बातम्या.कॉम या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत !

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

बातम्या.कॉम (http://www.batmya.com/)या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत !

आजपासून बातम्या.कॉम, मायबोलीचा (मायबोली वेबसमुहाचा), एक भाग झाली आहे.

२००५पासून आंतरजालावर असलेल्या बातम्या.कॉमने अनेक स्थित्यंतरे पाहिली. गेली २-३ वर्षे मराठी वेबसाईटिंपैकी ती एक अग्रगण्य वेबसाईट झाली आहे. वेगवेगळ्या मराठी/इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातम्या एका जागी पाहता याव्यात याची सोय या वेबसाईटवर आहे. गेल्या काही वर्षांत बर्‍याच मराठी वेबसाईट निघाल्या, पण त्यातल्या बहुतेक संकेतस्थळांनी कथा/कविता/ललित लेख/प्रकाशचित्रे/सोशल नेटवर्किंग यांवर भर दिला. कुठल्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग नसलेली, फक्त बातम्यांचे एकत्रीकरण करणारी बातम्या.कॉम ही वेबसाईट या पार्श्वभूमीवर नक्कीच वेगळी उठून दिसते. आणि वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादावरून ती यशस्वी होते आहे, हे सिद्धही होतं.

मायबोलीवर सध्या असलेला बातम्यांचा विभाग (बित्तंबातमी) बातम्या.कॉमच्या तुलनेत अगदीच प्राथमिक आहे. आता बातम्या.कॉम मायबोली वेबसमूहाचा अधिकृत भाग असल्याने, मायबोलीवरचा हा जुना विभाग लवकरच बंद केला जाईल. बातम्या.कॉमवर नवीन सुविधाही दिल्या जातील. मायबोलीच्या प्रथेप्रमाणे (आधी केले, मग सांगितले) आत्ताच त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही.

जगभर पसरलेल्या मायबोलीच्या वाचकांना ही सुविधाही आवडेल, अशी आशा आहे.

बातम्या.कॉमच्या वाचकांचेही आम्ही मायबोली परिवारात हार्दिक स्वागत करतो.
Marathi news online from many newspapers

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मायबोलीचे अभिनंदन, आणि बातम्या.कॉम चे स्वागत! ही साईट पाहिली नव्हती कधी, चांगली दिसते.

मायबोलीवर सध्या असलेला बातम्यांचा विभाग (बित्तंबातमी) बातम्या.कॉमच्या तुलनेत अगदीच प्राथमिक आहे. आता बातम्या.कॉम मायबोली वेबसमूहाचा अधिकृत भाग असल्याने, मायबोलीवरचा हा जुना विभाग लवकरच बंद केला जाईल. बातम्या.कॉमवर नवीन सुविधाही दिल्या जातील.

>>> अरे वा.. Happy

टीमच्या सार्‍या सदस्यांचे या प्रशंसनीय अशा उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन.

लागलीच पेज बूकमार्कही करून टाकले आहे.

बातम्या.कॉम आधीही मायबोलीकराचच होतं ना बहुतेक?

उभयतांचे अभिनंदन Happy

प्रशासन समीती,

त्या बातम्यांच्या पानावरून पुन्हा माबोवर कसे यायचे ते कृपया सांगावेत

बेफिकिर, तिथं सर्वात खाली मायबोली वेबसमुहातल्या सगळ्या संकेतस्थळांची यादी आहे. तिथून पाहिजे त्या संस्थळावर जाऊ शकतो.

Pages