Submitted by सुधाकर.. on 17 June, 2012 - 14:08
इथे कधी कुणीच नसतं कुणाचं.
तरी असतं धाग्याला धागा जोडुन जगायचं
कधी कुठेच नसतं काही स्वतःच.
तरी का हरवलं काही माझं म्हणुन रडायच?
जन्मापासून असतं अखेर म्रुत्युकडेच चालायच.
तरी आयुष्य हे सजवायास पुन्हा पुन्हा झटायच.
आसवांना घालून बांध असतं थोडं हसायचं
आयुष्यभर स्वतःला, स्वत:च असत फसवयच.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आसवांना घालून बांध असतं थोडं
आसवांना घालून बांध असतं थोडं हसायचं
आयुष्यभर स्वतःला, स्वत:च असतं फसवायचं
सुंदर. फारच छान.
छान कविता.
छान कविता.
लय भारी...
लय भारी...
कधी कुठेच नसतं काही
कधी कुठेच नसतं काही स्वतःच.
तरी का हरवलं काही माझं म्हणुन रडायच? >>>> क्या बात है......
छानच.......... अभिनन्दन
छानच..........
अभिनन्दन
सर्वांचे खुप खुप आभर.
सर्वांचे खुप खुप आभर.
छानच. सकाळपासून रात्रीपर्यंत
छानच.
सकाळपासून रात्रीपर्यंत प्रहर प्रहर ओसरायचं
निद्रेच्या लघुमरणासाठी रोज जागरण करायचं..
असंच ना?