Submitted by ज्ञानेश on 11 July, 2012 - 01:24
=======================
संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही
तुझ्या कृपेची वर्षा झाली.. निरभ्र झाले
अजून शिल्लक भिंतीमधली ओल तरीही
काठावरती बसणे बहुधा रम्य असावे
आपण जावे जमते तितके खोल तरीही
भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही !
आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !
पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...
-ज्ञानेश.
========================
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अशक्य आहात देवसर
अशक्य आहात देवसर ....................
तुमच्या अशक्यतेला त्रिवार मुजरा................
_ _ _///\\\_ _ _ !!!!
अशक्य आहात देवसर
अशक्य आहात देवसर ....................
तुमच्या अशक्यतेला त्रिवार मुजरा................
_ _ _///\\\_ _ _ !!!!
अशक्य आहात देवसर
अशक्य आहात देवसर ....................
तुमच्या अशक्यतेला त्रिवार मुजरा................
_ _ _///\\\_ _ _ !!!!
आवडली
आवडली
छान गझल..! शेवटचे २ फार
छान गझल..!
शेवटचे २ फार आवडले..!
अप्रतिम ... व्वा !!!
अप्रतिम ... व्वा !!!
आपण जावे जमते तितके खोल
आपण जावे जमते तितके खोल तरीही
--- वा ज्ञानेश! उत्तम गझल, अंतिम शेर खास!
जयन्ता५२
हीसुद्धा आत्ताच वाचली, सुंदर
हीसुद्धा आत्ताच वाचली, सुंदर !
Pages