्या खूप येताहेत सनबर्डस.
कृष्णकमळ तर मस्तच! आणि लेकाचं अभिनंदनन!
मस्त !
मस्त !
सुंदर ! ३,५,६ फारच आवडले.
सुंदर !
३,५,६ फारच आवडले.
मस्त. सनबर्डसबरोबरचे फोटो
मस्त. सनबर्डसबरोबरचे फोटो खासच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल छान फ़ोटो. आता तुझ्या घरी
अवल छान फ़ोटो. आता तुझ्या घरी यावेच लागेल. माझ्या शाळेतल्या आठ्वणी जाग्या झाल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या मुलाचे खूप खूप खूप अभिनंदन.
मस्त...
मस्त...
काय सांगतेस? तुझ्या लेकाला
काय सांगतेस? तुझ्या लेकाला डायरेक्ट डिस्टींक्शन?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा वा! खुप खुप अभिनंदन सांग त्याला नयना मावशीकडुन!
<<ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला<<
मला पण तुझ्याकडुन आणुन ठेवावं लागेल याचा वेल असं वाटतय.
माझ्याही खुप लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात. आम्हीही याला कौरव पांडवांचं फुल म्हणायचो.
सह्हीच
सह्हीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो मस्तच... फक्त पाव
फोटो मस्तच... फक्त पाव पांडवांचे पाच पांडव करा...
Pages