उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ३ : एम.जी.रोड...

Submitted by सेनापती... on 21 June, 2012 - 13:20

उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...

एम.जी.रोडला जाण्यासाठी निघालो तेंव्हा अंधार पडत आला होता. आम्ही निघालो तेंव्हा प्रधानबाईंचा मुलगा आशिष देखील गाडीत पेट्रोल भरण्यासाठी त्याच बाजुला जाण्यासाठी निघत होता. त्याने आम्हाला लिफ्ट दिली. आम्ही पोचलो तेंव्हा रस्त्यावर सर्वत्र रोशणाई केलेली दिसली.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

११-१५ मे तिथे समर कार्निव्हल होउन गेला होता. कार्यक्रम संपले असलेले तरी रोशणाई मात्र कायम होती. एम.जी.रोड हा दुतर्फा १००-१५० दुकाने असलेला गंगटोक मधला शॉपिंग स्ट्रीट आहे. मध्ये मध्ये रेस्टॅरंट देखील आहेत. म्हणजे फिरताना भुक लागली तरी हरकत नाही. दुतर्फा असलेल्या सर्व बिल्डिंग्स खरेतर हॉटेल्स आहेत. खाली दुकाने आणि वरती रुम्स असे एकंदरीत चित्र आहे. आता ह्या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे. रस्त्याच्या सुरुवातीला महात्मा गांधींचा पुतळा आहे.

प्रचि ६

विजेचे खांब आणि त्यावर सजावटीसाठी टांगलेल्या रंगेबिरंगी फुलांच्या कुंड्या लक्ष्य वेधुन घेतात. दर काही फुट अंतरावर बसायला बाकडी ठेवलेली आहेत. फिरुन दमलात की हवतरं जरा बसुन दम खा. काही खरेदी करायची नसेल तरी संध्याकाळी उगाचच फिरायला हा एक मस्त स्पॉट आहे. आम्ही गंगटोक मध्ये ४ दिवस असणार होतो त्यामुळे लगेच शॉपिंग करण्याऐवजी तासभर चक्कर मारली आणि कुठे कुठे काय काय मिळतयं ते पाहुन घेतले. संध्याकाळी ज्या मग्स मध्ये चहा-कॉफी घेतली होती ते देखील पाहिले. अचानक फिरता फिरता महाराजा स्विट मार्ट समोर जाउन पोचलो. पुढे काय सांगायची गरजच नाहिये. Proud

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

फिरता फिरता २ तास कसे निघुन गेले कळलेही नाही. शेवटी घरी जाण्यासाठी निघालो. टॅक्सीस्टॅण्ड वरुन टॅक्सी घेतली आणि जाता-जाता हा रस्त्याचा घेतलेला एक फोटो.

प्रचि १५

संध्याकाळच्या जेवणासाठी घरी परतलो तेंव्हा ८ वाजुन गेले होते आणि गरमा-गरम जेवण तयार होते. डाळ-भात, चपाती आणि बांबु शुटची भाजी. सोबत भेंडी आणि खास आलुकी सब्जी. रायता आणि पापड. एकंदरीत मस्त जेवण होते. Proud

मी सुटकेचा निश्वास टाकला कारण मी ही जागा ऑनलाईन बुक केली होती. रुम्स आणि जेवण कसे असेल ह्याबद्दल मनात जी साशंकता होती ती आता दुर झाली होती. उद्यापासुन खर्‍या अर्थाने सिक्किम बघायला निघायचे होते. त्यामुळे आवरुन घेतले आणि झोप येईपर्यंत गप्पा टाकत बसलो. सुरुवात तर छान झाली होती...

********************************************

एम.जी.रोडवर असलेल्या सुविधा...

एस.बी.आय, अ‍ॅक्सिस बँक अश्या अनेक बँक्सचे एटीम.
सायबर कॅफे
डी.एच.एल आणि ब्लु डार्ट (सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु)
सिक्किम पर्यटन माहिती केंद्र
अनेक हॉटेल्स आणि रेस्टॅरंटस
टॅक्सी स्टॅण्ड.

क्रमशः ... उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम.... (नेहमीप्र्म्माणेच) Happy

एम जी रोड हे खास शॉपिंग रोड असतात का? बंगळुरला पण तसंच काहीसं आहे असं वाटतय निदानयः)

सगळेच भाग नक्की वाचणारे....

सेना, तीनही भाग मस्तच. मी केलाय पालथा तो भाग १९९८ मध्ये पण मार्चमध्ये Happy आठवणीना उजाळा मिळतोय Happy

मस्त आहे रे Happy

महाराजा स्वीटमध्ये हरेक माल १० रु दिसतोय. Wink

सोबत भेंडी आणि>>> तु त्याना आधीच सांगुन ठेवलेलस की काय तुझ्या आवडीविषयी. Happy

आज जरा बीझी आहे. लॉग इन करणार न्हवते....

पण तुझा बाफ आला रहावलच नाही. मस्त प्रची.

एम.जी. रोड केवढा बदललाय!!!! बापरे. १९९६ ला छोटासा होता. ग्रेट!!!

हे ठीकाण ऑनलाइन बुक केलेस ते कोणत्या साइट वरुन ? खोल्या पण चांगल्या होत्या ना ?

M G रोड वर नेहमीच काहि ना काही कार्यक्रम चालु असतात. सिक्किम सरकारचा पर्यटन विभाग ते आयोजीत करते. इथे खरेदी थोडीशी महाग आहे, याच्या येक गल्ली खाली लाल मार्केट मधे चांगले बार्गेन मिळु शकते.
curio आणि इतर वस्तु कॅलिमपाँग ला चांगल्या आणि इथल्यापेक्षा स्वस्त मिळतात, जर तुम्ही कॅलिम्पाँगला जाणार असाल तर इथे खरेदी टाळा.

वॉव.. ड्रॅगन्स, गांधीजी, भेंडी आणी बँबूशूट्स.. इंटरनॅशनल इंटीग्रेशन आहे रे सिक्कीम मधे..
मिठाई छान दिसतीये.. माझं गोडाशी एक्दम वा़कडं असल्याने माझ्यावाटची ही तूच खा!!! Proud

धन्यवाद... मामी, साधना. शुम्पी, चिमुरी, आबा, जागु, गंधर्वा.

झकास... नाही रे. Happy

चेतन... खुप बदल झाला ना.. Happy १०-१२ वर्षात.

मोकिमि.. तेच तर म्हणतोय. अतिशय सुंदर जागा मिळाली आम्हाला. मला हॉटेल मध्ये राहायचे नव्हते म्हणुन मी होम स्टे निवडले होते. १-२ दिवस सोडुन संपुर्ण ट्रिप आम्ही सर्वत्र होम स्टे मध्येच राहिलो होतो. मी ट्रिप अ‍ॅडव्हायजर आणि गुगल जिंदाबाद. दुसर्‍या भागात आशिष-खिमची साईट लिंक दिली आहे मी.

पाटील.. एकदम बरोबर. लाल मार्केट हे जुने आणि स्वस्त मार्केट आहे. लोकल्स तिथे जाउनच खरेदी कॅलिंग्पॉग ला हे जास्त चांगले मिळते कारण ह्या बर्‍याच वस्तु भुतान मधुन येतात.

वर्षु... होय ती तारा देवीच आहे. Happy