Submitted by Mandar Katre on 26 June, 2012 - 00:48
आपल्या पैकी सर्वांनी James Cmeroonचा "अवतार" हा चित्रपट पहिला असेलच! पान्डोरा ग्रहावर असणाऱ्या नैसर्गिक घनदाट जंगलात लपलेल्या खनिजांच्या शोधात पृथ्वीवासीय तिथे जावून भयानक संहार करतात . पण पृथ्वीवासीय सैन्यातील एक सैनिक जेक सुली पान्डोरा-वासियांच्या बाजूने उभा राहतो आणि पृथ्वीवासीयांच्या सैन्याला पराभूत करून पान्डोरा ग्रहावरील नैसर्गिक व्यवस्था कायम राखतो असे कथानक आहे .
त्या चित्रपटात जेक सुली च्या तोंडी एक संवाद आहे "there was green everywhere on Earth,but these earth people have killed their mother.and now they want to kill your mother too!"
खरोखर हा संवाद अंतर्मुख करून जातो ,किती नष्ट-भ्रष्ट केले आहे आपण पृथ्वी अन् निसर्गाला !
पावसाळा आला आहे, चला आपण सर्वजण खूप झाडे लावून धरती -मातेचे ऋण अंशत: तरी फेडूया!!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तुमचे म्हणणे खरे आहे
तुमचे म्हणणे खरे आहे ..................
मी दर वर्षी १०० झाडे लावतो माझ्या गावी !
आपल्या या स्तुत्य मोहीमेत मी
आपल्या या स्तुत्य मोहीमेत मी माझे नाव नोंदवू इच्छितो. कुठे आणि कधी यायचे, कार्यक्रमाची रूपरेखा याबद्दल सविस्तर कळवावे ही विनंती.
खरेच चित्रपटातील मुख्य कल्पना
खरेच चित्रपटातील मुख्य कल्पना अंतर्मुख करणारी आहे. झाडे लावणे ( आणि ती जगवणे ) तर महत्वाचे आहेच पण त्याशिवायही खूप इतर अत्त्यावश्यक संवयी आपल्या दैनंदिन जीवनात लावून घ्याव्या लागतील. तहान लागल्यावरच विहीर खणायची सवय असलेल्या समाजाला कसे बदलायचे हेच खरे आव्हान आहे.
एक अगदी साधे उदाहरण. पातळ प्लॅस्टिक पिशव्यांच्या उत्पादनावरच बंदि घालून त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आपण कापडी पिशव्या वापरण्याची आपली एकेकाळची सवय आपला संपूर्ण समाज पुन्हा लाऊन घेऊ शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. नुसत्या लोकशिक्षणाने झपाट्याने गोष्टी होणार नाहीत.
आपल्या या स्तुत्य मोहीमेत मी
आपल्या या स्तुत्य मोहीमेत मी माझे नाव नोंदवू इच्छितो. कुठे आणि कधी यायचे, कार्यक्रमाची रूपरेखा याबद्दल सविस्तर कळवावे ही विनंती. >>>>> अनुमोदन.........मी पण माझे रोपटे घेउन येतो........
२००० ते २००३ अशी ४ वर्षे
२००० ते २००३ अशी ४ वर्षे मुम्बई - पुणे महामार्गावर एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) आणि मुम्बई विद्यापिठ यांच्या संयुक्त विध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु होता. मुम्बई विध्यापिठाचा आमचा ट्रेक क्लब होता तेंव्हा. महामार्ग बनवल्यामुळे जी वृक्षतोड झाली ती भरुन काढण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला गेला होता. शिवाय झाडे असल्याने रस्ता खचायचे प्रमाणही कमी होते. आज जी झाडे खोपोली वरुन खंडाळ्याला जाताना डाव्या बाजुच्या उतारावर दिसतात. ती सर्व आम्ही ह्या ४ वर्षात लावलेली आहेत. त्यात दरवर्षी आम्ही चिक्कर झाडे लावायचो. बिया आणि दांडे असे दोन्ही प्रकार. मग दर महिन्याला जाउन ते नीट आहेत ना हे ही पाहिले जायचे.
कालच केशराचा पाउस वाचत होतो. त्यातले एक वाक्य आठवले.
जी झाडे आपण लावतो ती मोठी झाल्यावरही आपल्याला ओळखत असतील का?