"सत्यमेव जयते" भाग ८ (Poison On Our Plate?)

Submitted by आनंदयात्री on 24 June, 2012 - 03:35

आज, २४ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस,
you are not making sense anymore. माफ करा.
डॉक्टरांच्या धाग्यावरच्या तुमच्या काही पोस्टी चांगल्या होत्या तेव्हा अपेक्षा होती. असो.

ज्ञानेश, साधना, मयेकर, माधव- पोस्ट आवडली.

उत्पादन जास्त हवे या करता शेतित रसायनिक खत वापर, मग pesticides चार्यात - गायच्या दुधात.
मेजोरिटि पिपल मेनट्यालिटि "मरने दो सालो को मेरा क्या जाता हे" too bad
-Vet Doc.

जर तुम्हा आम्हाला औषधांचा, किड्या मुंग्यांचा, ब्याक्टेरियांचा, अन तसल्या हजार गोष्टींचा रेझिस्टन्स येत नसेल तर आपण 'सर्वायव्ल ऑफ फिटेस्ट' मधे निकम्मे ठरून या जगातून गायब होऊ हेही तितकेच नक्की! >> इब्लिस, तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण दहाच पिढ्यांमध्ये अशी प्रतिकारशक्ती येत नाही. तुम्ही म्हणता तसे बदल नक्कीच झालेत दहा पिढ्यात पण ते मोजता येण्याइतपत ठळक आहेत का?

मृदुलाने म्हटल्याप्रमाणे त्याकरता खूप जास्त पिढ्या जाव्या लागतील आणि कदाचीत इथे आपण कमकुवत ठरू कारण माणसाच्या एका पिढीचे आयुर्मान हे आज खूप जास्त आहे. मग आपला ही कमकुवत बाजू ओळखून त्यावर वेळीच उपाय नाह केले तर आपल्या बुद्धीचा काय उपयोग? किड्या मुंग्यांचा, ब्याक्टेरियांचा, अन इतर हजार नैसर्गिक गोष्टींचा रेझिस्टन्स उत्क्रांती होताना ठरेलच पण औषधांचा वापर ही आपल्या अखत्यारीतील बाब आहे.

इब्लिस, तुम्ही टेरॅटोमा पाहिलेयत ना पण! मग कुठल्या टेरॅटोमावर बोर्ड असणार आहे का की मी पेस्टिसाईडमुळे झालो असा. किती टेरॅटोमा असलेल्या व्यक्तींचि तुम्ही रक्तातील पेस्टिसाईडच्या प्रमाणासाठी चाचणी केलीयत ?
कासरगौडचे उदाहरण अत्यंत खरे आहे. आणि आता कासरगौड मध्ये पेस्टिसाईड स्प्रे बॅन्ड आहे . आमच्या कर्नाटकाचा जो भाग कॅसरगौडला लागून आहे तिथे ही स्टेज यायला अजून वेळ लागला.
इकडे ग्रामिण भागात राहायला आल्यावर सरकारि नोकरीत तर दिवसाला ५-६ ओपी पॉईजन हँडल केलेत. मुंबैत असेपर्यंत बेगॉन , टिक २० असेच प्रकार येत त्यांच्या पॉईजनची लक्षणे आपल्या पुस्तकात दिल्यासारखी असत आणि पुस्तकातल्या गाईदलाइनप्रमाणे त्याम्चे इलाज होत. आता इकडे गावात अक्षरशः शेकडो प्रकारची ओर्गॅनोफॉस्फरस ओर्गॅनोक्लोरस कंपौम्ड शेतीसाठि म्हणून उपलब्ध्ह आहेत आणि आत्महत्येसाठी सुद्धा. त्याम्ची लक्षणे इतकी वेगवेगळी आहेत की आम्हालाच अँटिडोट चा डोस कसा अ‍ॅडजस्ट करायचा हा प्रश्न पडतो. सविस्तर तुमच्या विपूत लिहेन. मुंबैत जर असा डाऊत आला तर आम्हाला पॉईजन प्रोफईल टेस्टिंग किंवा ट्रिटमेंतसाठी सिरम कोलिन इस्टरेज मॉनिटर करता येत होतं. इथे अंदाजपंचे दाहोदरसे . आता माझ्या प्रायवेट आयसियूतही या क्षणि २ ओपी अ‍ॅडमिट आहेत कारण अजून पावसाची चिह्ने नाहीत आणी मागची तीन वर्षे इथे दुष्काळ!

पण अमिरखान एकच एक गृहितक डोक्यात ठेवून ते आपल्यावर ठसवण्याचा प्रयत्न करतो हे समजतच. या एपिसोडमधलं त्य त्याचं ' कहा लाखोंके पेस्टिसाईड्स और कहा ये ५ रु का फ्लाय बोर्ड ' हे असंच एक हास्यास्पद वाक्य !
अरे माणसा लाख रूपयाम्चे पेस्टिसाईड किति एरिया कव्हर करतात आणी तुझा ५ रुचा बोर्ड किति एरिया कव्हर करतो ते तुलनात्मक सांग ना! उगाच हश्या आणि टाळ्या मिळवायला काहि काय आचरटासारखं बोलायचं ?

अमिर खान नक्कीच महत्वाचे विषय हाताळतोय. पण दोन्ही बाजुंचे मुद्दे चर्चेत नीट येत नाहित हे ही खरच.
<< पण अमिरखान एकच एक गृहितक डोक्यात ठेवून ते आपल्यावर ठसवण्याचा प्रयत्न करतो हे समजतच. >>+ १

माधव, मृदुला, मुद्दा व्हॅलिड आहे. मान्यही आहे. छोटा लाईफस्पॅन असलेल्या प्राण्यांत आपल्याला असले बदल फार प्रकटपणे दिसतात. पण त्याच वेळी आपल्या शरीरांतही बदल होत आहेत व होतात हेही मान्य केलेच पाहिजे.
प्रतिकारशक्तीचे सरळ सोपे उदाहरण : दिल्ली बेली. तेवढंच कशाला? प्रवासात 'पाणी' बदललं की तुमचं आमचं पोट खराब होतं. ज्या गावी गेलेलो असतो तिथले लोक त्याच पाण्याने काहीही न होता सुखी असतात.
पण जर या सगळ्या 'पॉयझन्स' चे परिणाम इतके भयंकर होत असतील, तर गेल्या ५० वर्षांत जगाची / भारताची लोकसंख्या वाढते का आहे? बालमृत्यूंची संख्या कमी का होते आहे? शुद्ध सेंद्रिय शेतीने इतकी तोंडे पोटभर खातील याची व्यवस्था करणे कितपत शक्य आहे? इ. प्रश्न येतात.
हीच दुसरी बाजू मी सांगतो आहे.
रैनाजी म्हणतात i am not making sense.
रैनाजी, शुद्ध ऑक्सिजन किंवा शुद्ध पाणी यानेसुद्धा 'टॉक्सिसिटी' होऊ शकते. मतलब ये भी 'जहर' है क्या?

लोकसंख्या वाढायला आणि कमी व्हायला पेस्टिसाईड हा एकच एक घटक जबाबदार असता तर नक्कीच कमी झालि असती लोकसंख्या. पण वॅक्सिनेशन, अँटिबायोटिक्स , नवनव्या सर्जर्‍या, औषधे आणि काही वेळा राजकीय स्थैर्य, सरकारी पॉलिस्या हे सगळं आणि कित्येक आणिक काही जबाबदार असतं.

साती
संपूर्ण पोस्टला अनुमोदन.

इब्लीस.. चर्चेचा फायदा हा असतो कि पूर्वग्रह निघून जाण्यास मदत होते.

स्लो पॉझनिंग मुळे फक्त मृत्यूच होतात असं नाही. आरोग्यावर घातक परिणाम होतात. सार्वजनिक आरोग्यावरही निश्चित परिणाम होतात. केमिकल वॉरफेअर केमिकल एजंटस असा सर्च देऊन पहावा...

इब्लिस,
अहो, मी अनुमोदनही कुठल्या लोकांना दिलेय तेही पहा. त्यांनीही तुमच्यासारखीच मते मांडली आहेत की उत्पादन वाढवायला इतर पर्याय काय वगैरे.

शुद्ध प्राणवायु, आणि पाणी. ठिके. तरीही आपण consume करत असलेले toxic products हा विषय फालतु आहे असे नाही ना?

साती +१.
पण अमिरखान एकच एक गृहितक डोक्यात ठेवून ते आपल्यावर ठसवण्याचा प्रयत्न करतो हे समजतच.>> तरीही साती ते तसे नसते तर किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता असे वाटते खरे. कुठल्याही सादरीकरणाला एक भूमिका असणारच की. एकांगीपणा कमी करता येऊ शकतो, पूर्ण नाहिसा करता येत नाही.
एका तासात तो अजून कायकाय करणार? यातल्या प्रत्येक प्रश्नावर लोकांची हयात जाते काम करण्यात इतके ते प्रश्न गुंतागुंतीचे आहेत.

रैनाजी, मी फक्त इन्सेक्टीसाईड प्रकरणात दुसरीही बाजू आहे असे म्हणतो आहे. तुमच्याशी भांडण करत नाहिये.

अर्धशिक्षित शेतकर्‍यांच्या / शेतमजुरांच्या हातात इतकी 'पोटंट' केमिकल्स दिली जातात की आपण कल्पनाही करू शकणार नाहीत. 'पावडर' मारताना, किंवा 'पंप' मारताना नुसत्या हवेतून नाकात जाऊन, अथवा त्वचेला स्पर्श झाला त्यातून विषबाधा झालेले रुग्ण येतात. सातीजींनी वर बरोबर सांगितले आहे.

कर्ज काढून मातीत घातलेले हजारो रुपयांचे बियाणे, तितकीच महाग खते अन त्यावर आजकाल सोन्यासारखं दुर्मिळ झालेलं पाणी शिम्पून उभं केलेलं पीक किडीला बळी पडून हातचे जाऊ नये म्हणून इकडून तिकडून ऐकून तो शेतकरी कायकाय फवारत असतो. यातलं बरंच काही आपल्या ताटापर्यंत पोहोचतं हेही बरोबर आहे.

त्यासाठी काळजी/प्रिव्हेन्शन म्हणून योग्य प्रमाणात अन योग्य तीच औषधे (कीटकनाशके) वापरली गेली पाहिजेत, ती वापरणार्‍यांना त्यांच्या हाताळणीचे योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. विषारी औषधाच्या डब्यावरच प्रथमोपचारासोबत, स्पेसिफिक अँटीडोट इ. उपचारांची माहीती लिहिली पाहिजे. अमुक नवे केमिकल वापरायला सुरू केले आहे याची कल्पना त्या भागातील डॉक्टर्सना दिली गेली पाहिजे इ. इ. अनेक मुद्दे माझ्या मनात आहेत..

<< कुठल्याही सादरीकरणाला एक भूमिका असणारच की. एकांगीपणा कमी करता येऊ शकतो, पूर्ण नाहिसा करता येत नाही.
एका तासात तो अजून कायकाय करणार? यातल्या प्रत्येक प्रश्नावर लोकांची हयात जाते काम करण्यात इतके ते प्रश्न गुंतागुंतीचे आहेत.>>

रैना, अनुमोदन. Happy

खरे तर विषय कीटक नाशकांचा आहे.. पण तरीही...

मागे एकदा "आज-तक" वर मी पहिले होते कि कश्या प्रकारे भाज्यांना इंजेक्शन टोचून अथवा रसायने फवारून-
१. त्यांचे रंग अधिक आकर्षक केले जातात (उदा. कलिंगड)
२. त्यांना कमी वेळात पिकवले जाते (उदा. त्यांनी दाखवले होते कि सकाळी वांग्यांना एक इंजेक्शन टोचले कि ४ तासातच ते पूर्ण पिकून मोठे झाले)
३. त्यांना टवटवीत केले जाते (उदा. त्यांनी दाखवले कि सुकलेल्या काकड्या एका रसायनाने भरलेल्या बादलीत टाकल्यावर एकदम ताज्या व टवटवीत दिसायला लागल्या)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी वापरली गेलेली रसायने व इंजेक्शने बाजारात अगदी सहज उपलब्ध आहेत.दुसरे म्हणजे एकवेळ कीटकनाशके वापरणे हि शेतकऱ्याची गरज असू शकते पण हे वरील उपाय म्हणजे निव्वळ लबाडी आहे..

अर्थात हा मुद्दा थोडा विषयांतर करतो.. पण आपण एकदम ताजी व टवटवीत भाजी घेण्याच्या नादात काय खातो आहोत याकडेही लक्ष दिले पाहिजे. आमीरने या मुद्द्याला हात लावायला हरकत नव्हती..

आमिरने हा भाग खुप एकांगी केला असे मत वर ब-याच जणानी व्यक्त केलेय. पण शेती हा विषय इतका व्यापक आहे की त्याच्या सगळ्या पैलुंवर एक तासाच्या भागात बोलणे शक्य नाहीय. आमिरला पुर्ण १३ भाग फक्त शेतीवरच करावे लागतील आणि तरीही कित्येक बाबी अंधारात राहतील्ल. Happy

आमिरने किटकनाशके हा एकच विषय निवडला. किटकनाशकांसोबत रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आज जशी किटकनाशके प्रमाणाबाहेर वापरली जाताहेत तशीच रासायनिक खतेही प्रमाणाबाहेर वापरली जाताहेत. या अतिरिक्त वापराने जमिनीच्या कसात प्रचंड घट होतेय. आणि मग उत्पादन वाढवण्यासाठी अजुन जास्त खते वापरावी लागतात. या दुष्टचक्रामुळे शेतकरी कायमचा पांगळा होतो, त्याला शेतीसाठी खते ,बी आणि किटकनाशके पुरवणा-या कंपन्यांवर अवलंबुन राहावे लागते.

सेंद्रिय/ नैसर्गिक शेतीत तेवढेच किंवा जास्त उत्पादन मिळते असे जे दाखवले गेलेय ते खरे आहे, पण हे उत्पादन मिळायला कमीतकमी १५-२० वर्षे सेंद्रिय शेती करावी लागले. रासायनिक खते वापरल्यामुळे कस गेलेल्या जमिनीवर अचानक जर सेंद्रिय शेती करायला सुरवात केली तर तिला क्षार फुटून ती कायमची निकामी व्हायचा प्रचंड मोठा धोका असतो. हे टाळण्यासाठी तिची योग्य मशागत करुन, योग्य ती पिके तिच्यातुन घेऊन तिचा कस हळुहळू वाढवावा लागतो. हे करण्यात ५-६ वर्षे जातात. या कालावधीत काहिही उत्पन्न मिळत नाही, पण जमिनीची प्रकृती सुधारायला लागते. त्यानंतर उत्पन्न घेण्यासाठी शेतीला सुरवात करता येते. पण सुरवातीला जास्त उत्पन्न मिळत नाही. १०-१२ वर्षे घालवल्यानंतर उत्पादनातला फरक लक्षात यायला लागतो. जमिन पुर्णपणे स्वतःच्या क्षमतेवर (आणि सेंद्रिय खताच्या मदतीने) रासायनिक शेतीपेक्षा जास्त उत्पन्न द्यायला १५-२० वर्षे जातात. यासाठी बियाणेही चांगली मिळावी लागतात. शेतक-यांसाठी उपलब्ध असलेल्या हायब्रिड बियाणांमध्ये बाहेरुन रोगनिवारण केले जाणार हे गृहित धरलेले असते. सेंद्रिय शेतीतल्या बियांणामध्येच ही शक्ती असणे गरजेचे असते.

हे सगळे करणे त्यांनाच शक्य आहे जे पोटासाठी सेंद्रिय शेतीसाठी वापरल्या गेलेल्या जमिनीच्या तुकड्यावर अवलंबुन नाहीत. जे असे अवलंबुन आहेत ते १०-१५ वर्षे पोटासाठी काय करणार?

सिक्कीम सरकारने ह्या संदर्भात शेतक-यांसाठी काय केले ते आमिरने पुढे दाखवले तर उत्तम होईल. आज भारतातल्या शेतजमिनीची अवस्था टॉनिक्/विटामिनच्या गोळ्या आणि रोगप्रतिकारक इंजेक्षने घेऊन उभ्या केलेल्या माणसासारखी झालेली आहे. ह्या टॉनिक्/विटामिनच्या गोळ्या आणि रोगप्रतिकारक इंजेक्षने अचानक काढुन घेतली तर तो माणुस दुस-याच्या आधाराविना एक पाऊलही उचलु शकणार नाही. सेंद्रिय शेतीचेही असेच आहे, शासकिय आधाराशिवाय असंधटीत मध्यमवर्गीय शेतक्-याला हे जमण्यासारखे नाही. आज कोणी भक्कम आधार दिला तर अजुन काही वर्षात आपल्याला ऑर्गॅनिक फुडसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार नाहीत.

छान

पण शेती हा विषय इतका व्यापक आहे की त्याच्या सगळ्या पैलुंवर एक तासाच्या भागात बोलणे शक्य नाहीय. >>> साधना, हे पटले नाही. ज्या विषयावर जगात सगळीकडे वाद चालू आहे त्या विषयाच्या किमान दोन बाजू दीड तासाच्या चर्चेत दाखवणे सहज शक्य आहे. ती दुसरी बाजू गंभीरपणे दाखवायला हवी होती - ते कोण त्या कंपनीचे मालक्/पीआर बोलत होते त्यांची टोकाची/विनोदी प्रतिक्रिया दाखवल्याने त्या बाजूत तथ्य असू शकते हे गंभीरपणे पुढे आले नाही. तसे ते यायला हवे होते.

अमेरिकेत आता ऑरगॅनिक वापरा चा जोर थोडा "स्थानिक भाज्या/फळे वापरा" कडे झुकू लागलाय. तेथील अनेक भागात वर्षांतून ४-५ महिने काही पिकू शकत नाही, तरीही ते प्रयत्न चाललेत. त्यामानाने भारतात टोकाचे नैसर्गिक हवामान असलेली ठिकाणे कमी असावीत.

स्त्रीभ्रूणूहत्या, हुंडा वगैरे मधे वादाचा मुद्दा काहीच नव्हता, त्यामुळे सगळा जोर त्यावर देणे बरोबर होते. पण ऑरगॅनिक चा मुद्दा तेवढा निर्विवाद आहे असे दिसत नाही. त्यात दाखवलेले दुष्परिणाम नक्कीच खूप गंभीर आहेत पण त्यांच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा.

याच्या काही एपिसोडची नावे फार मोठा अजेंडा दाखवतात पण चर्चा अगदी मर्यादित असते असे हेल्थकेअर चा भाग व हा भाग दोन्हीमधे दिसले. हेल्थकेअर च्या एपिसोडच्या नावावरून त्यावर त्या पूर्ण सिस्टीममधले दोष दिसायला हवे होते, तसेच या एपिसोडच्या नावावरून तरी आपल्या अन्नात येणार्‍या इतर गोष्टी - भेसळ, कृत्रिम रंग, फळे फ्रेश दिसण्यासाठी दुकानांत त्यावर काहीतरी लावणे, अन-हायजिनीक (मराठी शब्द?) वापरामुळे निर्माण होणारे धोके (देल्ही बेली व मुंबईचा तो पाणीपुरीवाला आठवा Happy ), रस्त्यावरच्या गाड्या, रेस्टॉ मधे त्याच तेलात परत परत तळणे वगैरेमधून निर्माण होणारे धोके ई. बरेच विषय आहेत. यातील काहीच आले नाही. त्या दृष्टीने नाव जेवढे व्यापक असते तेवढी व्यापक चर्चा नसते.

यात या एपिसोड मधे दाखवलेले दुष्परिणाम व वाट्टेल तसे फवारे मारणे वगैरे गोष्टींवर उपाय करायलाच हवेत. त्याबद्दल वादच नाही. असेही असू शकते की या एपिसोडचा मुद्दा कदाचित निर्विवाद असेल आणि तो तसा नाही हे भासवण्यामागे खते/कीटकनाशके ई. च्या बड्या कंपन्यांचे हितसंबंध/लॉबीज असतीलही. त्यामुळे याचा शास्त्रीय अभ्यास करणार्‍या यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करता यायला हवे.

हो, दुसरी बाजुही यायला हवी होती. पण जो माणुस दुस-या बाजुने आलेला त्याचा एकुण आविर्भावच विदुषकी होता. कार्यक्रम काय ठसवणार आहे हे आधीच माहित आहे आणि आपण यातले एक पात्र आहोत असे गृहित धरुन तो बोलला. आपण शब्दात पकडले जाणार नाही, आपल्या कंपनीच्या पॉलिसीविरुद्ध एकही शब्द आपल्या तोंडातुन येणार नाही, मग लोक आपल्याला हसले तरी चालतील याची खबरदारी घेत तो बोलला.

खरेतर कोणीतरी गांभिर्याने बोलणारा आणायला हवा होता. यामुळे एक वाईट गोष्ट ही झाली की ज्यांना सेंद्रिय शेती काय आहे हे माहित नाही त्यांना 'सेंद्रिय शेती हा अतिशय सोप्पा आणि आरोग्यदायक उपाय असताना शेतकरी मात्र गाढवासारखे रासायनिक शेती करताहेत' हा संदेश यातुन मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

हे सर्व बघून अणि वाचून भारताला एका "कार्व्हरची" अत्यंत गरज आहे असे वाटले.

आहेत, भारतात एक सोडुन अनेक कार्व्हर आहेत, वर कोणीतरी एक उदाहरण दिले आहेच. तसे अजुन खुप आहेत. फक्त ते सगळे स्वतंत्रपणे आपापल्या भागात काम करताहेत.

आमिरचा कार्यक्रम पाहुन शेती करणा-यांनी सेंद्रिय शेती काय, कशी असते? आपल्याला जमेल का? आपल्या आजुबाजुला कोणी शेतीत वेगळा प्रयोग करत असेल तर आपण त्यात काही करु शकतो का? आपल्या उत्पनाच्या मर्यादेत राहुन आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण न करता रासायनिक शेती करु शकतो का हे जरी तपासुन पाहिले तरी कार्यक्रमाचा हेतू थोडाफार साध्य होईल.

फारएन्ड,
सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.
<<यामुळे एक वाईट गोष्ट ही झाली की ज्यांना सेंद्रिय शेती काय आहे हे माहित नाही त्यांना 'सेंद्रिय शेती हा अतिशय सोप्पा आणि आरोग्यदायक उपाय असताना शेतकरी मात्र गाढवासारखे रासायनिक शेती करताहेत' हा संदेश यातुन मिळण्याची शक्यता निर्माण झाली.>>+१

पण जो माणुस दुस-या बाजुने आलेला त्याचा एकुण आविर्भावच विदुषकी होता. >>> हेच आमिरने कंट्रोल करायला हवे होते. माझ्या माहितीप्रमाणे हे चित्रपटासारखा रीटेक्स, संकलन वगैरे करून आपल्या पुढे ठेवलेला शो आहे. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर सगळे हसत होते त्यावरून "काय हास्यास्पद बोलतो आहे बघा" चा आव वाटला. या कंपन्यांचे पीआर एकदम 'तयार' असतात. उपलब्ध अनुमाने, आकडे व स्वतःच्याच कंपन्यांनी केलेले अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष इतके बेमालूम मिक्स करून लोकांपुढे फेकतात की जाणकाराचा सुद्धा गोंधळ होईल. तसा एखादा आमिरने आणला असता तर शो बॅलन्स्ड झाला असता.

पण त्यातून आमिरला जी बाजू मांडायची होती ती तितक्या परिणामकारकरीत्या ठसली नसती. त्यामुळे त्याने तसे केले नसेल.

यावेळेला आमिर खानच्या टीमचा रीसर्च खूप कच्चा वाटला. अर्थात शेतीमधे काम करणार्‍या एन जी ओ अथवा इतर संस्था कमीच आहेत. मुळात कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर हा एपिसोडचा बेस असताना त्यामधे सेन्द्रिय शेती किती फायदेशीर आहे हे सांगण्याची खरंच आवश्यकता होती का? मुळात शेतीची समज असणार्‍या लोकांवरती हा एपिसोड फोकस करता आला असता. (दूरदर्शनमुळे हा एपिसोड गावामधून देखील पाहिला गेला असेल.) त्याऐवजी पूर्ण एपिसोड शेतीमालाच्या ग्राहकांवर फोकस केल्यागत वाटला. शेतकर्‍याला हौस नाही भारंभार कीटकनाशके वापरून स्वतःच्या कुटुंबाची वाट लावून घ्यायला. कुठेतरी त्यांच्य्या अज्ञानामुळे त्यांचे नुकसान जास्त होत आहे. (जितके आपले होत आहे त्याच्या शतपटीने) त्याच्यावर जास्त भर देता आला असता. स्वतःसाठी वेगळी शेती आणि बाजारासाठी वेगळी शेती करणारे शेतकरी दाखवून उलट त्यामधून "शेतकरी लबाड असतात" असा संदेश दिला गेला असे मला तरी वाटले.

तसेच. त्याने सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित न करता कीटकनाशकांचा कमी आणि आवश्यक आहे तितकाच वापर करा असा संदेश देणे अपेक्षित होते. श्रॉफ हा मुद्दा सांगू शकले असते पण त्याना व्यवस्थित रीत्या बोलू दिले गेले नाही. एकंदरीत त्या माणसाचे वय आणि हुद्दा बघता त्याचे म्हणणे किमान पूर्णपणे ऐकून घेणे गरजेचे होते. इथे आमिरचा सूर त्यांची चेष्टा करण्याचा जास्त वाटला.

एका तज्ञबाईनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्यात वाढ झाली हे मान्य करण्यास नकार दिला. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यानी काहीच आकडेवारी दिली नाही. किंबहुना या एपिसोडमधे "आकडेवारी आणि फॅक्ट्स" सांगितलेच गेले नाहीत.

यापुढच्या भागात तरी अशा घोडचुका होऊ नयेत ही अपेक्षा.

साधना, उत्तम पोस्ट.

<एका तज्ञबाईनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्यात वाढ झाली हे मान्य करण्यास नकार दिल> वंदना शिवा ना? मला त्या बाई ग्रीनपीससारख्याच अतिरेकी वाटतात.

आमीरचा आकाशवाणीवरचा कार्यक्रम ऐकला. त्यात भर कीटकनाशकांचे दुष्परिणाम याऐवजी ऑर्गॅनिक फार्मिंग(सेंद्रीय शेती) करा यावर होता. अमीरला या क्षेत्रातल्या वास्तवाची जाणीव नाही किंवा असल्यास दाखवायची नाही असे वाटले. माझ्यासाठी दोन एकर शेत असलेला शेतकरीही मोठा(बडा) शेतकरीच असे तो अनेकदा म्हणाला.
(जमिनीचा कस नैसर्गिकरीत्या कायम टिकवण्यासाठी काही काळ ती पडीक ठेवणेही भाग असावे.)
भारतात मुबलक असलेली साधनसंपत्ती म्हणजे मनुष्यबळ. तिचा वापर शेतीत वाढायला हवा असेही कानावर पडले. हे म्हणजे सगळी चक्रे उलट फिरवण्यासारखे झाले. भारतात लोकसंख्येतला सगळ्यात मोठा भाग शेतीवर अवलंबून, त्यात बारमाही रोजगार नसल्याने अंडरएम्प्लॉयमेंट आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) शेतीचा वाटा कमी आहे, तो कमीच राहणार; शेतीउत्पन्नातील वाढीचा दरही जीडीपीच्या वाढीच्या दरापेक्षा कमी राहणार. म्हणजे शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेने कायम भारताच्या सरासरीच्या मागेच रहावे का?

आता दुसरी बाजू : अमीरने मांडलेला एक मुद्दा : ब्रँडेड वस्तू घेताना किंमत पाहून तुम्ही कांकूं करत नाही, तर उच्च दर्जाच्या सेंद्रीय उत्पादनांसाठी पैसे मोजताना का करता? {मध्यमवर्गीय+ लोकांच्या खर्चातील अन्नधान्यावरच्या खर्चाचे प्रमाण सगळ्यात कमी असते. (हे अमीरने नाही सांगितलेले; अर्थशास्त्राच्या अभ्यासात वाचलेले.)}
दुसरा मुद्दा - माझाच. आता भारताने तसे म्हटले तर अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्णता साधली आहे. करोडो टन धान्य सडवून फुकट घालवणे आपल्याला परवडते. काही उत्पादनांमध्ये कधी टंचाई(कांदे) तर कधी आयातीवर(डाळी/तेलबिया) अवलंबून रहायची गरज असते, ही त्रुटी आहेच.
यावेळी दूरदृष्टी दाखवून जमिनीचा कस वाढविणे, प्रचलित तंत्राच्या दुष्परिणामांवर उपाय शोधणे हे एक अर्थव्यवस्था म्हणून सध्या परवडण्यासारखे आहे.
एकेकट्या शेतकर्‍याचा विचार केला तर कीटकनाशके आणि रासायनिक खते न वापरल्याने खर्च कमी होणार असेल, त्यासाठी घ्याव्या लागणार्‍या कर्जाचे प्रमाण कमी होणार असेल तर त्यातुलनेत पर्यायी उपाय करून दर एकरी खर्चाच्या तुलनेत घटणार्‍या उत्पादनाचा तुलनात्मक विचार करायला हवा. (हे सगळे लिहिताना मीही अमीरइतकाच वास्तवापासून दूर असू शकेन याची कल्पना आहे.)
शेतकरी आणि ग्राहक यांच्यातले अंतर कमी केले तर किंमतीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

Pages