ग्रॉपुल्याची खुर्ची

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.

सचित्र प्रवासवर्णन करून माय्बोलीकरांना नुस्तं जळवून जळवून टाकायचं ठरवलं होतं पण..!

गेल्याच आठवड्यात आम्ही अ‍ॅलबामा राज्यातल्या बोरखेडीएवढ्या मोठ्या गावी गेलो होतो. गावात बघायला काय काय आहे अशी पृच्छा केल्यावर, 'बरंऽच काही' असं उत्तर मिळालं. ३ पेट्रोलपंपं, मोठी - छोटी धरून १० हॉटेलं, एक बोलिंग अ‍ॅली आणि जवळपासच्या परिसरात (सर्वानुमते) नयनरम्य (ठरायला हरकत नसलेली) नॅशनल फॉरेस्टातली वाट एवढा ऐवज मिळाला.

गावातलं मस्तं मज्जेचं काहीतरी बघायचंच (या बिनडोक विधानाला काहीएक अर्थ नसतानाही) ठरवून, 'अ‍ॅनिस्टनातली प्रेक्षणीय स्थळं' गुगलली आणि आवो माय वो...

साइडातून....

khurchee-maaybolee.jpg

आता हिकडल्या साइडातून...

khurchee-maaybolee-2.jpg

आता हिकडसून, जवळून

khurchee-maaybolee-3_0.jpg

म्होरून...

khurchee-maaybolee-4.jpg

खुर्चीसमोर अग्दी खुजं खुजं वाटायला लागलं बघा! (पाचफुटी जिवाला बारस्टुलासमोर पण खुजं खुजं वाटतं हा भाग अलाहिदा...!)
(मिलर्स फर्निचर्वाल्यांना, 'मायबोलीत तुमच्या खुर्चीचे फोटो टाकतेय बरं! फुकटात जाहिरात होतेय!' असं सांगणार होते. पण गावात एकतर देशी माणूस बघितलेली माणसंच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी ! त्यात आम्ही दुकानात शिरून असं काही सांगायला गेलो असतो त्यांनी आधी पोलिसांना बोलवून, नंतर इमिग्रेशन स्टेटसची शहानिशा करायला घेतली असती....)

तर अशी खुर्ची बघून, जिवाचं अ‍ॅनिस्टन करून झाल्यावर कधी एकदा त्याबद्दल मायबोलीत लिहिते असं झालं होतं.

अश्शी मज्जा आली म्हणून सांगू!

त. टी. : ही प्रकाशचित्रं बनावट नाहीत!! खुर्ची खरंच मोठी आहे!! Proud

विषय: 
शब्दखुणा: 

Biggrin कित्ती ती सुंदर खुर्ची! प्रत्येक अँगलच्या फोटूत ती गाडीदेखील तिची पोझिशन का बरं बदलतेय? हे एक रम्य गूढ प्रकरण वाटतेय!! Wink

मृण, खुर्ची महान. शीर्षक महान. '

इथे जाण्याच्या रस्त्याबद्दल आणि रहायच्या सोयीबद्दल तुम्ही अजून माहिती देऊ शकाल का? Wink

अय्या! व्हेकेशन फोटोज.. मी झब्बू देऊ का?

आम्हीपण नुकतेच जाऊन आलो. त्या गावात एके ठिकाणी एक ५० मजली उंच इमारतीएवढी इमारत होती पण आत नुसती एकच मोठ्ठी खोली! ही पहा इमारत-
ksc.jpg

एके ठिकाणी आभाळात कोणीतरी विमानातून धूर सोडत अक्षरं लिहीत होतं अशी-
हे देवा!
tr1.jpgtr2.jpg

आणि अशी खुर्ची म्हणायची तर आमच्या गावातही आहे, त्यावर माणूसपण बसलाय. इथे पहा.

लोला तुमचाही झब्बू उत्तम आहे.
एक भो.प्र. तुम्ही दिलेल्या लि़ंक मधल्या खुर्ची खाली कार पार्क करता येते का? biggrin.gif

धन्यवाद!

सध्या मायबोलीत लाडिक वारं वहातंय. त्याला साजेसं 'ग्रॉप'चं ग्रॉप्युल्या केलंय हे चतुरांच्या लक्षात आलं असेल! Proud

'TRUST JESUS' !! Lol कुठल्या भागातल्या आकाशात दिसलं? 'ट्रस्ट हेसूस' वाचणार्‍या मानवांच्या का?

Lol

समोरच्या अँगलमधून खुर्चीच्या खाली निळी गाडी पार्क केलेली दिसतेय, आणि साइड अँगलने खुर्चीच्या बरीच पुढे एक निळी गाडी दिसतेय, खाली नाही दिसते, असं कसं? जादूची खुर्ची आहेसं वाटतंय >> पहिला फोटो "पोरगी" ह्यांनी त्यांच्या गाडीटून काढलाय, नि मग आपली गाडी त्या खुर्चीच्या खाली लावून समोरून फोटो काढला असेल Happy

तेव्हढा एक अ‍ॅनिस्टनचा पण फोटो टाकला असता तर ... Lol

छान !! Lol

खुर्चीच्या खालून पण एक फोटो हवा होता>>> आणि एक वरच्या साईडातून.... Happy

हा घे झब्बू,
ही खुर्ची युएन च्या जिनीवा मधल्या कार्यालया समोर आहे. ३९ फुट उंच. 5.5 टन लाकुड वापरलय. दोन आठवड्यापुर्वीच घेतलाय फोटू.

broken chair.JPG

छान है खुर्ची. पण त्या खुर्चीत अथवा लेखात इतक हसण्यासारखे काय आहे ते नै कळले.

पण सगळेच दात काढतायत, तर मीही काढतो. Rofl nbxmxg_th.gif Rofl

झब्बू मस्तं! (पण खुर्ची लंगडी आहे धुळेभौ! ..आणि त्याखाली चारचाकी उभी करता येत नाही. :P)

आंग्रे, अगदी बरोबर आहे, हसण्यासारखं काही नाही. प्रवासवर्णन न टाकता मी मायबोलीकरांसाठी भक्तीभावानं स्थानवर्णन टाकलंय.

एकदम मार्मिक, नर्मविनोदाचा उत्तम नमुना.......

आंग्रे, अगदी बरोबर आहे, हसण्यासारखं काही नाही. प्रवासवर्णन न टाकता मी मायबोलीकरांसाठी भक्तीभावानं स्थानवर्णन टाकलंय.>>>>> हा हा हा हा

'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.>>>>>> जबरी.....

Pages