Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
पुदिन्याचे एक कांडी पण मस्त
पुदिन्याचे एक कांडी पण मस्त रुजते. माझ्याकडे छान फोफावलाय सध्या पुदिना.
मी टॉमेटो आणि वांग्याचं बी आणलय. आता जरा मोठी कुंडी आणुन पेरेन त्यात.
गेल्या वर्षी मिरच्या लावलेल्या. झकास तिखट जाळ मिरच्या आल्या. बहर गेल्यावर रोपं कापली तर परत पालवी फुटुन फुलं आली आहेत.
ओव्याचं रोप आहे माझ्याकडे पण कधी त्याला ओवा आलेला नाही पाहिलाय. काही शेंग वगैरे असते का?
ओव्याचं रोप म्हणजे गोल , जरा
ओव्याचं रोप म्हणजे गोल , जरा जाडसर पानं आहेत का ? तर ते खरं ओव्याचं झाड नाही. सेज कुळातलं रोप असेल, पानांना ओव्यासारखा वास, स्वाद असतो. कोकणी लोक त्याला सारसांबार्या पान म्हणतात. याची भजी किंवा कच्ची तांबळ्ळी ( आमटी ) मस्त लागते. चटणीत / कढीत पण छान लागतात ही पाने.
ओवा बडिशेप / जिरे / धणे / कोथींबीर कुटूम्बातला - त्याची पानं बडीशेपच्या पानांसारखी असतात .
http://www.maayboli.com/node/2590?page=9 इथे आहे पहा एक फोटो. शिवाय जागूने पण एकदा टाकला होता
काल अन परवा मस्त हवा होती एकदम . बरंच बागकाम झालं
वांगी, भेंडी , मटार, पापडी, मुळा, लाल माठ, मायाळू, अंबाडी , चार्ड, अरुगुला अन दोन प्रकारचे टॉमेटो एवढ्या बिया लावल्यात . अजून थोडे पॉटिंग ट्रे आणून दोडके, मिरच्या, काकडी अन बीटरूट लावायचेत.
बरोबर मेधा. माझ्याकडे तू
बरोबर मेधा. माझ्याकडे तू म्हणत्येस तसलच रोप आहे. भजी छान होतात त्याची. आणि पानांची चव डिट्टो ओवा.
सुन्दर धागा..माझं सगळं वाचून
सुन्दर धागा..माझं सगळं वाचून झालं नाहीये पण कुणी पटकन सांगु शकेल का?
मी मेथी दाणे पाण्यात भिजवून मग लावलेली ही मेथी केव्हा काढायची?? मेथी लावण्याची शक्कलसांगण्याअबद्दल आभार्स लोला...it worked...:)
अरे माझा हच प्रश्न आहे वेका.
अरे माझा हच प्रश्न आहे वेका. लोलाची श्क्कल कितव्या पानावर आहे?
लोलाने मला दिनेशदांच्या
लोलाने मला दिनेशदांच्या रेसिपीमध्ये सुचवळ होत की मेथीदाणे पाण्ञात भिजवुन फुलले की मोड यायच्या आधी पेरले तरी उगवतात हे त्या प्रयोगानंतर आलेली रोपे....:) नक्की लावून पहा...:)
वेका, ही अजून लहान दिसते आहे.
वेका, ही अजून लहान दिसते आहे. वाढूदे थोडी. आपण पेंडी आणतो त्यातल्या उंचीची झाली साधारण की काढ.
ओके लोला.. माझ्या लेकाने काही
ओके लोला..:) माझ्या लेकाने काही रोपांना अति प्रेमाने पाणी फवारून झोपवलंय....:)
जरा उन लागलं की उठतील.
जरा उन लागलं की उठतील.
हो त्याला करमणुक म्हणून
हो त्याला करमणुक म्हणून लावते एक दोन Handy plants like BAsil, tomato, mint, थोडी फुल इ.लहान मुलांना पाणी घालायच आणि टॉमेटो खायचं काम करायला फार्र्फार आवड्तं असं मला एक वाट्त
माझ्यकडे हळद आलीय(आली बाई
माझ्यकडे हळद आलीय(आली बाई एकदाची). अहा! किती महिने वाट पहात होते.(फेब्रवारी पासून लावली ती आता आली). देशी दुकानातून सफेद हळद आणली(आंबेहळ्द नाही आवडत चवीला...व खायला). भिजवून ठेवली धूवून बादलीत. पुन्हा एकदा साफ धुतली विनेगारने... व लावली मातीत. मस्त सुंदर वासाची पानं आलीत.
उन्हाळ्यात येते वाटते. आनंद झालाय एकदम.
ह्यावेळेला बरेच यश आले असले प्रकार लावण्यात. हळद, गलांगल, लेमन्ग्रास,आलं,लसूण वगैरे.
सभासद झालेय आत्ता... प्रथमच
सभासद झालेय आत्ता... प्रथमच लिहीतेय, मागील बरेच महिने मायबोली वाचतेय, जास्त करुन बागकाम, आहार तसेच बाकीचेही मजकुर वाचते... पुन्हा भेटू.
मी मागे हळद आणून कापडी पिशवीत
मी मागे हळद आणून कापडी पिशवीत ठेवली होती. मागील आठवड्यात छान कोंब आले. परवाच लावली टबमध्ये.
मला मेथी छळते...मी छोट्या
मला मेथी छळते...मी छोट्या आइस्क्रीम टब मध्ये लावते...पण फंगस येतं
किती मेथी दाणे फुकट गेले माझे मला माहीत..
अजुन एका कुंडित छोट्या गोगलगाई आल्या आहेत बिया खाउन टाकतात्...काकडी लावते तर दुसर्यादिवशी फक्त टरफल असतात...
गोगलगाई साठी तंबाखूची पुड
गोगलगाई साठी तंबाखूची पुड टाक, मरतात त्या. मलाही इथेच सांगीतला होता हा उपाय कोणितरी. मला वाटत शशांक किंवा जिप्सीने.
सिमला मिरची कशी लावायची? कोणी
सिमला मिरची कशी लावायची? कोणी मदत करु शकेल का?
चिऊ, पान नं ६ वर बघ, सिमला
चिऊ, पान नं ६ वर बघ, सिमला मिर्चिबद्द्ल माहिती आहे. अजुन पुढे पण असेल माहिती..
इकडे सगळे दमले वाटते बागकाम
इकडे सगळे दमले वाटते बागकाम करुन.... कोणीच येत नाहिय.... हा... हाहा... हाहाहा...
दिनेशजी बाटलीमधे टॅमेटो ची
दिनेशजी
बाटलीमधे टॅमेटो ची लागवड करतात
त्या बद्दल अधिक माहिती आहे का कोणाकडे
मी बागकाम सुरू करतोय माझ्या आजोबांच्या बागेत
मला जरा मदत हवी आहे - मी
मला जरा मदत हवी आहे -
मी सध्या मेलबर्नला आहे. मी आधी कधीही झाडं लावलं नव्हतं. इथे कोथिंबिरीच्या बिया मिळाल्या त्या किट्मधेच लावल्या - प्लास्टीकचा उभा असा बॉक्स होता, कोंब फुटला की कुंडीत लावा असं लिहीलं होतं त्यावर. त्याप्रमाणे आम्ही कुंडीत हलवलं, पण ते हलवताना रोप तिरकं झालं, मला वाटलं होईल नंतर सरळ, पण अजूनही तिरक्याचं वाढतायत काड्या आणि मी रोज थोडं पाणी घालत होते, कुंडी खिडकीत होती जिथे सूर्यप्रकाश छान येतो. पाणी जास्त होऊ शकतं का ? काल वर वरची माती बुरशी आल्या सारखी दिसली, म्हणून मी पाणे घालणं थांबवलं आणि आज वरची माती काढून टाकली, त्यात ती रोपं अजूनचं हाताळली गेली अरेरे , काय करती येईल की रोपं जगतील आणि सरळ राहतील ?
सल्ला द्या माझ्या लेकीला
सल्ला द्या
माझ्या लेकीला शाळेत प्रॉजेक्ट होता की माती वीना उगवणारी झाडे. मी त्या करीता गाजर आणि मोड आलेला बटाट्याचा काप एका बशीत पाण्यात घातला होता. आता प्रोजेक्ट संपला. दोन्हीला छान कोंब / हिरवे पान आले आहेत. हे जर आता कुंडीत लावले तर काही फायदा आहे का? की फेकुन देउ?
मोकिमी, मी मागे असं गाजर मोड
मोकिमी, मी मागे असं गाजर मोड आलेलं गाजर लावलेलं. मस्त झालं ते रोप मग त्याला सुंदरस फुलही आलं. मला वाटलं खाली छान गाजर तयार झालं असेल म्हणुन पाहिलं तर काही गाजर नव्हतं. मग मला माझ्या सासर्यांनी सांगितलं की नंतर बीया येतात त्या रुजवल्या तर मग खाली गाजरं येतील. अशी गाजरं तयार होत नाहीत.
तु ते गाजर कुंडीत लावलस तर तुला नंतर बीयाणं मिळेल जे पुन्हा गाजराची रोपं लावालया उपयोगी होइल.
माझ्याकडे त्या फुलाचा फोटो आहे सापडला की टाकते.
प्राजक्ता, बुरशी येत्ये तर
प्राजक्ता, बुरशी येत्ये तर पाणी जास्त झालेलं असु शकतं. जगतील रोपं, पाणी जरा कमी घाल. आणि हो घरातले धणे पेरले तरी मस्त कोथिंबीर उगवते.
@ अमृता , अगं मला त्या बिया
@ अमृता , अगं मला त्या बिया धनेचं वाटल्या होत्या
पाणी अगदी थोडं घालून बघते आता, धन्यवाद
समुद्र मेथि वालुमिश्रैत मातित
समुद्र मेथि वालुमिश्रैत मातित लावावि छान ऊगवते.पुदिना पन काद्या लावल्यास छान पालवि फुतते
समुद्र मेथि वालुमिश्रैत मातित
समुद्र मेथि वालुमिश्रैत मातित लावावि छान ऊगवते.पुदिना पन काद्या लावल्यास छान पालवि फुतते
मी मिरची लावली आहे. रोप ५-६
मी मिरची लावली आहे. रोप ५-६ इंच वाढल आहे पण त्याला आता खुप दिवस झाले आहेत. काय करु मी? मीरची चे रोप वाढायला किती दिवस लागतात?
हेल्लो : मि पहिल्यअन्दा
हेल्लो :
मि पहिल्यअन्दा लिहित आहे.
मिर्चिचे रोप कुंडीत लगेल का, किति वाढते अनि कसे लावायचे
आमच्याकडे शेंगांचे (पावटे,
आमच्याकडे शेंगांचे (पावटे, इ.) वेल आपोआप इतर झाडांच्या कुंड्यांमध्ये येतात, फार वाढत नाहीत, रिलोकेट ही नाही करता येत, दर वेळी काढून टाकावे लागतात...
अरे .. पहिल्यांदाच पाहिला हा
अरे .. पहिल्यांदाच पाहिला हा धागा... मी पण सध्या भाजि लवली आहे .... कालच काकडीला आणी कारल्याच्या वेलाला आलेले १ सेमी चे फळ धरलेले पाहून उत्साह वाढला आहे ... मेथी आणी कोथिंबीर पण ३-४ इंच झाली आहे ... ह्या सगळ्यावर किड पडु नये म्हणून काय काळजी घ्याय्ची??? ... कोणीतरी उत्तर लिहा प्लीझ.... मी तसे हळद आणी हिंगाचे पाणी फवारले आहे .... आणी काय कराय्चे??
Pages