नमस्कार... मायबोलीकर...
आज मी आपल्या समोर, मी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची काही छायाचित्र प्रदर्शित करत आहे.ह्या सर्व रांगोळ्या मी माझ्या कामाच्या ठिकाणी काढलेल्या आहेत. (मी पौरोहित्य करणारा आहे. म्हणजे भटजी...!)
आता थोडिशी या कलेची जन्मकथा सांगतो.साधारणतः १० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एके ठिकाणी कामाला गेलो असताना माझं बराच वेळ अथर्वशीर्ष म्हणणं चालू होतं. ५०/६० आवर्तनं एकट्याला म्हणायची(च) होती.अगदी कंटाळा आला होता. ( अता कित्तीही भक्तिभावाचा विषय असला,तरी रोजच झाल्यावर कंटाळा येतोच ) बाजुला बरीच वेगवेगळी फुलं आणलेली होती. सहज डोक्यात आलं आणी एका बाजुला म्हणंणं' सुरू असतांना, त्यातल्या निशिगंधाच्या फुलांनी अधी १गोल चक्र काढलं. गावरान गुलाब भरपुर होता त्याचा पाकळ्या केल्या आणी मधे टाकल्या,त्यात मध्यभागी एक भलमोठ्ठं जास्वंदीचं फुल ठेवलं,आणी बाहेरुन विड्याची पानं देठाच्या बाजुनी कट करुन गोल लावली... झालं,तेंव्हा पासुन दिसली फुलं की काढ रांगोळ्या असा क्रम सुरु झाला.मग भरपुर फुलं आणली तर काय/कश्या आणी कित्ती मोठ्या रांगोळ्या होतील..? ही एवढी फुलं आणायची कुठुन..? वगैरे विचार सुरु झाले.आणी आधी मंडई(पुणे) आणी नंतर फुलांचं सगळ्यात मोठ्ठं होल-सेल मार्केटयार्ड(गुलटेकडी)ही दोन ठिकाणं हताला लागली...मग काय..? पुढे पुढे...कल्पना सुचत गेल्या,आणी रांगोळ्या निघत गेल्या. आज अता बरीच वर्ष झाली मी या रांगोळ्या (कामाच्या ठिकाणी आणी इतरत्र प्रासंगिक)काढतोय. तुंम्हाला कश्या वाटतात..? पहा आणी सांगा.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
०=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====०
धन्यवाद...
कल्पक, सुंदर, रेखीव आणि
कल्पक, सुंदर, रेखीव आणि प्रमाणबद्ध..
फारच आवडल्यात!
वॉव किती सुंदर आहेत,
वॉव किती सुंदर आहेत, सुरेख..........
पराग या सर्व तु काढलेल्या........सहीच........
खुप खुप मस्त.. प्रचि २,४,७,९
खुप खुप मस्त.. प्रचि २,४,७,९ आवड्ले खुपचं..
सहिये !!!
सहिये !!!
@पराग या सर्व तु काढलेल्या
@पराग या सर्व तु काढलेल्या >>>> व्हय जी... मीच तो
खुप सुंदर !
खुप सुंदर !
फुलांच्या रांगोळ्या म्हणजे
फुलांच्या रांगोळ्या म्हणजे पेशन्सचे काम. सलग काही वर्षे काढल्या ऑफिस मधे. तुम्ही काढलेल्या सुपर्ब एकदम.
__________/\____________
अतीशय सुंदर आणी पवित्र. अशी
अतीशय सुंदर आणी पवित्र. अशी उत्तम कल्पना तुम्हाला सुचली यातच सर्व आले. कला वाढती राहो.
सुरेख !
सुरेख !
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
वॉव, काय सुंदर आहेत सगळ्याच
वॉव, काय सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. एकसे एक सुंदर आहेत. आवडल्या.
वॉव, काय सुंदर आहेत सगळ्याच
वॉव, काय सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. एकसे एक सुंदर आहेत. आवडल्या.>> +१
प्रसन्न वाटलं एकदम
कल्पक, सुंदर, रेखीव आणि
कल्पक, सुंदर, रेखीव आणि प्रमाणबद्ध..
फारच आवडल्यात! >>>> +१००
माझ्याकडे शब्दच नाहीत कौतुक
माझ्याकडे शब्दच नाहीत कौतुक करायला. अतिशय सुंदर, कल्पक.
एक रांगोळी काढायला तुम्हाला एकूण किती फुलं आणि किती वेळ लागतो?
मी अयुष्यभर काढत बसले तरिही मला इतकी सुंदर रांगोळी अगदी ५% सुद्धा जमणार नाही.
अतिशय सुबक रेखीव, जीवंत
अतिशय सुबक रेखीव, जीवंत रांगोळ्या आहेत, अप्रतिम..
व्वा! सुंदर. सुबक, रेखीव, आणि
व्वा! सुंदर. सुबक, रेखीव, आणि रंगसंगतीही छान जमलेय.
वाह!! अफलातुन... एकसे एक
वाह!! अफलातुन... एकसे एक फुलांच्या रांगोळ्या... कौतुक कौतुक... पण तुमचा आत्मा का असा अतृप्त? इतकी छान कला असताना?
पण तुमचा आत्मा का असा अतृप्त?
पण तुमचा आत्मा का असा अतृप्त? इतकी छान कला असताना? स्मित>>>>>>>>>>>.भावना +१
अग एक गुरुजी (भटजी) असून ’अतृप्त आत्मा ’ हा आयडी?
@पण तुमचा आत्मा का असा
@पण तुमचा आत्मा का असा अतृप्त? इतकी छान कलाअसताना? >>> साधं लॉजिक आहे हो, तृप्तता आली की कला संपली,तेंव्हा मी अत्रुप्त असणच बरं,आणी खरही !
मस्तच आहेत.
मस्तच आहेत.
@अग एक गुरुजी (भटजी) असून
@अग एक गुरुजी (भटजी) असून ’अतृप्त आत्मा ’ हा आयडी? >>> माणसाचा व्यवसाय आणी व्यक्तित्व एकच असतं,असा आपला नम्र गैरसमज आहे काय?
सुंदर आहेत रांगोळ्या.
सुंदर आहेत रांगोळ्या.
सुंदर !!
सुंदर !!
सुंदर! अजुन येऊ द्या प्रचि!
सुंदर!
अजुन येऊ द्या प्रचि!
प्रसन्न वाटलं पाहून!
प्रसन्न वाटलं पाहून!
अहो अतृप्त आत्मा उर्फ भटजी
अहो अतृप्त आत्मा उर्फ भटजी बुवा, रोज एवढे देवकार्य करता, तो श्रीगणेश तुम्हाला पावला बरं का..... इतक्या सुंदर कलेचा तुम्हाला आशिर्वाद मिळाला आहे ती कला अशीच जोपासा व त्यात अजुन प्रगती करा हिच त्या सर्व कलेच्या मुळ स्त्रोत असलेल्या सिद्धिविनायकाकडे प्रार्थना......
सुरेख रांगोळ्या. ७,८ आणि ९
सुरेख रांगोळ्या. ७,८ आणि ९ विशेष आवडल्या
अप्रतिम
अप्रतिम
खूप सुंदर!
खूप सुंदर!
सुरेख!!!
सुरेख!!!
Pages