ग्रॉपुल्याची खुर्ची
'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.
सचित्र प्रवासवर्णन करून माय्बोलीकरांना नुस्तं जळवून जळवून टाकायचं ठरवलं होतं पण..!
गेल्याच आठवड्यात आम्ही अॅलबामा राज्यातल्या बोरखेडीएवढ्या मोठ्या गावी गेलो होतो. गावात बघायला काय काय आहे अशी पृच्छा केल्यावर, 'बरंऽच काही' असं उत्तर मिळालं. ३ पेट्रोलपंपं, मोठी - छोटी धरून १० हॉटेलं, एक बोलिंग अॅली आणि जवळपासच्या परिसरात (सर्वानुमते) नयनरम्य (ठरायला हरकत नसलेली) नॅशनल फॉरेस्टातली वाट एवढा ऐवज मिळाला.
गावातलं मस्तं मज्जेचं काहीतरी बघायचंच (या बिनडोक विधानाला काहीएक अर्थ नसतानाही) ठरवून, 'अॅनिस्टनातली प्रेक्षणीय स्थळं' गुगलली आणि आवो माय वो...
साइडातून....
आता हिकडल्या साइडातून...
आता हिकडसून, जवळून
म्होरून...
खुर्चीसमोर अग्दी खुजं खुजं वाटायला लागलं बघा! (पाचफुटी जिवाला बारस्टुलासमोर पण खुजं खुजं वाटतं हा भाग अलाहिदा...!)
(मिलर्स फर्निचर्वाल्यांना, 'मायबोलीत तुमच्या खुर्चीचे फोटो टाकतेय बरं! फुकटात जाहिरात होतेय!' असं सांगणार होते. पण गावात एकतर देशी माणूस बघितलेली माणसंच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी ! त्यात आम्ही दुकानात शिरून असं काही सांगायला गेलो असतो त्यांनी आधी पोलिसांना बोलवून, नंतर इमिग्रेशन स्टेटसची शहानिशा करायला घेतली असती....)
तर अशी खुर्ची बघून, जिवाचं अॅनिस्टन करून झाल्यावर कधी एकदा त्याबद्दल मायबोलीत लिहिते असं झालं होतं.
अश्शी मज्जा आली म्हणून सांगू!
त. टी. : ही प्रकाशचित्रं बनावट नाहीत!! खुर्ची खरंच मोठी आहे!!
भारी
भारी
धन्य आहेस!
धन्य आहेस!
मृ, परत (परत) ते नयनरम्य फोटो
मृ, परत (परत) ते नयनरम्य फोटो पाहिले. खुर्चीच्या खालून पण एक फोटो हवा होता. तो व्ह्यू मस्त असेल एकदम.
पुढच्या वेळेला तो नक्की काढ.
आणि जेनिफर अॅनिस्टनच्या पुर्वजांचे घर पाहिलेस का?
मृण, म हा न
मृण, म हा न
पेटलीये पोरगी!!!!
पेटलीये पोरगी!!!!
>>>जेनिफर अॅनिस्टनच्या
>>>जेनिफर अॅनिस्टनच्या पुर्वजांचे घर पाहिलेस का?
नाही पाहिलं. (तसंही पूर्वजांच्या घरापेक्षा जे. अॅ. हे प्रेक्षणीय स्थळ आहे असं फॅ. म्हणतील.)
>>पेटलीये पोरगी!!!!
अय्या, कित्ती गोड तू! 
पोरगी??!!
सह्हीच!! काय मस्त आलेत फोटो
सह्हीच!! काय मस्त आलेत फोटो वेगवेगळ्या अँगलने!!! मानलचं ह्या कल्पकतेला!!
मृ, आप महान हो. _/\_
(No subject)
काहीही मृ जेनिफर
काहीही मृ
जेनिफर अॅनिस्टनांच्या पूर्वजांचं घर जाऊ देत, ती दिसली का?
कित्ती छान वर्णन आणि फोटो !
कित्ती छान वर्णन आणि फोटो ! लग्गेच जावंसं वाटतंय
मृण्मयी: प्रेक्षणीय
मृण्मयी: प्रेक्षणीय
मृ आम्ही पुण्याला कोथरुडात
मृ
आम्ही पुण्याला कोथरुडात रहात असताना, एक बंगाली मुलगी एका तमिळियनशी लग्न करून आमच्या शेजारी रहायला आली. ती एकदा जेवायला आली असताना आता पटकन काय करायचं म्हणून आईने सुधारस केला होता. ते पाहून (आणि खाउन) ती हताश होउन आईला म्हणाली की, "लेकीन आप ऐसा क्यू करते है?" (हे ओकारांती करून वाचावे). तसेच आत्ता मिलर वाल्यांना विचारावे असे मला वाटत आहे. आणि हे रम्य फोटो टाकल्याबद्दल मायबोली आयडी मृण्मयी यांना पण
आणि ते बार स्टुलासमोर पण खुजं वाटण्याला अगदीच अनुमोदन
महान आहेस तू!!
महान आहेस तू!!
मृ
मृ
"प्रचि १ आणि ३ सारखेच आहेत
"प्रचि १ आणि ३ सारखेच आहेत काय? प्रचि ४ सगळ्यात मस्त! (थोडा क्रॉप करायला हवा होता ..) " :p
"तुम्ही अशाच ठिकाणी जायचं कसं काय योजिलं हो? (खुर्चीची ओढ सगळ्यांनांच! :p)"
"सगळा डिटेल वृत्तांत लिहा ना तुमच्या ट्रिप चा!"
>>>खुर्चीच्या खालून पण एक
>>>खुर्चीच्या खालून पण एक फोटो हवा होता. तो व्ह्यू मस्त असेल एकदम. पुढच्या वेळेला तो नक्की काढ.
सशल,
तुमच्या सखोल निरिक्षणाची दाद द्यायलाच हवी! किती बारकाईनं बघितलेत फोटो॓! तुमच्यासार्ख्या रसिकांमुळेच फोटो टाकायला हुरूप येतो.
भारी.. त्या खाली गाडी पार्क
भारी..
त्या खाली गाडी पार्क केलीये... :
मस्त..
(No subject)
फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि
फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि फोटोंचा संबंध कळला नाही. फोटोंच्या वर्णनातही काही उल्लेख आलेला नाही.
बाकी सगळेच
म्हणून मीपण 
(No subject)
<फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि
<फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि फोटोंचा संबंध कळला नाही. फोटोंच्या वर्णनातही काही उल्लेख आलेला नाही.>
मगलू लोकांना हा संबंध कळणार नाही
मृ, आप महान हो!!
मृ, आप महान हो!!

<फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि
<फोटो छान आहेत पण, शीर्षक आणि फोटोंचा संबंध कळला नाही. फोटोंच्या वर्णनातही काही उल्लेख आलेला नाही.>
मगलु म्हटल्यावर शीर्षक नीट वाचलं....
मगलू लोकांना हा संबंध कळणार नाही>>>>>>>>>>>>> मलाही कळला नव्हता...
भारी
समोरच्या अँगलमधून खुर्चीच्या
समोरच्या अँगलमधून खुर्चीच्या खाली निळी गाडी पार्क केलेली दिसतेय, आणि साइड अँगलने खुर्चीच्या बरीच पुढे एक निळी गाडी दिसतेय, खाली नाही दिसते, असं कसं? जादूची खुर्ची आहेसं वाटतंय
(No subject)
छान
छान
<<आम्ही रम्य जागी जायला
<<आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.>>
या वाक्यातुन आणि प्रचिंमधून तुमची जिज्ञासु वृत्ति झळकते आहे..माबोवरच्या या माहितीपर लेखामुळे भारतातल्या तमाम राजकरणी समुदायाला खुजं वाटु लागेल्..यासाठी तुम्हाला किती बरं धन्यवाद द्यावेत..
(No subject)
Pages