रंगीत पेन्सिल्स - घोडा

Submitted by वर्षा on 16 August, 2011 - 14:43

मिरवणुकीच्या या घोड्याचे चित्र काढण्यासाठी Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेन्डर्स वापरले आहेत. मूळ रेखाटनामध्ये राखाडी बॅकग्राऊंडदेखील पेन्सिल्सनेच रंगवली आहे. पण मला अजून पेन्सिलने एकसंध रंगकाम जमत नसल्याने कागद पांढराच ठेवला Happy

याआधीची चित्रे
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

गुलमोहर: 

फार सुंदर Happy

फक्त इथे काहीजणांनी म्हटल्याप्रमाणे प्रपोर्शनकडे जास्त लक्ष दिलं तर चित्रात कुठेच खोट रहाणार नाही.

व्वा !
घोडा हा बर्‍याच चित्रकारांचा आवडता प्राणी आहे. Happy
मला प्रपोर्शनमध्ये जास्त गफलत झालीये असे वाटले नाही. फक्त मानेवरचे केस आणि शेपटी यांवर अजून मेहनत घेता आली असती.
रंगीत पेन्सीलचे काम अफलातून झाले आहे.
अभिनंदन ! Happy

सर्वांना धन्यवाद.
@दक्षिणा, अगं मी प्रत्यक्ष घोडा नाही तर पेन्सिल रेखाटनांच्या पुस्तकात असलेल्या या घोड्याच्या रेखाटनावरुन हे चित्र काढलंय. पण बरोबर आहे तुझं निरीक्षण. पाय बारीक आलाय खरा..
@अकु, सॅम, हो थ्रीडीचा सराव करायचाय बराच....मूळ चित्रात अगदी जिवंत भासतो घोडा.
@प्रकाश काळेल, मला नेहेमी सगळ्यात कठीण वाटतं हे. (त्यामुळे त्याच्या जास्त वाटेला गेले नाही :फिदी:) प्राण्यांच्या अंगावरचे केस, शेपट्यांचे केस, मिश्या, पक्ष्यांची पिसं वगैरे लोक कसं काय काढतात हुबेहुब...उदा. हे बघा:
http://www.chisaiistudio.com/index.html
तिची बाकीची चित्रपण टू मच आहेत!

खूप सुंदर!! डीटेलिंग आणि मुख्यतः घोड्याच्या खोगिराचे थ्री डी इफेक्ट्स तर फार आवडले.

आधी प्रतिसाद दिलेला आहेच. काही प्रतिसाद वाचून मनात आले की घोडा प्रतिसाद वाचण्यासाठी मान पुढे करून उभा असावा. हलके घ्या.

-'बेफिकीर'!

जबरी Happy

रुबाबदार!
कित्ती बारकावे चितारलेस, अतिशय उत्तमरित्या!!
त्या झूलीवरचे लाईट रिफ्लेक्शन्स महानच, अगं फक्त पेन्सिलीने अशी सफाई साकारणं म्हणजे ग्रेट!
वा!
खूप शुभेच्छा! Happy

Pages