फसवणूक

Submitted by सुधाकर.. on 17 June, 2012 - 14:08

इथे कधी कुणीच नसतं कुणाचं.
तरी असतं धाग्याला धागा जोडुन जगायचं

कधी कुठेच नसतं काही स्वतःच.
तरी का हरवलं काही माझं म्हणुन रडायच?

जन्मापासून असतं अखेर म्रुत्युकडेच चालायच.
तरी आयुष्य हे सजवायास पुन्हा पुन्हा झटायच.

आसवांना घालून बांध असतं थोडं हसायचं
आयुष्यभर स्वतःला, स्वत:च असत फसवयच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कधी कुठेच नसतं काही स्वतःच.
तरी का हरवलं काही माझं म्हणुन रडायच? >>>> क्या बात है......