Submitted by अमृता on 16 July, 2012 - 01:17
गेले तीनही वर्षी मी दुकानातुन नॅचरल क्ले आणुन गणपतीची मूर्ती घरी बनवली. यंदा शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची आहे. मूर्ती बनवण्यासाठी तयार माती मला कुठे मिळेल? पेणला गेलं तर सहज मिळेल का?
दुकानातील मातीने मूर्ती बनवणं त्यामानाने सोप आहे. शाडूच्या मातीने पण जमलं पाहिजे म्हणुन जरा लौकर आणावी म्हणत्ये, नाहीच जमल तर दुकान आहेच जवळ.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुकानात ( गणपती कारखाण्यात)
दुकानात ( गणपती कारखाण्यात) मिळते ती शाडुची माती नसते का ?
अमृता तुम्ही मुंबई मध्ये असाल
अमृता तुम्ही मुंबई मध्ये असाल तर, वरळी ला एक L S रहेजा नावाचे college आहे, तिकडे नंदू साखरकर नावाचे एक सर आहेत, मी त्यांच्या कडून क्ले वर्क शिकले त्यांच्याकडूनच मी शाडू माती आणायचे मुंबईत असताना,
तुम्हला हवा असल्यास वी पु तून मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर देते, त्यांचाशी बोलून तुम्हाला शाडू माती नक्की कुठून मिळवायची ते कळेल
शाडुची माती नसते का
शाडुची माती नसते का ?
>>
पीओपी असतं ते. पेणला आता माती मिळणं थोडंस कठीणच दिसतंय अमृता. इतक्यात तिथे गणपती बनुन तयार असतात. कुणी तिथे रहात असेल तर चौकशी करुन जा.
मला तरी POP पेक्षा shadu ची
मला तरी POP पेक्षा shadu ची माती काम करायला जास्त अवडते
नितीन, दुकानात मिळते त्यावर
नितीन, दुकानात मिळते त्यावर नॅचरल क्ले असचं लिहीलेलं असतं पण त्याला एक वेगळ्या प्रकारचा वासही येत असतो. त्यामुळे त्यात काहीतरी केमिकल असावं.
शिवाय यंदा मला दुकानातुन माती आणली असं न सांगता, ही शाडूची माती आहे अस सांगायचय
गीतु, थँक्स, नंबर वीपुतुन पाठवुन ठेवा.
ए नाही योडी, पिओपि नसतं ते.
ए नाही योडी, पिओपि नसतं ते. त्यावर लेबल नॅचरल क्ले म्हणुनच असतं आणि मस्त मउ मातीचा गोळा असतो.
हॉबी आयडीयाज मधे मिळते ती माती. पेपर क्ले पण मिळतो तिथे. शेवटी शाडूची माती नाही मिळाली तर ते ओप्शन आहेच.
अमृता, गणपतीच्या
अमृता, गणपतीच्या कारखान्यातल्या मातीबद्दल सांगितलं मी. नितीननेही गणपतीच्या कारखान्यातल्या मातीबद्दलच विचारलंय. नॅचरल क्ले मी पाहीली नाहीय अजुन.
me pencha aahe amcha karkhan
me pencha aahe amcha karkhan ahe ganesh murtincha trample penla ya me gheun dein!
kiti pramanat haviy mati ?
(No subject)
आम्ही दरवर्षी शाडुचा गणपती
आम्ही दरवर्षी शाडुचा गणपती करतो. शाडु मी आधी पेणहुन आणायचे. पण आता ठाण्यातील पर्यावरण शाळेमध्ये (न्यु इंग्लिश स्कुल, राममारुती रोड, ठाणे) शाडु मिळते. पर्यावरण शाळा शनि-रवी सुरु असते.
ओह!! ओके योडी.. केदार थँक्स.
ओह!! ओके योडी..
केदार थँक्स. पेणला आले तर नक्की फोन करेन. मला साधारण १० इंचाची मूर्ती बनवण्यासाठी माती हवी आहे.
स्नेहश्री, ग्रेट!! ह्या विकेंडलाच ठाण्याला चक्कर मारते. थँक्स
अमृता, एकदा केश्विनीशी बोलून
अमृता, एकदा केश्विनीशी बोलून घे.
ओके मेल टाकते तिला. जमलं तर
ओके मेल टाकते तिला. जमलं तर मला तिचा नंबर समस कर. माझ्याकडे नाहिये तिचा नंबर.
पुण्यात भोअरी आळीत शाडूची
पुण्यात भोअरी आळीत शाडूची माती मिळते. मोठे पुरवठादारही आहेत. मात्र ही माती त्यान्चेकडे मुम्बैहूनच येते. मुम्बैमधे कित्येक वर्षान्पुर्वी धारावी/सायन पाशी बरीच मोठमोठी (ट्रकलोडने विकणारी) दुकाने होती, सध्याचे माहित नाही. मात्र हार्डवेअरच्या दुकानात विचारले (जिथे खिळे/तारा/पेण्ट वगैरे मिळते) तर माहिती मिळू शकेल.
पुण्यात मात्र मी कसबा पेठेमधे एक गणपतीचे कारखानदार आहेत त्यान्चेकडून घ्यायचो. (पीओपी/शाडू/रबर/रन्ग इत्यादी)
खर तर मला "ठान क्ले" किन्वा "थान क्ले" कुठे मिळेल ते हवय कुणाला माहित असल्यास नाव/पत्ते सान्गाल का? ही थान क्ले देखिल धारावीमधे मिळायची, पण मी गेलेलो ते साल होते १९८५. आता तिथला नकाशा पार बदललाय येलो पेजेस वर देखिल काही माहिती मिळत नाही, व जे या मातीत काम करणारे आर्टिस्ट आहेत, त्यान्चे कडून माहिती मिळत नाही. असो.
एक अनाहूत सल्ला: केवळ गणपतीमधे घरी बसवायची मूर्ति करायची असेल तर सरळ लाल माती/काळी माती वापरा. कारण शाडूमधे केलेली मूर्ति अतिशय नाजुक् (ठिसुळ या अर्थाने) बनते.
अमृता, तु वरती पेपर क्लेचा
अमृता, तु वरती पेपर क्लेचा उल्लेख केलायस म्हणुन, पेपर क्ले घरी बनविता येईल. टिशु पेपर वापरुन क्ले तयार केला तर अगदी छान मऊसुत क्ले तयार होतो. व्हाईट ग्ल्यु+टिशु पेपर+ जाँइट कंपाउंड+ ऑल पर्पज फ्लॉअर. आम्ही गेल्या दिवाळीला बोल केलेले. मुर्तीच मात्र माहित नाही.
अर्थात तुला या मार्गाने शाडुच्या मातीची सर नाही येणार.
पुण्यात म्हात्रे पुलापासून
पुण्यात म्हात्रे पुलापासून नवी पेठेकडे जाताना डावीकडे मूर्तीकाम करणारे कलाकार राहतात. ते कोरडी अन ओली- छान मळलेली शाडूची मातीही देतात. मी तिथूनच आणते
धन्यवाद लिंबू, सीमा आणि
धन्यवाद लिंबू, सीमा आणि अवल
लिंबू, लाल माती आणि काळी माती वापरली तर तिला तेवढा चिकटपणा असतो का? मूर्ती ८ ते १० इंच मोठी असते त्यामुळे सांभाळता येइल असं मला वाटतं. होय ना?
सीमा, तो विचार केलेला मी पण त्याला तेवढा स्मुथनेस नसतो असं मला वाटत.
अमृता लाल माती आणि काळी माती
अमृता लाल माती आणि काळी माती वापरली तर तिला तडे जाऊ शकतात आणि गणपती हा आपल्या जिव्हाळा आणि भावना श्रद्धा हा विषय आहे नंतर मग शांती वगरे करण्यापेक्षा शाडू माती आणि कागद्याचा लगदा यापासून गणपती बनव YouTube वर भरपूर video मिळतील तुला कसे बनवायचं ते !
शुभेच्छा तुला