मैदा - ३ चमचे
कोकोआ पावडर - २ चमचे
बेकिंग पावडर - १ छोटा चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
पिठीसाखर - ४ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - ४ चमचे
दूध - ४ चमचे
काल केक खावा वाटला म्हणून गुगललं तर बरयाच मोठ्मोठ्या पाकृ दिसल्या...
मावेला केक वै. गोष्टींसाठी जन्मात हात लावला नव्हता त्यामुळे म्हटलं ये अपने बस की बात नही...
मग सोप्या रेसिपींसाठी गुगलल्यावर एक छोटीशी रेसिपी सापडली...
म्हटलं चला.... मग काय ऑफिस सुटेपर्यंत डोक्यात नुसते केकचेच विचार....
मग आठवलं, केक करायला निघालोय पण आपल्याकडे साखर न तेल सोडून इतर काही साहित्य नाही...
मग घरी जाताना सगळं साहित्य घेऊन गेले..
मग माझ्या आवडत्या कॉफी मगमध्ये केक करायची प्रोसेस सुरू...
कृती :
१. मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि कोकोआ पावडर मगमध्ये एकत्र करून मिसळून घ्यावे.
२. मग त्यात तेल आणि दूध टाकून मिसळावे. गाठी न राहिल्या पाहिजेत..
३. मग त्या प्रकरणाचा एकंदरीत appearance (?) smooth, चकचकीत दिसायला लागला की मावेमध्ये ठेवायला केक तयार आहे.
४. मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. केक ओलसर दिसत असला तरी टेंशन न घेता त्याला मावे बंद करून अजून ४-५ मिनिटे तसाच मावेत ठेवावा.
५. बाहेर काढून खाऊन टाकावा......
हा केक गरम मस्त लागतो....
केक थोडुश्या वेळात अगदी मस्त होतो आणि यम्मी पण....
जास्त वेळ नसेल पण केक खायचाच असेल तर अगदी पर्फेक्ट पाकृ....
सहीच! आजच करून बघणार जमला तर
सहीच! आजच करून बघणार
जमला तर माझा लेक खूषच होईल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ललिता-प्रीति, नक्की करून
ललिता-प्रीति, नक्की करून पहा.... मस्त होतो...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व सामान घरी आहे.. आज करुन
सर्व सामान घरी आहे.. आज करुन बघायला हरकत नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज करणारच !!!!!! उद्या फोटो
आज करणारच !!!!!!
उद्या फोटो टाकणारच!!!!!!!
धन्यवाद साक्षी. तेल कुठलेही
धन्यवाद साक्षी.
तेल कुठलेही चालेल?
केक मधे तेल ????? करुन
केक मधे तेल ????? करुन बघायला पाहिजे......
छानच कि. एगलेस वगैरे म्हंटले
छानच कि. एगलेस वगैरे म्हंटले कि मला जरा जास्तच प्रेम वाटते !
चमचा कोणता? टीस्पून की
चमचा कोणता? टीस्पून की टेबलस्पून?
सर्व सामान घरी आहे.. आज करुन
सर्व सामान घरी आहे.. आज करुन बघायला हरकत नाही.. >>> नक्की बघा करून स्नेहश्री..
आज करणारच !!!!!! उद्या फोटो टाकणारच!!!!!!! >>> मोहन कि मीरा, नक्की टाका फोटो... मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो काढायला केक उरलाच नाही....
तेल कुठलेही चालेल? >>> रैना, मी सूर्यफूल वापरलं होतं... अजिबात वास येत नाही त्याचा..
केक मधे तेल ????? करुन बघायला पाहिजे......>>> सृष्टी, मलाही असंच वाटलं होतं... पण मस्त झाला...
छानच कि. एगलेस वगैरे म्हंटले कि मला जरा जास्तच प्रेम वाटते !>>> मलाही एगलेसच आवडतो...
चमचा कोणता? टीस्पून की टेबलस्पून? >>>> टेबलस्पून...
मस्तच.. ़ ए पण मगात चिकटणार
मस्तच.. ़ ए पण मगात चिकटणार नाही ना केक?
जळवा तुम्ही नुसतं तरी बरं
जळवा तुम्ही नुसतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तरी बरं फोटो नै टाकला
काल आधी घाबरत घाबरत एका कॉफी
काल आधी घाबरत घाबरत एका कॉफी मग मध्ये करुन पाहिला.... तो झकास झाला .. मग लेकीने ( वय ११) मी सांगीतल्या प्रमाणे थोड्या जास्त प्रमाणात केला.
हा घ्या फोटो....
![cake 1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36130/cake%201.jpg)
मग लेकीने त्याला "डॅकोरेट" केले....
मोकीमी मस्त दिसतोय केक.
मोकीमी मस्त दिसतोय केक. तुमच्या मुलीला मझ्याकडून शाबासकी. अगदी उचलून खावासा वाटतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साक्षी, रेसिपी छान आहे, नक्की करून बघणार
ए पण मगात चिकटणार नाही ना
ए पण मगात चिकटणार नाही ना केक?
>>> नाही चिकटत अंजली, मगला आतून थोडं तेल लावून त्यावर मैदा भुरभुरून मग मिश्रण ओतायचे मगमध्ये..
जळवा तुम्ही नुसतं तरी बरं फोटो नै टाकला>>>> दक्षिणा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोकीमी .... १ नंबर दिसतोय केक....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साक्षी, रेसिपी छान आहे, नक्की करून बघणार >>> धन्यवाद ऑर्किड... नक्की करून बघा...
मि पण आता ओफिस मधेच आहे
मि पण आता ओफिस मधेच आहे ......अगदी तसेच घडणार ग साक्शी........ कॅलरी कडे न पहाता करणार आज ..... जमला तरच फोटो टकिन ....:)
कॅलरी कडे न पहाता करणार आज
कॅलरी कडे न पहाता करणार आज ..... जमला तरच फोटो टकिन >>> सुहास्य, नक्की करून पहा आणि फोटो टाका...
या विकांताला प्रयोग करणे झाले
या विकांताला प्रयोग करणे झाले .
मी जाड काचेच्या ग्लासात केला.
२० सेकंदात इतका फुगुन वर आला की मी अत्यानंदाने ओरडले.
पण बेपा खरचं एक चमचा घालायची का? मला फार चव लागली त्याची .पुढच्या वेळी जरा कमी टाकुन पाहिन .
मी विचारणारच होते की बॅपा
मी विचारणारच होते की बॅपा जास्त होणार नाही कां? ऑनलाइन १/४ टीस्पू. सांगितली आहे. :))
स्वस्ति, मनी प्रतिसादाबद्दल
स्वस्ति, मनी प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
मी पाहिलेल्या रेसिपीत १ चमचा सांगितली होती... आणि तीही सपाट चमचा टाका असं लिहिलं आहे मी, त्यामुळे अगदी अर्धा चमचाच होते...
कमी टाकून पाहू शकता...
मस्त, साक्षी मि पन करुन पाहिन
मस्त,
साक्षी मि पन करुन पाहिन अगदि सोपि कृति आहे
मी सेल्फ रायझींग फ्लोर घेतलं
मी सेल्फ रायझींग फ्लोर घेतलं होत, कारण मला पण बेपा च्या प्रमाणाची शंका होती!!!!
मी आत्ता बनवून पाहीला... पण
मी आत्ता बनवून पाहीला... पण तेल कमी टाकण्याचा शहाणपणा नडला... थोडा रुख्खट आणि चिवट आलाय केक पण चवीला छान झालाय
मी सगळ्याच गोष्टीत बदल केले,
मी सगळ्याच गोष्टीत बदल केले, पण तरीही खूपच मस्त झालेला. आणि झट्पट. धन्स साक्षी.
माझं प्रमाणः
गव्हाचं पीठ - ४ चमचे
बोर्नव्हीटा - २ चमचे
बेकिंग पावडर - १/४ चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
साखर - २ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - २ चमचे
दूध - ६ चमचे
पहिल्या वेळेस बेपा १/२ चमचा घातलेली, पण मला केक मध्ये त्याची चव कळत होती. ( आणि केक खूप फुगून कपाच्या बाहेर आलेला.)
मधुरा, तू केलेले बदल आवडले.
मधुरा, तू केलेले बदल आवडले. हे चमचे म्हणजे tsp का?
साक्षीचा चमचा कुठला माहीत
साक्षीचा चमचा कुठला माहीत नाही राखी. मी आपला नेहमीचा स्टीलचा चमचा वापरलेला.
मस्त होतो का केक. मला दोन
मस्त होतो का केक. मला दोन चमचे दूध अजून घालावं लागलं, तरी थोडा कोरडा झाला. अजून दोन चमचे घातले की पर्फेक्ट होईल. एकदमच झटपट प्रकार आहे. हा मुलांनाही करता येईल. 'ज्युनिअर मास्टरशेफ' मध्येही फिट्ट बसेल ही कृती.
साक्षी, माते.. पामराचा दंडवत
साक्षी, माते.. पामराचा दंडवत स्वीकार करावा! मस्त झाला केक. मी रागीचा केला, कोको/बोर्नव्हिटा काही घातले नाही. थोडा बेकिंग सोडा टाकला. दुध ८ चमचे घातले. चव छान आली. टॉप लेयर कोरडा झाला. पण एकुणात सहीच! यु रॉक!! थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार लोक्स!!!!!!!!!!! माफि
नमस्कार लोक्स!!!!!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माफि असावी... बेकिंग पावडर वाला चमचा नेहमीचा स्टील चमचा वापरावा... त्याने बेपाची चव लागत नाही अजिबात...
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!!!!!
मस्त होतो का केक. मला दोन चमचे दूध अजून घालावं लागलं, तरी थोडा कोरडा झाला. अजून दोन चमचे घातले की पर्फेक्ट होईल. एकदमच झटपट प्रकार आहे. हा मुलांनाही करता येईल. 'ज्युनिअर मास्टरशेफ' मध्येही फिट्ट बसेल ही कृती>>>> धन्स पौर्णिमा....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साक्षी, माते.. पामराचा दंडवत स्वीकार करावा!>>> चिन्नु ....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थांकू............:स्मित:
हा मी माझ्या आयुष्यात केलेला पहिला केक आहे.......
मस्त झाला केक. मी रागीचा केला, कोको/बोर्नव्हिटा काही घातले नाही. थोडा बेकिंग सोडा टाकला. दुध ८ चमचे घातले. चव छान आली. टॉप लेयर कोरडा झाला. पण एकुणात सहीच! यु रॉक!! थँक्स>>>>
कोको पावडर न घालता करता येईल
कोको पावडर न घालता करता येईल का?
( घरी कोको पावडर सोडून सगळे पदार्थ आहेत, वरचे फोटो बघून आताच करावासा वाटतोय केक)
बिनू , चालेल ना... कोको पावडर
बिनू , चालेल ना... कोको पावडर नसेल तर बोर्नविटा पण चालेल... तेही नसेल तर मग वनिला इसेंस वै. पण वापरू शकता... नाहीतर फक्त इतर जिन्नस टाकून करून पहा... आणि सांगा कसा झाला ते....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages