नमस्कार... मायबोलीकर...
आज मी आपल्या समोर, मी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची काही छायाचित्र प्रदर्शित करत आहे.ह्या सर्व रांगोळ्या मी माझ्या कामाच्या ठिकाणी काढलेल्या आहेत. (मी पौरोहित्य करणारा आहे. म्हणजे भटजी...!)
आता थोडिशी या कलेची जन्मकथा सांगतो.साधारणतः १० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एके ठिकाणी कामाला गेलो असताना माझं बराच वेळ अथर्वशीर्ष म्हणणं चालू होतं. ५०/६० आवर्तनं एकट्याला म्हणायची(च) होती.अगदी कंटाळा आला होता. ( अता कित्तीही भक्तिभावाचा विषय असला,तरी रोजच झाल्यावर कंटाळा येतोच ) बाजुला बरीच वेगवेगळी फुलं आणलेली होती. सहज डोक्यात आलं आणी एका बाजुला म्हणंणं' सुरू असतांना, त्यातल्या निशिगंधाच्या फुलांनी अधी १गोल चक्र काढलं. गावरान गुलाब भरपुर होता त्याचा पाकळ्या केल्या आणी मधे टाकल्या,त्यात मध्यभागी एक भलमोठ्ठं जास्वंदीचं फुल ठेवलं,आणी बाहेरुन विड्याची पानं देठाच्या बाजुनी कट करुन गोल लावली... झालं,तेंव्हा पासुन दिसली फुलं की काढ रांगोळ्या असा क्रम सुरु झाला.मग भरपुर फुलं आणली तर काय/कश्या आणी कित्ती मोठ्या रांगोळ्या होतील..? ही एवढी फुलं आणायची कुठुन..? वगैरे विचार सुरु झाले.आणी आधी मंडई(पुणे) आणी नंतर फुलांचं सगळ्यात मोठ्ठं होल-सेल मार्केटयार्ड(गुलटेकडी)ही दोन ठिकाणं हताला लागली...मग काय..? पुढे पुढे...कल्पना सुचत गेल्या,आणी रांगोळ्या निघत गेल्या. आज अता बरीच वर्ष झाली मी या रांगोळ्या (कामाच्या ठिकाणी आणी इतरत्र प्रासंगिक)काढतोय. तुंम्हाला कश्या वाटतात..? पहा आणी सांगा.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
०=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====०
धन्यवाद...
गुर्जी लयच भारी.. प्रसन्न
गुर्जी लयच भारी..
प्रसन्न वाटलं पाहून
एक "एक सो बीस किवाम" लगाके लागू तुम्हाला ..
@एक "एक सो बीस किवाम" लगाके
@एक "एक सो बीस किवाम" लगाके लागू तुम्हाला ..>>>
हल्कत्,बव्लत,अचरत आता काय उप-योग त्याचा??????????????
ह्या ह्या.. म्हणून तर ऑफर
ह्या ह्या.. म्हणून तर ऑफर दिली =))
ह्या ह्या.. म्हणून तर ऑफर
ह्या ह्या.. म्हणून तर ऑफर दिली =))
बुवा... गोळ्या जपून चालवा
बुवा... गोळ्या जपून चालवा हो.. चायला.. एखादी लागली तर हकनाक जीव जायचा
एखादी लागली तर हकनाक जीव
एखादी लागली तर हकनाक जीव जायचा >>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा..!
मग ह्या घे हळूहळू....![Click to get more.](http://cdn.content.sweetim.com/sim/cpie/emoticons/0002069D.gif)
अतिशय सुरेख आहेत या.. ५ मधे
अतिशय सुरेख आहेत या.. ५ मधे मयुरपंख वाट्तोय. छानच !!
वा!!सुरेख,कल्पक्..अतिशय सुंदर
वा!!सुरेख,कल्पक्..अतिशय सुंदर सगळ्याच रचना..
रियाने टाकलेले फोटो मलाच का बरं दिसंना???
मस्त. २ रा भाग कुठाय?
मस्त.
२ रा भाग कुठाय?
मस्तच आहेत
मस्तच आहेत रांगोळ्या.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
रियाच्या रांगोळ्या मलाही दिसत नाहीत. रिया कर्नाटकात छान छान डिझाइन्स रोज दारापुढे काढतात वेटोळे वेटोळे वाली खूप मोठ्ठी रांगोळीपण असते...तुझा दक्षिण म्हणजे नारळ्पाणीवाला हे डोक्यातून काढ बरं
हे असे रांगोळी काढून देणारे भटजीबुवा आम्हाला कधी भेट्ले नाहीत ब्वा. ञावरुन प्रेरणा घेऊन पुढे मागे घरी कॉपी करता येईल.
खूपच सुन्दर आहेत
खूपच सुन्दर आहेत रान्गोळ्या.... कौतुक करावे तितके थोडे आहे.....अप्रतिम.........
छान छान +१०००
छान छान +१०००
कसल्या एकसे एक सुरेख
कसल्या एकसे एक सुरेख रांगोळ्या आहेत!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुंदर! रियाच्या
फारच सुंदर!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रियाच्या रांगोळ्या नाही दिसत
सुरेख अप्रतिम ....
सुरेख अप्रतिम ....
झकास!!
झकास!!
सुरेख रांगोळ्या आणि आकर्षक
सुरेख रांगोळ्या आणि आकर्षक रंगसंगती !!
अप्रतिम!
अप्रतिम!
Pages