कृष्णकमळ

Submitted by अवल on 23 July, 2012 - 10:18

माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !

त्याचीच ही रुपे :

१. हे झाडावर झुलणारे
1 copy.jpg

२. घरभर त्याचा सुवास फुलावा म्हणून एक घरात आणले
IMG_4528 copy.jpg

३. फक्त पुढूनच नव्हे तर मागूनही किती सुंदर दिसते पहा
IMG_4525 copy.jpg

४. हे बाजूनी
IMG_4540 copy.jpg

५. आणि हे बरोब्बर समोरून
IMG_4541 copy.jpg

६. अन त्याच्या गोड वासाने आकर्षित झालेले हे सनबर्ड्स
IMG_4553 copy.jpg

७. त्यात दोघांची भांडणं झाली. मग त्यातला एक उडून आला मधुमालतीवर
IMG_4557 copy.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद सर्वांना Happy
मानुषी, शोभा, नयना Happy
माधव>शेवाट्च्याचे फ्रेमिंग अफाट सुंदर आहे. क्लॅरीटी आणखी असती तर सोने पे सुहागा होते< अगदी. पण तेव्हा इतके सावट आले होते, आय एस ओ अ‍ॅडजेस्ट करूनही जमेला...अन त्यात त्यांची पळापळ ... अन फ्लॅश वापरायचा नाही हे वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे ब्रिदवाक्य ना Happy पण नेक्स टाईम पुन्हा नीट प्रयत्न करेन, धनयाद Happy

मस्त !

Pages