गँग ऑफ वासेपूर..!!

Submitted by उदयन. on 25 June, 2012 - 00:49

गँग ऑफ वासेपूर.....!!!!!!!!

जिया हो बिहार के लाल.......... जिया तु हजार साल... जिया ए बिहार के लाल
तनी नाची के ....तनी गाये के ..........
तनी नाची गायी ......सब के मन बहलावा रे भय्या.............!!
.
या गाण्याच्या ओळीनुसार संपुर्ण चित्रपट आहे..संबंध चित्रपटात एक बिहारी वातावरण कायम राहते..
चित्रपट ३ काळात विभागलेला आहे.. पार्श्वभुमी कोळसा माफियाची आहे पण त्याच बरोबर इतर राजकारण सुध्दा दाखण्यात आलेले आहे...
.
चित्रपट सुरु होतो ते इंग्रजांच्याकाळात .... उत्तरप्रदेशात वासेपुर गावात मुस्लिम बहुसंख्य लोक राहतात..गावात कुरेशी आणि इतर मुस्लिम असे वर्गीकरण असते. कुरेशी लोक गुन्हेगारी वृत्तीने इतर लोकांवर वचक बसवुन असतात. कुरेशी लोक सुलतान नावाच्या पुर्व डाकु च्या नावाने इंग्रजांच्या मालगाडी गावाजवळ लुटत असतात.. याचाच फायदा घेउन इतर जातीमधील पठाण "शाहीद खान" हा सुध्दा दरोडा टाकायला सुरुवात करतो. त्यामुळे कुरेशी लोक च्या शत्रुत्व घेउन त्याला गावाबाहेर हकलुन देतात.. हा शाहिद खान नंतर "धनबाग" इथे येतो.. धनबाग मधे एका कोळशाच्या खाणी मधे काम करतो.
स्वातंत्र्यानंतर रामधीन सिंग च्या मालकीची ही खाण असते खान चे काम बघुन त्याला आपल्या खास माणसात त्याची भरती करतो.. कोळसा चा काळाव्यापार करुन रामाधिन नफा कमवत असतो..कामगारांचीच युनियन बनवुन त्याच्याच अधिकारी बनतो..त्यामुळे खाणमालक ही तोच आणि मजदुर अध्यक्षही तोच..यात खानाची त्याला फार साथ मिळते... परंतु एके दिवशी दगाफटकीच्या कथे ने रामधीन शाहीद खान चा खुन भाडोत्री माणसाद्वारे करतो..खान चा साथीदार त्याच्या मुलाला घेउन वासेपुर मधे फरार होतो.. खान चा मुलगा वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत असतो..सरदार खान म्हणुन तो वासेपुर मधे प्रसिध्द होतो. तो पर्यंत रामधीन सिंग हा धनबाग चा आमदार होतो.मजुरांची एकाबाजु ने पिळवनुक करुन दुसर्याबाजुने त्यांचाच तारणहार बनतो.....मजदुरांना सरकार विरुध्द भडकवुन. जनमत आपल्याबाजुने वळवतो.. आणि निवडनुक लडवुन आमदार बनतो...त्या नंतर आपल्यामुलाला सुध्दा विधायक बनवतो..इथे सरदार खान आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी आपला गृप बनवत असतो.. तो आपल्या साथीदारांच्या मदतीने वासेपुर मधे हळुहळु दरोडा चोर्‍यामार्‍या करायला सुरुवात करतो.. आलेल्या पैश्यातुन जमिन वगैरे खरेदी करु लागतो..अश्यातच त्याचे लग्न होते.. सरदार खान सगळ्या धंद्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. सरदार खान आपल्या वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी गावातल्या कुरेशी लोकांविरुध्द पंगा घेतो.त्यात सुलतान कुरेशी त्यांचा लिडर असतो. त्यांच्या कत्तल खान्यावर हल्ला चढवुन सरदार खान त्यांना गावा बाहेर हकलुन देतो.. या प्रतापामुळे जेल मधे सुध्दा जाउन येतो....उलट तिथे गेल्यावर नविन साथीदार आपल्या गँग मधे समावेश करतो..बाँम्ब बनवणारा ,, बंदुक बनवणारे असे कारागिर आपल्या गँग मधे सामिल करुन घेतो.. आता तो सरळ सरळ धनबाग मधल्या रामाधीन सिंग च्या धंद्यावर दरोडा टाकायला सुरुवात करतो.. रामधिन ला एका प्रसंगात कळावतो की तोच शाहीद सिंग चा मुलगा आहे आणि तो त्याच्या बापाचा बदला घेणार आहे... यामुळे सरदार खान विरुध्द रामाधीन कुरेशींनां सुध्दा घेतो... सरदार खान चा मोठा मुलगा.. कुरेशीच्या मुलीला मागणी घालतो.. त्यामुळे तात्पुरता वादावर पडदा पडतो.. परंतु सुलतान कुरेशी बंडखोरी करतो... आणि लग्ना नंतर एका पेट्रोल पंप वर एकट्या सरदार खान वर हल्ला करतो........................
.
.
बाकीचे पुढच्या पार्ट मधे दाखवणार आहेत....... Happy
.
हा चित्रपट बघताना कानांना सहन न होणार्या शिव्या आणि भाषा ऐकण्याची तयारी कृपया करुन जावी.. शक्यतो कुटुंबाबरोबर अथवा महिलांबरोबर ( यात सर्व प्रकारच्या महिला आल्या.. Happy ) जाउ नये.. उगाच फजिती होण्याची शक्यता दाट आहे.. हा चित्रपट न म्हणता एक प्रकारची सरदार खान च्या जीवनाची डॉक्युमेंट्री म्हणु शकतो.. एक एक प्रसंग जिवंत झालेला आहे.. बहुतेक कोणीच अभिनय केलाच नाही आहे.. सरळ साध्या जिवनात जे जे घडते आणि जसे सामान्य माणुस ..ज्या पध्दतीने प्रतिसाद देतो.. तसेच आहे.. मारामारी.. लुटालुट एकदम खरीखुरी वाटणारी आहे... कुठे ही हिरोगिरी दाखवली नाही.. एकाच गोष्टीमधे असंख्य छोट्या छोट्या गोष्टींची गुंफण उत्तम केलेली आहे.... सरदार त्याची बायको....त्याने नंतर केलेली दुसरी बायको.. रामधीन सिंग...सुलतान ... सरदार ची दोन्ही मुल....... अश्या प्रत्येक लहान लहान व्यक्तिरेखा अतिशय उठावदार झालेल्या आहेत... प्रत्येकाच्या वाट्याला थोड्या थोड्या भुमीका वाटणीला आलेल्या आहे परंतु ... ते व्यक्ती शेवट पर्यंत लक्षात राहते....
.
मनोज वाजपेयी:- सरदार खान च्या भुमीकेत एकदम फिट्ट बसलेला आहे..खुनाच्या बदल्याच्या भावनेत सुड घेणारा.. बाईलवेडा असणारा.. तरी पण पहिल्या बायकोला फार घाबरुन असणारा... मस्त उभा केलेला आहे.
रिचा चड्डा: नगमा सरदार खान ची पहिली बायको..नवर्‍याच्या विबांसला कंटाळलेली.. नवर्‍याला शोधुन मारुन मारुन घरी आणनारी बायको.. आग्यावेताळचाच रुप...:)..
नसिरुद्दिन सिद्दकी : सरदार खान चा लहान मुलगा फैजल.. (कहानी चित्रपटातला "इंस्पेक्टर खान") छोटीसीच पण उठावदार भुमीका वठवली आहे. मुख्यतः मुलगी बरोबर पहिल्यांदा डेट ला जातो तो प्रसंग तर अप्रतिमच आहे... लाजराबुजरा.. संयमी ... अंतर्मुखी .. असणारा.. अभिनय छान केला आहे..
तिग्मांशु धुलिया: रामधीन सिंग व्यक्ती पाहता क्षणीच उभी राहते.. इतका प्रसिध्द दिग्दर्शक पहिल्यांदाच कॅमेराच्या समोर आलेला आहे. परंतु वावर एकदम सहजतेने केला आहे.. डायलॉग टायमिंग अप्रतिम.. वाटतच नाही पहिल्यांदा काम करतोय... राजकारणी . आतल्या गाठीचा.. चांगला प्रयत्न केलेला आहे..
बाकीच्या सर्वच कलाकारांनी अगदी मन लावुन काम केलेले आहे... हुमा कुरेशी नविन मुलगी फ्रेश वाटते.. तिचा आणि सिद्द्कीचा "डेट" वरचा प्रसंग तर मस्तच..
विनोद.. खुन मारामारीखूप खरी वाटावी आणि अंगावर काटा यावा , अशी भयंकर रक्ताळलेली दृश्यं पहायची मानसिक तयारी ठेवा . अत्यंत टोकदार दृश्यं , तितकीच अश्लील भाषा याच संपूर्ण आवरणात हा सिनेमा रंगवलाय . ती अंगावर येणारी दृश्यं पाहताना आणि ती भाषा ऐकताना मानसिक तयारी करावीच लागते.
.हा सिनेमा म्हणून खूप वेगळा आहे . अतिशय रंजक आहे , खिळवून ठेवणारा आहे . पण पचायला अतिशय जड आहे . निख्खळ करमणुकीची अपेक्षा ठेवणाऱ्यांना तो अजिबात सहन होणार नाही . सिनेमा संपल्यावर हात झटकून मोकळे व्हायची इच्छा असेल तर ही पायरी चढूच नये . न पचणारी गोष्ट आहे ही.. Happy

स्नेहा खानवकरने दिलेलं संगीत एकदम फिट्ट बसते....गाणी अशी नाहीच आहेत चित्रपटात.. बॅकग्राउंड मधे...लग्ना मधे मधुन मधुन वाजवले जाणारी गाणी यातुन ही गाणी समोर येतात...चित्रपटात साखरे प्रमाणे विरघळुन जाणारी आहेत..बिहारी लहेजा आणि शब्द पुरेपुर वापर करुन गाणी तयार केली आहेत.. "बिहार के लाल" आणि "ओ वुमनिया" यांचा ठेका छान आहे........ खट्ट्याळपणा आणि गावरान बिहारी इस्टाईल खच्चुन भरलेला आहे .
.
दिग्दर्शक ....... अनुराग कश्यप आहे............आता याच्या दिग्दर्शनावर मी लिहिणे म्हणजे ...;)

.
एकदा तरी वेगळा म्हणुन अवश्य पाहावा.............
.
.
तळटीपः- ........ जाता आवर्जुन डोके बरोबर घेउन जावा.......... Wink

अजुन बाकी आहे....थोड्यावेळेत

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन संगित आपली मराठी मुलगी देतेय. ऐकुन बरं वाटलं.>>>>+१

स्नेहा खानवलकर Happy तिचा आवाजही क्लास आहे. LSD मधील एक गाणं कसलं भन्नाट गायलंय तिने. तिचं अजुन एक नॉन फिल्मी अल्बममधल "टुंग टुंग बजे" हे गाण आणि संगीतही एकदम सह्ही आहे (अगदी चित्रीकरणासहित).

काम इतके आहे की ........ >>> मला वाटले
की मध्यंतरामधे ही स्टोरी टाकलीए.>>> i thought it's taking time to buffer.. Wink

झाले एकदाचे लिहुन...............डोक्याचा दोनदा भुगा झाला............. एकदा चित्रपट पाहताना.........दुसर्यांदा त्याची समिक्षा लिहिताना...........:हाहा:

मीही लिहिणार होतो यावर. आता तू लिहिलेयेस तर त्यात भर घालतो.

सध्या बॉलीवूडमध्ये दहापैकी सहा चित्रपटांची पार्श्वभूमी बिहारचीच असते Happy

गँग ऑफ वासेपूर मधलं बिहारच्य जे चित्रण आहे त्यापेक्षा प्रभावी चित्रण बिहारचं यापूर्वीच्या चित्रपटात येऊन गेलेय. एवढा मोठा काळ दाखवताना सुरुवातीला कनेक्शन पटकन एस्टॅब्लिश होत नाही आणि "रामधीन सिंगचं आताचं वय नक्की किती हे कळतच नाही. मनोज वाजपेयीच्या बापाच्या काळात तो तरूण ठेकेदार असतो आणि चित्रपट संपेपर्यंत तो किमान ८० प्लस असायला हवा ते गणित काही दाखवलेल्या वर्षांवरून जुळत नाही.

वासेपूर इतके डेंजर दाखवलेय पण त्याच कुरेशी कसायांच्या मोहल्य्यत सरदार खान उघडपणे बोम्ब टाकत फिरत बसतो हे काही झेपत नाही, कुरेशीही काही करत नाहीत आणि रामधीर पण हातावर हात धरून बसतो. Sad ती जरा अतिशयोक्ती वाटली.

संगीत सध्याच्या ट्रेंडपेक्षा वेगळं असलं तरी मनात घोळणारं नाही, एक प्रयोग म्हणून ठीक वाटलं.

अभिनय मात्र सगळ्यांचे "क्लास" आहेत........ प्रत्येक कॅरॅक्टर जिवंत वाटतं, खरंखुरं वाटतं. रीचा चढढा नसीरुद्दीन मनोज वाजपेयी सगळेच खास. मनोज वाजपेयीचा बाप दाखवलाय तो अभिनेता पण मस्त आहे.

सरदार खानच्या बापाला मारतात तो सीन अप्रतिम. म्हणजे हा मरणार हे माहित असूनही ज्या तडकाफडकी तो मरतो ते पाहताना चटकन प्रतिक्रिया उमटते.

एक चित्रपट कथानक ५ तासांपेक्षा जास्त करायचं पहिला भाग जवळजवळ ३ तास आणि उरलेलं दुसर्‍या भागात असा नवा ट्रेंड अनुराग कश्यपने मांडायचा प्रयत्न केलाय खरा.

पण सरदार खानचं कॅरॅक्टर ज्या पधतीने सूडानं पेटलेलं आणि बिनधास्त खूनशी दाखवलय, त्यानुसार त्याने रामधीर सिंगला मारायला दोन पिक्चर वेळ घ्यावा हे पटत नाही. खरं तर याच एका पिक्चरमध्ये त्याला समोरासमोर रामधीरला मारायची संधी असते.

शिवाय जो प्रेक्षक अगदी पहिल्यापासून दाखवलेल्या काळचं आणि दाखवलेल्या वर्षांचं कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करेल त्याला हाच प्रश्न पडेल की सूडाने पेटलेला "सरदार" आता काय रामधीर वार्धक्याने मरायची वाट पाहतोय की काय......... इथे कुठेतरी मेजर गफलत जाणवत राहाते. बापाच्या खूनाचा सूड घ्यायला टपलेल्या खूनशी सरदार खानला इतका वेळ रामधीरला मारायला???? जम्या नाही,.......... यालाच बहुधा "तेरी केहेके लुंगा" म्हणायचं असेल Proud

आता पुढच्या भागात कुरेशीचा भर रस्त्यात गेम होणार आहे........ पहात रहा गॅम्ग ऑफ वासेपूर.

फॅमिली आणि मुलांना नेऊ नका...... नाहीतर काही डायलॉग नंतर मुलांच्या तोंडून ऐकायला मिळाले तर मग इथल्याच "लहान मुले लाजवतात तेंव्हा" या धाग्यावर किस्से लिहावे लागतील. Rofl

बाकी ठीक्ठीक........ मला तरी डोक्याव्चा भुगा वगैरे वाटला नाही. यापेक्षा प्रभावी बिहार कित्येक चित्रपटांतून उभा राहिलाय...........

ते "बाहुबली" वगैरे फक्त उल्लेख आलाय....... ओमकारा सारखा "बाहुबली उभा रहात नाही डोळ्यासमोर.

अर्धावेळ सरदार खानचा "वुमनिया" चाळ्यातच जातो......... डोंबलाचं सूडनाट्य.......

बाकी रीमा सेन खासच दिसलीये Wink

काला रे सय्या काला रे किंवा दिल चिचा लेदर नैतर एक बगल मे चाँद होगा कसली एकसे बढीया एक गाणी हैत पिक्चरात.
नावं ठेवणार्‍यांनीही बघितला पायजे हा पिक्चर. कुणास ठावुक अजून एक लेख येईल 'वासेपूर आवडलाच नाही कधी' नावाचा Proud
चला पार्ट टू बगायचा मोह झालाय टाकतोच सिडी आता.