हे लोफ / मफिन्स लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर इ इ असे बहुगुणी आहेत
कोरडे जिन्नस:
दीड कप कणिक,
एक कप रोल्ड ओट्स *
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
३/४ कप ब्राऊन शुगर,
चिमुटभर मिठ (ऐच्छिक)
दालचिनी पावडर / वॅनिला इसेन्स - स्वादानुसार
ओले जिन्नस:
३/४ कप लो फॅट कनोला स्प्रेड / तेल
१ अंडे,
३/४ कप ते १ कप दूध / बटरमिल्क^^
इतर जिन्नस:
२ टेबलस्पून मध
--
पुढिलपैकी काहिही आवडेल ते - (ऐच्छिक)
३/४ कप पिकलेले केळे मॅश करुन / कुकिंग अॅपल / पेअर / अन्य फळं / सुकामेवा
पिकान्स / अक्रोड तुकडे
-----------
लोफ / मफिन्स :
१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. मफिन पॅन्स / लोफ पॅन्स ना ऑईल स्प्रे मारुन कणकेने डस्ट करुन घ्या. किंवा पेपर कप्स घालुन तयार ठेवा.
२. एका बोल मधे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन घ्या. यातच ड्रायफ्रुट्स / अक्रोड इ इ घालणार असाल तर मिसळा (व्हॅनिला इसेन्स वापरणार असाल तर तो वगळा).
३. दुसर्या मोठ्या बोल मधे ओले जिन्नस एकत्र करुन घ्या. (यात व्हॅनिला इसेन्स घाला).
४. आता ओल्या मिश्रणामधे हळु हळु कोरडे मिश्रण घाला. एकीकडे लाकडी चमच्याने / स्पॅट्युलाने मिश्रण हलकेच ढवळत रहा. असे सर्व कोरडे मिश्रण ओल्या मिश्रणात मिक्स्स करा. जास्त ढवळु नका.
५. ओले + कोरडे मिश्रण तयार झाले की यात मॅश्ड केळे / कुकिंग अॅपलचे तुकडे / पेअरचे तुकडे इ इ आपल्या आवडीप्रमाणे घाला आणि हलकेच ढवळून घ्या.
६. तयार मफिन / लोफ पॅन्स मधे मिश्रण ओतुन २०-२५ मिनीटे बेक करा.
हनी सिरप:
७. एका छोट्या बोलमधे मध आणि २ चमचे उकळते पाणी मिक्स करा.
८. लोव्ज / मफिन्स गरम असतानाच त्यांना टूथपिक ने वर भोके पाडा आणि त्यावर हे हनी सिरप चमच्याने पसरा.
बनाना + हनी + दालचिनी लोव्ज
सफरचंद + अक्रोड मफिन्स
१. मुळ रेसिपी मधे सेल्फ रेसिंग फ्लार, साधी साखर, बटर, बटरमिल्क वापरले आहे.
२. * रोल्ड ओट्स (ओटमिल) पटकन शिजतात. जर साधे ओट्स असतिल तर ते कोमट दूधात थोडावेळ भिजत घाला.
३. ^ मी आमंड मिल्क वापरले आहे. फुलक्रिम / स्किम्ड / लो फॅट / सोया कुठल्याही प्रकारचे दूध चालेल.
४. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. मी केळे घातले आहे म्हणून साखर कमी घेतली आहे. आणि फर्मली पॅक्ड ब्राऊन शुगर (बारीक आणि मऊ असते) वापरली आहे. मुळ रेसिपी मधे १ कप साखर वापरली आहे.
५. अर्ध्या मिश्रणात मी मॅश्ड केळे घालुन थोडे लोव्ज बनवले आणि उरलेल्यात सफरचंदाचे तुकडे घालुन थोडे मफिन्स बनवले आहेत.
६. हनी सिरप घातले नाही तरी चालेल. त्याऐवजी केरॅमल / चॉकलेट टॉपिंग घालता येइल. पण मग ते लो कॅल नाही होणार
७. असा एक लोफ 'ब्रेकफास्ट ऑन द गो' साठी बेस्ट त्याबरोबर इन्स्युलेटेड कॅरीकप (थर्मॉस) मधे दूध घेतले तर आणखिनच उत्तम
८. हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल
मस्त दिसतायत लाजो.
मस्त दिसतायत लाजो.
लाजो धन्य आहेस गं.. कधी वेळ
लाजो धन्य आहेस गं.. कधी वेळ मिळतो तुला हे सगळं करायला..
माझ्याकडून भलीमोठ्ठी शाब्बासकी!!!!!
मफिन्स लूकिंग टू ग्रेट!!!!!!!
वर्षुतै +१.
वर्षुतै +१.
लाजोच्या शेजारी घर शोधायला
लाजोच्या शेजारी घर शोधायला हवं
मस्त
मस्त
मस्तच ..
मस्तच ..
सही..........कसलं टेम्पटिंग
सही..........कसलं टेम्पटिंग दिसतय ते !
लाजो "द बेकिन्ग क्वीन ऑफ
लाजो "द बेकिन्ग क्वीन ऑफ माबो"!
मस्त दिसतंय. .. मानुषी +१
मस्त दिसतंय. ..
मानुषी +१
__/\__ वर्षू +१
__/\__
वर्षू +१
लाजो ______/\_____ हे करणं
लाजो ______/\_____
हे करणं मला ह्या जन्मात तरी शक्य वाटत नाही, पण आपण कधी भेटलोच तर तुझ्या हातचं आयतं हादडायला नक्कीच आवडेल
वर्षु +१
मानुषी +१
एकदम टेम्पटिंग!
एकदम टेम्पटिंग!
एकदम मस्त...... मला पण बेकींग
एकदम मस्त......
मला पण बेकींग फार आवडते पण " १ अंडं " इथे आमचं गाडं अडतं. आमच्या कडे सगळे म्हणजे " संपुर्ण शाकाहारी" अगदी अंडे सुध्धा नाही.............. ( नीराश बाहुली)
त्या मुळे खुप बंधनं येतात . अंड्यावीना ही रेसेपी होइल का ? (हा म्हणजे अगदी फालतु प्रश्ण झाला, पण काय करु)
वर्षू, रुणुझुणू, झकासराव +२००
वर्षू, रुणुझुणू, झकासराव +२००
लाजो, कमालेस तू खरंच... तू एखादं 'कप्स अॅन्ड क्रिम' किंवा 'लाजोज बेक शॉप' असलं काहीतरी काढच आता
त्रिवार _________/\_________ तुला
लाजो,खुपच मस्त! हेल्दी
लाजो,खुपच मस्त! हेल्दी रेसिपी..
रेसिपी क्वीन लाजो, थॅंक्यु !
रेसिपी क्वीन लाजो, थॅंक्यु ! थॅंक्यु ! थॅंक्यु !
मी रोज रोज ओट्स पॉरिज खावुन जबरी कंटाळले होते, मग मामीने मला ओटसचा उपमा सारखी एक तिखट रेसिपी दिली, ती मला फार आवडली. आज ओटस रेसिपीजमधे अजुन एकाची भर. हे गार खाल्लं तरी चालणार आहे, त्यामुळे ऑफिसमधे मधल्या वेळेचं खाणं म्हणुन मस्त होइल. या शनि/रविवारी नक्की ट्राय करणार. प्रयोग यशस्वी झाला तर नक्की कळवेन.
हे करणं मला ह्या जन्मात तरी
हे करणं मला ह्या जन्मात तरी शक्य वाटत नाही, पण आपण कधी भेटलोच तर तुझ्या हातचं आयतं हादडायला नक्कीच आवडेल>> अगदी अगदी.
पण खरच ग्रेट आहेस, काय काय शोधुन काढशील काही सांगता नाही येत. ___/\___
अवांतर : नुसते ओटस खायला
अवांतर :
नुसते ओटस खायला मलाही कंटाळा येतो.
मग दिनेशदांनी सांगितलेली ओटस धिरड्यांची रेसिपी करते.
आता मध्ये त्रिवेन्द्रमला गेले होते तेव्हा बिग बझार मध्ये पहिल्यांदाच क्वॅकरचे वेगवेगळ्या फ्लेवरचे पॅकेटस दिसले. छोटे ४-५ घेतले.
चांगले लागतात. आणखी घेऊन ठेवायला हवे होते. आता परत भारतात जाईपर्यंत फक्त प्लेन ओटस.
. कधी वेळ मिळतो तुला हे सगळं
. कधी वेळ मिळतो तुला हे सगळं करायला..>>>>>+++१११ खरच ग्रेट आहेस...
अरे व्वा,धन्यवाद लाजो नक्कि
अरे व्वा,धन्यवाद लाजो नक्कि करणार.
धन्यवाद लोक्स हेच मफिन्स
धन्यवाद लोक्स
हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल
मस्त रेसीपी आहे लाजो!! नक्की
मस्त रेसीपी आहे लाजो!! नक्की करुन पाहाणार !!
धन्य आहेस गो बयो
धन्य आहेस गो बयो ___/\____
वर्षे, झकासराव >> +१
मस्त लाजो, सहीच दिसताएत.
मस्त लाजो, सहीच दिसताएत.
लाजो, अगं कसले भारी दिसतायंत
लाजो, अगं कसले भारी दिसतायंत मफिन्स. नक्कीच करुन बघणार. ते मिनी लोफ पॅन कसले मस्त आहे. मी पहिल्यांदाच पाहिले
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
लाजो, हे पण मस्त दिसतंय
लाजो, हे पण मस्त दिसतंय
जहबहरीही..
जहबहरीही..
खरंच जबरी आहेत, फोटोत फारच
खरंच जबरी आहेत, फोटोत फारच सही दिसत आहेत. ती बटरमिल्क, गाजर किसून वै आयडीया पण लै भारी..
इथे मला बेकिन्ग सोडा मिळत
इथे मला बेकिन्ग सोडा मिळत नाहीये.... काय करू? तसेच हे मफिन्स किती दिवस टिकतात? धन्यवाद
Pages