मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे कारल्याच्या वेलीला फक्त दोनच मादीफुले आली. रोज एक्-दोन नरफुले येत आहेत. २ मादीफुलांपैकी एकाला फळ लागले. तेही बर्यापैकी मोथे झाले. पण अजून मादी फुल आले नाही. मादीफुलांची संख्या कमी असते का?

तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहून मी एक मोठ्ठी कुंडी आणली आणि त्यात धणे आणि लसूण लावला आहे. बघू काय होतं ते!

कढिपत्याची कुंडी आणि मातीपण बदलली, सगळ्यांचा हेल्दी कढिपत्ता पाहून.

गाजराचं वरचा भाग कापून पाण्यात ठेवलाय. त्याला छान कोंब फुटून बोटभराच्या वर वाढलंय. ते नंतर कुंडीत लावून त्याला बी येतं असं इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय. ते किती मोठं होईपर्यंत पाण्यातच ठेवायंच कोणी सांगेल का? का आता कुंडीत मातीत लावू?

~साक्षी.

तशी मादीफुलांची संख्या सर्वच वेलात कमीच असते.
मोहरी कुंडीत जास्त झालीय. एवढ्या कुंडीत फारतर दोन तीन झाडे वाढू शकतील. कूजली म्हणजे पाण्याचा निचरा झाला नाही. देठ लवचिक आहेत म्हणजे उनही पुरेसे मिळाले नाही.

मीही कार्ले लावलेय अनेकदा. एका रोपावर ५-६ कारल्यांशिवाय जास्त काही हाती लागले नाही. कुंडीत जास्त फुले येत नाहीत असा माझा अनुभव आहे. तेच जमिनीत मात्र भरभरुन येतात. आता कंपोस्टींग सुरू करतेय, त्याचा अनुभव बघते कसा येतो.

इच्छुकांनी हे बघा...

http://www.urbanleavesinindia.com/

मी यांना भेटुन आलेय Happy होम कंपोस्टींग म्हणुन लेख आहे तो प्रयोग कालपासुन सुरू केला. दिनेशनी दिलेल्या बिया आहेतच. त्यांच्यापासुन सुरवात करेन Happy

तसे मी घरी वर्मीकंपोस्ट आधीही केले होते. रिझल्ट खुप छान होते. पण नंतर इतर भानगडीत तिकडे दुर्लक्ष केले. आता मात्र एकदम सिरियस आहे. घराशेजारच्या जमिनीत काही करण्याचा प्रयत्न फसला, शिवाय माझी सोन्यासारखी, मी अनेक वर्षे जपलेली अळु, तोंडली इ. उंदरांनी खाऊन टाकली. त्यामुळे आता परत टॅरेस गार्डनींग.....

तुला थाई चिलीजचे बी म्हणायचं आहे का?अ‍ॅमेझॉनवर मिळते.कसे असते ते माहित नाही.पण पूर्वी बघितल्याचे आठवत आहे.

इं ग्रो मध्ये मिळणार्‍या मिरच्या वाळवून त्या बिया वापरता येतात. मी मिरच्यांचं झाड असेच लावले आहे.

सीड्स ऑफ ईंडिया इथून मायाळू, हिरवी अंबाडी अन दोडके यांच्या बिया मागवल्या होत्या. शिवाय इकडच्या स्थानिक काही बिया ही घेतल्यात यावर्षी.
चार्ड, मायाळू, अंबाडी, बेसिल, थाइ बेसिल हे मागच्या आठवड्यात लावलेत. चार्डाचे कोंब साधारण २ इंच झालेत .
बुधवारी इंग्रो मधून अरवीच्या कुड्या आणल्यात. त्या, लेमन क्यु़कंबर, अरुगुला , भारतातून आणलेले लाल माठ अन मुळा यांचे बी येत्या दोन तीन दिवसात लावीन.

एका मित्राने छोटे जपानी टॉमेटॉचं बी देणार म्हणून सांगितलंय.

आता फक्त माळ्याच्या मळ्यामंदीची एम पी ३ मिळवायला हवी Happy

मागेही मी एकदा अननसाचा वरचा भाग कापून लावला होता, पण थोड्याच दिवसात तो पिवळा पडला.
आताही मुलीसाठी पुन्हा लावला आहे, पिवळा न पडण्यासाठी काय करु? (कुंडीत लावला आहे)

मलाही लावायचा आहे अननस.. दिनेश मार्गदर्शन करा Happy

साक्षी, वांगी आणि भेंडीच्या बिया मिळतात दुकानांमध्ये. त्या आणुन तु लावु शकतेस. कुंडीत लावायचे असल्यास एका कुंडीत एकच झाड असलेले बरे असते. बिया टाकुन त्या रुजून ५-६ पाने फुटली की मग कुंडीत लाव ते रोप.

साधना, अननसाला तशी जास्त काळजी करायची गरज नसते. अननस घेताना मात्र ताजा घ्यायला हवा.
त्यासाठी अननसाच्या तूर्‍यातले मधलेच एक पान ओढून बघायचे. त्याचा तळाचा भाग शुभ्र असायला हवा.
आपल्याकडे बाजारात अननस येतात ते जरा कच्चेच तोडलेले असतात. आणि पिकण्यासाठी उलटे म्हणजे खाली पाने वर बुड असे ठेवलेले असतात. पण तरीही ते जगायला हवेत. तो तूरा कापून काही दिवस ग्लासात ठेवला, तरी त्याला मूळे फूटतात, मग तो मातीत लावायचा.

गोव्याला जाताना, बांद्याजवळच एक मोठी अननसाची बाग आहे. तिथे ताजे अननस कापून, किंवा त्याचा रस काढून पण देतात. गोव्यालाच फोंड्याला जातानाच्या वाटेवर, बालाजी मंदीराकडे एक बाग आहे, तिथे पण अननसाची लागवड केलीय. गोव्याचा अननस थोडा वेगळा असतो. तो जास्त गोड असतोच शिवाय मुरमुरत नाही. त्याचा गर पिवळा नसून पांढरा असतो, तसेच त्यात अगदी छोट्या काळ्या बिया पण आढळतात. (अर्थात बिया रुजणार नाहीत.) तिथेच बाजारात कधी कधी असे अननस असतात, कि त्याच्या मूळाकडून दोन तीन फूटवे फुटलेले असतात. ते मिळाले तर फारच छान.

धन्यवाद दिनेश. पाण्यात बुडवुन ठेवायचे माहित नव्हते. मी मागे एकदा असाच कुंडीत रोवला होता आणि मग तो कुसला Sad

गोव्याला जायची खुप इच्छा होतेय.... Sad

तूरा कापल्याबरोबर लगेच पाण्यात ठेवायचा. आता या दिवसात गोव्यात अनसाफणसाची भाजी हा मस्त प्रकार करतात. मी फोटोसकट कृति लिहिली होती. (अननस, फणस आणि रायवळ आंबे यांची रसभाजी.)

Happy

जामोप्या, दुकानात मिळणारे गहू आणून मातीत पेरायचे. त्याला नियमित पाणी घालायचे.
जर व्हीट ग्रासचा रस हवा असेल तर साधारण ५ बाय ५ किंवा ६ बाय ६ इंच अशा आकाराच्या अन साधारण ४-६ इंच खोल कुंड्या लागतील. आमच्या इथे कंटेनर मिक्स किंवा पॉटिंग मिक्स या प्रकारची माती मिळते. पाण्याचा चांगला निचरा होणारी पण ऑर्गॅनिक कंटेंट जास्त असलेली माती चांगली.
रसाकरताच उगवायचे व्हीट ग्रास कोंब आल्यापासून ६-७ दिवसात वापरण्यायोग्य होते. रोज एकेका कुंडितल्या ग्रासचा रस काढला तर ८ कुंड्या लागतील. दर दिवशी एकेक कुंडीत गहू पेरायला सुरवात केली तर ८ दिवसांनी रोज एकेक कुंडीतले गहू रस काढण्यायोग्य होतील. गहू अगदी गच्च दाटीवाटीने पेरायला हवेत. बहुतेक एकेक दाणा पेरण्याऐवजी गहू पसरून त्यावर मातीचा थर घातला तर ते सोपं पडेल.

दिनेशदा
मी फोटोसकट कृति लिहिली होती. (अननस, फणस आणि रायवळ आंबे यांची रसभाजी.)>>

ही लिंक कुठे मिळेल.

Pages