हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!
वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते
मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808
गरमा गरम भात + वरण + आळुवडि
गरमा गरम भात + वरण + आळुवडि किंवा कोथिंबिरवडी सुद्धा चालेल...........
तव्यावरची टुम्मं फुगलेली
तव्यावरची टुम्मं फुगलेली गरमगरम चपाती तुप लावून
फिशकरी आणि भात
शहाळ्याचं खोबरं (जरा जाडसर)
शहाळ्याचं खोबरं (जरा जाडसर) वरनं लसूण चटणी टाकून...
शहाळ्याचं पातळ खोबरं + पिठीसाखर (थोडीशीच) + वेलची पूड...
उकडलेल्या शेंगांचे दाणे हे इतके फास्ट खायचे की हात अन तोंड शेंगा संपेपर्यंत कंटिन्यूअस चालू पाहिजे... (माझी बायको किंवा आई सोबत स्पर्धा चालते... कोण जास्ती खातो... त्यामुळे हे दाणे असेच खाल्ले जातात
)
पुरणपोळी आणि नारळाचे दुध +
पुरणपोळी आणि नारळाचे दुध + साजूक तूप
कांदेपोहे आणि ० नंबरची शेव+ खोबरे+ टोमेटो + लिंबू
काकडीची कोशीबीर दाण्याचा कुट टाकून , पोळी (चपाती) बरोबर
भोपळी मिरचीची वडी
सगळ्यात बेकार पण मस्त गरम पोळी (चपाती) आणि चहा
शहाळ्यातलं खोबरं तर माझा जीव
शहाळ्यातलं खोबरं तर माझा जीव की प्राण! एकदा वर दिलेल्या पद्धतीने पण खाऊन पहिले पाहिजे!
तांदळाची भाकरी ही भाकरी
तांदळाची भाकरी ही भाकरी नाहीच्च
>>>> + १०००
तिला अज्याबात कडकपणा नस्तो. लिबलिबीत आणि रबरी असते ती. गार झाल्यावर तर खाववत नाही. मी पहिली तांदळाची भाकरी कशीबशी संपवली होती खोपोलीत (खपुलीत :)).. पुन्हा कुठे नाईलाज म्हणून एखाद दुसरी खाल्ली असेल कुठे... ज्वारीची भाकरी खावी तर सोलापूर हायवेला सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु झालेवर. सोबत शेंगदाण्याची चटणी. तव्याच्या आकाराची , पूर्णपणे कडक पापुद्रा सुटलेली वाफाळती भाकरी व शेंगदाणा चटणी... आम्ही रोज ८० किमी जाऊन येऊन प्रवास करायचो हे खायला केवळ काही दिवस :स्लर्प...:
कटाची आमटी आणि वरण.....यम्म्
कटाची आमटी आणि वरण.....यम्म् ! पाणी सुटलं तोंडाला.
बटाट्याच्या कसल्याही आकाराच्या फोडी करायच्या, मीठाच्या पाण्यातून काढायच्या, कढईत तूप आणि जिर्याची फोडणी करायची आणि त्यावर बटाट्याच्या फोडी वाफवायच्या........कुणालाही न देता (तसंही आमच्याकडे कोणी असलं विचित्र काहीतरी मागत नाही !) एकटीनेच आवडतं पुस्तक वाचत गट्ट्म करायच्या......स्वर्गसुख
ज्वारीची भाकरी खावी तर
ज्वारीची भाकरी खावी तर सोलापूर हायवेला सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु झालेवर. सोबत शेंगदाण्याची चटणी. तव्याच्या आकाराची , पूर्णपणे कडक पापुद्रा सुटलेली वाफाळती भाकरी व शेंगदाणा चटणी... <<<<
ह्या भाकर्या कडक करून प्रवासाला नेतात ना? सोलापूरच्या आसपास कुठेतरी खास तेवढ्यासाठी भाकर्या करून देतात. १४ - १४ दिवस टिकतात म्हणे. नवर्याने आणल्या होत्या एकदा. अशक्य खास होत्या. एवढ्या कडक पण तोंडात टाकल्यावर विरघळायच्या. आणि ज्वारीची ती हलकीशी गार गोड चव....
दिनेशदा +१... गुलाबजाम +
दिनेशदा +१...
गुलाबजाम + व्हॅनीला आयस्क्रीम
राजगीरा लाडू + गरम दुध
कोणताही चिवडा+ टॉमॅटो कांदा मिरची कोथींबीर बारीक चिरुन
दही भात + लाल मिरचीची फोडणी
शीळी इडली बारीक तुकडे करुन त्याला फोडणी ( तिळ घालुन)
शिळ्या पोळीचा लाडू
आमटी भात + दही
साबुदाणा खिचडी + दही
दुध भात
मौऊ भात + दही + तुप + मीठ एकत्र करुन परत थोडा शीजवायचा. उतरताना थोडे मेतकुट...
तोंपासु........
एक राहिलं तांदुळाच्या उकडीची
एक राहिलं
तांदुळाच्या उकडीची भाकरी + पळीवाढं पिठलं + लसुण चटणी
रव्याच्या उकडीचे मोदक + तुप
जिलबी + रबडी ( भयानक प्रकार पण एकदम तोंपासु)
रुणूच्या बटाट्याच्या फोडी,
रुणूच्या बटाट्याच्या फोडी, सॅलडची पानं, काकडीची दह्यातली कोशिंबीर, किसलेलं गाजर त्यावर किंचित मीठ-मीरपूड भुरभुरवलेलं... (अजून हव्या त्या कच्च्या गोष्टी, मोसंबी किंवा संत्र्याच्या फोडी सुद्धा)
असा सगळा काला एकत्र करून अशक्य लागतो. भरपूर केलं तर एक मील होतं.
ज्वारीची ती हलकीशी गार गोड
ज्वारीची ती हलकीशी गार गोड चव....
>>>
ह्या 'पार्सल' भाकरींची कल्पना नाही बुवा. कोणा सोलापूरकराला विचारावं लागेल. बाकी आयडिया फॅन्टास्टिकच आहे. ज्वारी मात्र गावरान हवी हं . तिला दादर, शाळू, गावरान ज्वारी म्हणतात. हायब्रिड ज्वारीचे हे काम नोहे. हायब्रिड ज्वारी आणि बाजरीही चवीला पांचट असते.
मी विचारून सांगते नवर्याला
मी विचारून सांगते नवर्याला एक्झॅक्ट कुठे ते.
कोवळी कैरी किसुन त्यावर थोडं
कोवळी कैरी किसुन त्यावर थोडं तिखट मीठ
काकडी च्या उभ्या फोडी + तिखट + मीठ
शेवगाठी / भाव नगरी / चंपाकली चहात टाकुन
मावाकेक चहात बुडवुन
मावा केक + अंब्याच्या फोडी बारीक + आय्स्क्रीम
वरण आणि कटाची आमटी >>
वरण आणि कटाची आमटी >> वाह!
पुजेच्या दिवशीचा स्वैपाक, तो पण ताटात उजवी डावी बाजु फुल ! हार फुल उदबत्ती , कापुर,,ह्या सगळ्या वासांसकट
केळफुलाची भाजी गरम गरम चपाती तुप लाउन
आज्जीच्या हातच काळे वाटाणे घालून तांदळाच्या रव्याच उपिट. बरोबर फिल्टर कॉफी.
पातळ पोह्यांचा चिवडा आणि
पातळ पोह्यांचा चिवडा आणि त्यावर घट्ट दही.
पापो चिवडा आणि त्यावर सढळ हाताने पसरलेला ओला नारळ
पापो चिवडा आणि त्यावर बारीक चिरलेला कां+टो+कोथिंबीर
(मला पापो चिवडा अति आवडतो हे लक्षात आलंच असेल
)
गरम भात + फोडनीच वरण आणी सोबत
गरम भात + फोडनीच वरण आणी सोबत तळलेली मांदेली अप्रतीम बेत सोबत तळलेली मिर्ची हवीच
काकडी + टोमॅटो + शेंगदाणे,
काकडी + टोमॅटो + शेंगदाणे, मीठ, मिरचीचं कूट + कोथिंबीर + हिंग, मोहरीची फोडणी अशी कोशिंबीर
सगळ्यात बेकार पण मस्त गरम
सगळ्यात बेकार पण मस्त गरम पोळी (चपाती) आणि चहा>> +५
आई करत असेल तर पाच मोठ्या आकाराच्या चपात्या संपवुन उठायचं. म्हणून +५.
कोणती गोष्ट 'कब रंग लायेगी'
कोणती गोष्ट 'कब रंग लायेगी' सांगता येत नाही. लहानपणी आमच्या खेड्यात (मिसळ) मिळे. तोवर खेड्यापाड्यात फरसाण माहीत नव्हते. स्थानिक शेव /गाठ्याच मिसळीत असत. त्यात चुरडलेली भजीही असत. कधी ही भजी नसत मग मिसळीची गम्मत उणावे. मग आम्ही वेगळी भजी मागवून त्यात टाकायचो पण मजा नाही..आम्ही एकदा मालकाला (तोही गावकरीच) 'रहस्य' विचारले. त्याने सांगितले अहो ती आदल्या दिवशीची शिळी भजी आणि त्यांचा चुरा असतोय. (या चुर्याला भज्यांची लेकरेही म्हनतात).
मग आम्ही त्याला शिळ्या भज्यांचा पेशल घाणा काढायला सांगितले
भरपूर बटर चोपडून सोनेरी
भरपूर बटर चोपडून सोनेरी भाजलेला पाव + कुठलीही कोरडी चटणी भुरभुरवून ( कढीपत्ता, चटणीपुडी किंवा लसूणचटणी )
तव्यावरुन उतरवलेल्या पोळीची भरपूर तूप, लोणचं / चटणी लावून गुंडाळी
गरमागरम मॅगी + घरच्या पांढर्या लोण्याचा गोळा / सायीचं आंबटसर विरजण. ( इथे पांढरं लोणी मिळत नाही म्हणून मी विरजणाच्या जवळ जाणारं सावर क्रीम घालते पण मॅगी नुसती / सॉसबरोबर कधीच खात नाही )
ब्रेडला नारळाची हिरवी चटणी लावून + ऑम्लेट
फोडणीची पोळी + साजूक तूप
रवा-डोसा किंवा ओटसचा डोसा + लोणी / बटरचा गोळा ( कुठल्याही किंचित आंबटसर धिरड्याबरोबर लोणी अप्रतिम लागतं )
तुपात भिजलेली बेरी नुसतीच आणि गरमगरम तूप कढवल्यावर लगेच खायची
कुठलीही उसळ + घट्ट दही + भरपूर कांदा, कोथिंबीर + भाजून सोललेले दाणे + क्रूटॉन्स / फरसाणातल्या फक्त गाठी / खारे शंकरपाळे हे मोठ्ठा वाडगा भरुन खायचं ( अत्यंत आवडीचं क्विक मील )
एकेकाळी केळं आणि खजूर रवाळ तुपात बुडवल्याशिवाय कधी खाल्ले नाहीत. हल्ली नुसतेच खाते
एकेकाळी केळं आणि खजूर रवाळ
एकेकाळी केळं आणि खजूर रवाळ तुपात बुडवल्याशिवाय कधी खाल्ले नाहीत. <<<
आहाहा स्वर्ग!!
रव्याच्या लाडवाकरता तयार
रव्याच्या लाडवाकरता तयार केलेलं मिश्रण लाडू करण्याआधी आणि गरम असतानाच वाटीत घेऊन खाणे.
नाहीतर रव्याचा लाडू मावेमध्ये गरम करून वितळवून खाणे.
एकेकाळी केळं आणि खजूर रवाळ
एकेकाळी केळं आणि खजूर रवाळ तुपात बुडवल्याशिवाय कधी खाल्ले नाहीत. हल्ली नुसतेच खाते >>>>> +१
तळ्यातला मासा (नाव माहित
तळ्यातला मासा (नाव माहित नाही) बोटाच्या आकाराचा चुलीवर भाजुन... वर तिखट, मीट लाऊन.
तसेच चुलीवर भाजलेले कोंबडीचे पाय (नख्या काढून) तिखट मीटात लोळवून खायच तर गावालाच जावं.
रव्याच्या लाडवाकरता तयार केलेलं मिश्रण लाडू करण्याआधी आणि गरम असतानाच वाटीत घेऊन खाणे. >> अगदी अग्दी
सगळ्यात बेकार पण मस्त गरम
सगळ्यात बेकार पण मस्त गरम पोळी (चपाती) आणि चहा>>
केदार्..सही.. पण बेकार नको म्हणूस्.गरम गरम तव्यावरची चपती डायरेक्ट प्लेट मधे. त्यावर तूप आणी दुधाचा strong चहा. हे खाताना मी नेह्मी हे गाणे गुणगुणते "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते ..".
गरम गरम वाफाळता भात + आंबट वरण + बटाट्याची काप (आई स्पेशालिटी )
गरम भात + दही + बटाट्याची फ्राय भाजी
कोणत्याही सणाच्या दिवशीचे नेवेध्याचे जेवण दुपारी जेऊन झाले की रात्री एका प्लेट मध्ये भात त्यावर उसळ (सफेद वाटणे, काळे वाटणे सांबर असेल ती ) सगळ्या भाज्या मिक्स करून including घट्ट वरण + वर तूप + लोणचे. हे एकत्र करून चमच्याने खायचे
चहा + मेथीचे थेपले
श्रीखन्ड वाटीत घेउन चमचा न वापरता बोटाने खाणे
खरपूस भाजलेली आणि भरपूर तूप
खरपूस भाजलेली आणि भरपूर तूप लावलेली पोळी + गरम गरम लोणकढी चहा.. (चहा करताना जाडजूड साय घालणे) पोळी थंड झाली असेल तर मावेत २० सेकंद गरम करून घ्यायची.
पातळ पोह्यांचा चिवडा+दूध, चिवडा खायचा आणि शेवटी उरलेलं दूध चमच्याने भूरकायचं.
बिस्किटं + गार दुध = काला
कांदेपोहे/उपमा + सांबार
तुपात भिजलेली बेरी नुसतीच आणि
तुपात भिजलेली बेरी नुसतीच आणि गरमगरम तूप कढवल्यावर लगेच खायची >>
आईग्गं....मला आत्ताच पायजे, कुठून आणू ???
वाईट्ट बीबी आहे हा
मामी सही ...तसेच पुरण पोळीचे
मामी सही ...तसेच पुरण पोळीचे पुरण वाटीत घेउन वर खूप तूप घालुन नुसतेच खायचे
सोलापूरच्या आणि त्याच्या थोडं
सोलापूरच्या आणि त्याच्या थोडं पुढे कर्नाटकात गेलं की ज्वारीची कडक भाकरी आणि मटकीची कोरडी उसळ मिळते. लिंगायती खानावळीमधे जायचं. ही उसळ अतितिखट असते. पण काय लागते.. अहाहा. आणि घट्ट विर्रजलेले दही. सोबत सॅलड म्हणून मेथी आणि कांदा.
गरम गरम पिठलं त्यावर साजूक तूप आणि बारीक शेव. लई भारी लागतं.
पातळ पोह्यांचा चिवडा वाडग्यात घ्यायचा. त्यावर मस्त गरम्गरम चहा ओतायचा आणि खायचा.
आदल्या दिवशी केलेल्या पाणीपुरीचं उरलेलं पाणी घेऊन त्यात चार पाच पुर्या कुस्करून टाकायच्या. थोडं फरसाण आणि भरपूर चुरमुरे घालायचे.
Pages