रंगीत पेन्सिल्स - घोडा

Submitted by वर्षा on 16 August, 2011 - 14:43

मिरवणुकीच्या या घोड्याचे चित्र काढण्यासाठी Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेन्डर्स वापरले आहेत. मूळ रेखाटनामध्ये राखाडी बॅकग्राऊंडदेखील पेन्सिल्सनेच रंगवली आहे. पण मला अजून पेन्सिलने एकसंध रंगकाम जमत नसल्याने कागद पांढराच ठेवला Happy

याआधीची चित्रे
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

गुलमोहर: 

मस्तय घोडा आवडला, सफरचंद पण खूप आवडले होते
सिंडरेला म्हणतेय त्याला +१ पुढच्यावेळी प्रपोर्शनकडे थोड लक्ष देणार का?

हो नक्कीच थँक्स रुनी आणि सिंडरेला. समहाऊ माझ्या हे लक्षात आलं नव्हतं.
बाकी सर्वांनाही थँक्स.

वर्षा चित्रं सुरेख जमलंय यात शंकाच नाही अजिबात. Happy
सिंडरेलाला अनुमोदन, घोड्याची लांबी किंचित जास्ती आणि पुढच्या पायंपैकी डावा पाय बराच बारिक आलाय. तु ज्या घोड्याचं चित्रं काढलयस तो लुकडा होता का?

छानच ! डोक्याकडचा भाग तर अप्रतिम !!
[ एक शंका - कांही घोडे तरी असेच लांबट आकाराचे नसतात का ? मला तसे घोडे पाहिल्यासारखे वाटतात पण बर्‍याच जणाना लांबी खटकली , म्हणून ही शंका. ]

मस्तच आहे एकदम... मला तर त्याचे तोंड खुप आवडले. खुप छान जमलेय.. इतर डिटेलिंगही आवडले. कपडेही मस्त जमलेत. त्यांच्यावरच्या घड्या वगैरेचे शेडींगही सुंदर झालेय.

चेहरा आणि मागचा भाग मस्तच जमलाय पण मानेचा भाग व तोडे घातलेला पाय मात्र जरा खटकला. पण ख-या घोड्याला पाहिले असले तरी पायाचे बारकाईने निरिक्षण कधी केलेले नाही त्यामुळे कदाचित धोड्याचे पुढचे पाय असतीलही असे बारीक....

सुंदर रेखाटन वर्षा! लांबी किंचित जास्त वाटते आहे खरी, त्यामुळे घोडा जरा जास्तच सडपातळ वाटतोय. पण बाकी डिटेलिंग मस्त जमले आहे. मला त्याच्यावरील झुलीचे तू रेखाटलेले व रंगवलेले डिटेलिंग आवडले. घोड्याचे मुख अंगाच्या मानाने लहान झाले आहे. तसेच त्याचा थ्री डायमेन्शनल इफेक्ट शेडिंगद्वारा कसा करता येईल तेही बघशील का? आणखी छान छान चित्रे काढ आणि इथे पोस्ट कर!! Happy

Pages