एगलेस चॉकलेट केक इन कॉफी मग

Submitted by saakshi on 18 July, 2012 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा - ३ चमचे
कोकोआ पावडर - २ चमचे
बेकिंग पावडर - १ छोटा चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
पिठीसाखर - ४ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - ४ चमचे
दूध - ४ चमचे

क्रमवार पाककृती: 

काल केक खावा वाटला म्हणून गुगललं तर बरयाच मोठ्मोठ्या पाकृ दिसल्या...
मावेला केक वै. गोष्टींसाठी जन्मात हात लावला नव्हता त्यामुळे म्हटलं ये अपने बस की बात नही...
मग सोप्या रेसिपींसाठी गुगलल्यावर एक छोटीशी रेसिपी सापडली...
म्हटलं चला.... मग काय ऑफिस सुटेपर्यंत डोक्यात नुसते केकचेच विचार.... Proud

मग आठवलं, केक करायला निघालोय पण आपल्याकडे साखर न तेल सोडून इतर काही साहित्य नाही...
मग घरी जाताना सगळं साहित्य घेऊन गेले..

मग माझ्या आवडत्या कॉफी मगमध्ये केक करायची प्रोसेस सुरू...

कृती :
१. मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि कोकोआ पावडर मगमध्ये एकत्र करून मिसळून घ्यावे.
२. मग त्यात तेल आणि दूध टाकून मिसळावे. गाठी न राहिल्या पाहिजेत..
३. मग त्या प्रकरणाचा एकंदरीत appearance (?) smooth, चकचकीत दिसायला लागला की मावेमध्ये ठेवायला केक तयार आहे.
४. मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. केक ओलसर दिसत असला तरी टेंशन न घेता त्याला मावे बंद करून अजून ४-५ मिनिटे तसाच मावेत ठेवावा.
५. बाहेर काढून खाऊन टाकावा...... Happy

हा केक गरम मस्त लागतो.... Happy

वाढणी/प्रमाण: 
मी दोन मग केक्स खाल्ले... :स्मित:
अधिक टिपा: 

केक थोडुश्या वेळात अगदी मस्त होतो आणि यम्मी पण....
जास्त वेळ नसेल पण केक खायचाच असेल तर अगदी पर्फेक्ट पाकृ.... Happy

माहितीचा स्रोत: 
गुगलबाबा की जय!!!!!!!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व सामान घरी आहे.. आज करुन बघायला हरकत नाही.. >>> नक्की बघा करून स्नेहश्री..

आज करणारच !!!!!! उद्या फोटो टाकणारच!!!!!!! >>> मोहन कि मीरा, नक्की टाका फोटो... मी
फोटो काढायला केक उरलाच नाही.... Happy

तेल कुठलेही चालेल? >>> रैना, मी सूर्यफूल वापरलं होतं... अजिबात वास येत नाही त्याचा..

केक मधे तेल ????? करुन बघायला पाहिजे......>>> सृष्टी, मलाही असंच वाटलं होतं... पण मस्त झाला...

छानच कि. एगलेस वगैरे म्हंटले कि मला जरा जास्तच प्रेम वाटते !>>> मलाही एगलेसच आवडतो...

चमचा कोणता? टीस्पून की टेबलस्पून? >>>> टेबलस्पून...

काल आधी घाबरत घाबरत एका कॉफी मग मध्ये करुन पाहिला.... तो झकास झाला .. मग लेकीने ( वय ११) मी सांगीतल्या प्रमाणे थोड्या जास्त प्रमाणात केला.

हा घ्या फोटो....
cake 1.jpg

मग लेकीने त्याला "डॅकोरेट" केले....

cake 2.jpg

मोकीमी मस्त दिसतोय केक. तुमच्या मुलीला मझ्याकडून शाबासकी. अगदी उचलून खावासा वाटतोय. Happy
साक्षी, रेसिपी छान आहे, नक्की करून बघणार

ए पण मगात चिकटणार नाही ना केक?
>>> नाही चिकटत अंजली, मगला आतून थोडं तेल लावून त्यावर मैदा भुरभुरून मग मिश्रण ओतायचे मगमध्ये..

जळवा तुम्ही नुसतं तरी बरं फोटो नै टाकला>>>> दक्षिणा... Happy

मोकीमी .... १ नंबर दिसतोय केक.... Happy

साक्षी, रेसिपी छान आहे, नक्की करून बघणार >>> धन्यवाद ऑर्किड... नक्की करून बघा...

मि पण आता ओफिस मधेच आहे ......अगदी तसेच घडणार ग साक्शी........ कॅलरी कडे न पहाता करणार आज ..... जमला तरच फोटो टकिन ....:)

या विकांताला प्रयोग करणे झाले .
मी जाड काचेच्या ग्लासात केला.
२० सेकंदात इतका फुगुन वर आला की मी अत्यानंदाने ओरडले.
पण बेपा खरचं एक चमचा घालायची का? मला फार चव लागली त्याची .पुढच्या वेळी जरा कमी टाकुन पाहिन .

IMG463.jpg

स्वस्ति, मनी प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
मी पाहिलेल्या रेसिपीत १ चमचा सांगितली होती... आणि तीही सपाट चमचा टाका असं लिहिलं आहे मी, त्यामुळे अगदी अर्धा चमचाच होते...
कमी टाकून पाहू शकता...

मी आत्ता बनवून पाहीला... पण तेल कमी टाकण्याचा शहाणपणा नडला... थोडा रुख्खट आणि चिवट आलाय केक पण चवीला छान झालाय

मी सगळ्याच गोष्टीत बदल केले, पण तरीही खूपच मस्त झालेला. आणि झट्पट. धन्स साक्षी.
माझं प्रमाणः
गव्हाचं पीठ - ४ चमचे
बोर्नव्हीटा - २ चमचे
बेकिंग पावडर - १/४ चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
साखर - २ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - २ चमचे
दूध - ६ चमचे

पहिल्या वेळेस बेपा १/२ चमचा घातलेली, पण मला केक मध्ये त्याची चव कळत होती. ( आणि केक खूप फुगून कपाच्या बाहेर आलेला.)

मस्त होतो का केक. मला दोन चमचे दूध अजून घालावं लागलं, तरी थोडा कोरडा झाला. अजून दोन चमचे घातले की पर्फेक्ट होईल. एकदमच झटपट प्रकार आहे. हा मुलांनाही करता येईल. 'ज्युनिअर मास्टरशेफ' मध्येही फिट्ट बसेल ही कृती.

साक्षी, माते.. पामराचा दंडवत स्वीकार करावा! मस्त झाला केक. मी रागीचा केला, कोको/बोर्नव्हिटा काही घातले नाही. थोडा बेकिंग सोडा टाकला. दुध ८ चमचे घातले. चव छान आली. टॉप लेयर कोरडा झाला. पण एकुणात सहीच! यु रॉक!! थँक्स Happy

नमस्कार लोक्स!!!!!!!!!!!
माफि असावी... बेकिंग पावडर वाला चमचा नेहमीचा स्टील चमचा वापरावा... त्याने बेपाची चव लागत नाही अजिबात... Happy

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!!!!!

मस्त होतो का केक. मला दोन चमचे दूध अजून घालावं लागलं, तरी थोडा कोरडा झाला. अजून दोन चमचे घातले की पर्फेक्ट होईल. एकदमच झटपट प्रकार आहे. हा मुलांनाही करता येईल. 'ज्युनिअर मास्टरशेफ' मध्येही फिट्ट बसेल ही कृती>>>> धन्स पौर्णिमा.... Happy

साक्षी, माते.. पामराचा दंडवत स्वीकार करावा!>>> चिन्नु .... Lol
हा मी माझ्या आयुष्यात केलेला पहिला केक आहे....... Happy
मस्त झाला केक. मी रागीचा केला, कोको/बोर्नव्हिटा काही घातले नाही. थोडा बेकिंग सोडा टाकला. दुध ८ चमचे घातले. चव छान आली. टॉप लेयर कोरडा झाला. पण एकुणात सहीच! यु रॉक!! थँक्स>>>> Happy थांकू............:स्मित:

कोको पावडर न घालता करता येईल का?
( घरी कोको पावडर सोडून सगळे पदार्थ आहेत, वरचे फोटो बघून आताच करावासा वाटतोय केक)

बिनू , चालेल ना... कोको पावडर नसेल तर बोर्नविटा पण चालेल... तेही नसेल तर मग वनिला इसेंस वै. पण वापरू शकता... नाहीतर फक्त इतर जिन्नस टाकून करून पहा... आणि सांगा कसा झाला ते.... Happy

Pages