स्वातंत्र्य

Submitted by विनिता.झक्कास on 17 July, 2012 - 05:06

आज पक्षांना राहायला झाडेच उरली नाहीत. कसे जगायचे त्यांनी???
स्वातंत्र्य

दार उघडे पाहून पिंजर्‍याचे पाखरू हळूच बाहेर आले
पंख फडफडवले मजेने
मोठ्ठा श्वास घेऊन, शीळ घालत पाहिले इकडे तिकडे
घराच्या भिंती आज भासल्या नव्याच
त्या ओलांडून घ्यायची होती त्याला,
भरारी निळ्या आकाशात...
टुन टुन उड्या मारत सरकले ते गॅलरीकडे
गॅलरीत कुंड्याची दाटी, दोर्‍यांवरचे कपडे
फिरली नजर सगळ्यांवर
'टाटा, बाय बाय' म्हणत ते चढले गॅलरीच्या कठड्यावर
झेप घेण्या निळ्या आकाशात, पसरले पंख, वर केली मान
कुठे होते निळे आकाश? पांढरे ढग, वाहणारा वारा..?
वर होता फ्लायओव्हर ब्रीज, विजेच्या लटकणार्‍या तारा
कारखान्याचे धुराडे ओकत होते विषारी धूर!
आकाशाला भिडणार्‍या इमारती पसरल्या होत्या दूरच दूर
हतबुद्ध होऊन त्याने चोहोकडे पाहिले तेच दृश्य गोल फिरले
क्षणभर पाखरू सुन्न झाले, भानावर येत सावरून घेतले पंख
घरात आले परत कुंड्यावरून, हताशपणे बघितले पिंजर्‍याकडे
निघाले होते बाहेर ज्या पिंजर्‍यातून...त्याच पिंजर्‍यात...
परत बसले जाऊन.....!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अजून एक गोष्टः मला 'स्वातंत्र' हा शब्द नवीन आहे..
मी आजपर्यंत 'स्वतंत्र' आणि 'स्वातंत्र्य' हे दोन शब्द वाचले होते.

'स्वातंत्र' हा शब्द आहे का?