'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)

Submitted by लाजो on 18 June, 2012 - 20:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे लोफ / मफिन्स लो कॅलरी, लो फॅट, हाय फायबर इ इ असे बहुगुणी आहेत Happy

BOM08.JPGकोरडे जिन्नस:

दीड कप कणिक,
एक कप रोल्ड ओट्स *
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
३/४ कप ब्राऊन शुगर,
चिमुटभर मिठ (ऐच्छिक)
दालचिनी पावडर / वॅनिला इसेन्स - स्वादानुसार

ओले जिन्नस:

३/४ कप लो फॅट कनोला स्प्रेड / तेल
१ अंडे,
३/४ कप ते १ कप दूध / बटरमिल्क^^

इतर जिन्नस:

२ टेबलस्पून मध

--

पुढिलपैकी काहिही आवडेल ते - (ऐच्छिक)

३/४ कप पिकलेले केळे मॅश करुन / कुकिंग अॅपल / पेअर / अन्य फळं / सुकामेवा
पिकान्स / अक्रोड तुकडे
-----------

प्रमाण तक्ते

क्रमवार पाककृती: 

BOM05.JPGलोफ / मफिन्स :

१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. मफिन पॅन्स / लोफ पॅन्स ना ऑईल स्प्रे मारुन कणकेने डस्ट करुन घ्या. किंवा पेपर कप्स घालुन तयार ठेवा.

२. एका बोल मधे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन घ्या. यातच ड्रायफ्रुट्स / अक्रोड इ इ घालणार असाल तर मिसळा (व्हॅनिला इसेन्स वापरणार असाल तर तो वगळा).

३. दुसर्‍या मोठ्या बोल मधे ओले जिन्नस एकत्र करुन घ्या. (यात व्हॅनिला इसेन्स घाला).

४. आता ओल्या मिश्रणामधे हळु हळु कोरडे मिश्रण घाला. एकीकडे लाकडी चमच्याने / स्पॅट्युलाने मिश्रण हलकेच ढवळत रहा. असे सर्व कोरडे मिश्रण ओल्या मिश्रणात मिक्स्स करा. जास्त ढवळु नका.

५. ओले + कोरडे मिश्रण तयार झाले की यात मॅश्ड केळे / कुकिंग अॅपलचे तुकडे / पेअरचे तुकडे इ इ आपल्या आवडीप्रमाणे घाला आणि हलकेच ढवळून घ्या.

BOM01.JPG

६. तयार मफिन / लोफ पॅन्स मधे मिश्रण ओतुन २०-२५ मिनीटे बेक करा.

BOM02.JPGहनी सिरप:

७. एका छोट्या बोलमधे मध आणि २ चमचे उकळते पाणी मिक्स करा.

८. लोव्ज / मफिन्स गरम असतानाच त्यांना टूथपिक ने वर भोके पाडा आणि त्यावर हे हनी सिरप चमच्याने पसरा.

बनाना + हनी + दालचिनी लोव्ज

BOM04.JPGसफरचंद + अक्रोड मफिन्स

BOM07.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ८ मिनी लोव्ज किंवा १२ स्टँडर्ड साईजचे मफिन्स होतात
अधिक टिपा: 

१. मुळ रेसिपी मधे सेल्फ रेसिंग फ्लार, साधी साखर, बटर, बटरमिल्क वापरले आहे.

२. * रोल्ड ओट्स (ओटमिल) पटकन शिजतात. जर साधे ओट्स असतिल तर ते कोमट दूधात थोडावेळ भिजत घाला.

३. ^ मी आमंड मिल्क वापरले आहे. फुलक्रिम / स्किम्ड / लो फॅट / सोया कुठल्याही प्रकारचे दूध चालेल.

४. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. मी केळे घातले आहे म्हणून साखर कमी घेतली आहे. आणि फर्मली पॅक्ड ब्राऊन शुगर (बारीक आणि मऊ असते) वापरली आहे. मुळ रेसिपी मधे १ कप साखर वापरली आहे.

५. अर्ध्या मिश्रणात मी मॅश्ड केळे घालुन थोडे लोव्ज बनवले आणि उरलेल्यात सफरचंदाचे तुकडे घालुन थोडे मफिन्स बनवले आहेत.

BOM06.JPG

६. हनी सिरप घातले नाही तरी चालेल. त्याऐवजी केरॅमल / चॉकलेट टॉपिंग घालता येइल. पण मग ते लो कॅल नाही होणार Proud

७. असा एक लोफ 'ब्रेकफास्ट ऑन द गो' साठी बेस्ट Happy त्याबरोबर इन्स्युलेटेड कॅरीकप (थर्मॉस) मधे दूध घेतले तर आणखिनच उत्तम Happy

८. हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल Happy सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल Happy

माहितीचा स्रोत: 
मुळ बनाना ओट मफिन रेसिपी आणि त्यात मी केलेले पौष्टिक बदल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो धन्य आहेस गं.. कधी वेळ मिळतो तुला हे सगळं करायला..
माझ्याकडून भलीमोठ्ठी शाब्बासकी!!!!! Happy
मफिन्स लूकिंग टू ग्रेट!!!!!!!

लाजो ______/\_____
हे करणं मला ह्या जन्मात तरी शक्य वाटत नाही, पण आपण कधी भेटलोच तर तुझ्या हातचं आयतं हादडायला नक्कीच आवडेल Proud
वर्षु +१
मानुषी +१

एकदम मस्त......

मला पण बेकींग फार आवडते पण " १ अंडं " इथे आमचं गाडं अडतं. आमच्या कडे सगळे म्हणजे " संपुर्ण शाकाहारी" अगदी अंडे सुध्धा नाही.............. ( नीराश बाहुली)

त्या मुळे खुप बंधनं येतात . अंड्यावीना ही रेसेपी होइल का ? (हा म्हणजे अगदी फालतु प्रश्ण झाला, पण काय करु)

वर्षू, रुणुझुणू, झकासराव +२००

लाजो, कमालेस तू खरंच... तू एखादं 'कप्स अ‍ॅन्ड क्रिम' किंवा 'लाजोज बेक शॉप' असलं काहीतरी काढच आता Happy

त्रिवार _________/\_________ तुला

रेसिपी क्वीन लाजो, थॅंक्यु ! थॅंक्यु ! थॅंक्यु !
मी रोज रोज ओट्स पॉरिज खावुन जबरी कंटाळले होते, मग मामीने मला ओटसचा उपमा सारखी एक तिखट रेसिपी दिली, ती मला फार आवडली. आज ओटस रेसिपीजमधे अजुन एकाची भर. हे गार खाल्लं तरी चालणार आहे, त्यामुळे ऑफिसमधे मधल्या वेळेचं खाणं म्हणुन मस्त होइल. या शनि/रविवारी नक्की ट्राय करणार. प्रयोग यशस्वी झाला तर नक्की कळवेन. Happy

हे करणं मला ह्या जन्मात तरी शक्य वाटत नाही, पण आपण कधी भेटलोच तर तुझ्या हातचं आयतं हादडायला नक्कीच आवडेल>> अगदी अगदी.

पण खरच ग्रेट आहेस, काय काय शोधुन काढशील काही सांगता नाही येत. ___/\___

अवांतर :
नुसते ओटस खायला मलाही कंटाळा येतो.
मग दिनेशदांनी सांगितलेली ओटस धिरड्यांची रेसिपी करते.
आता मध्ये त्रिवेन्द्रमला गेले होते तेव्हा बिग बझार मध्ये पहिल्यांदाच क्वॅकरचे वेगवेगळ्या फ्लेवरचे पॅकेटस दिसले. छोटे ४-५ घेतले.
चांगले लागतात. आणखी घेऊन ठेवायला हवे होते. आता परत भारतात जाईपर्यंत फक्त प्लेन ओटस.

धन्यवाद लोक्स Happy

हेच मफिन्स दुपारच्या नाश्त्याला करायचे असतिल तर साखर, फळे न घालता किसलेले गाजर / कॅप्सिकम / कॉर्न आणि आलं लसुण पेस्ट / गरम मसाला / जिरे-मिरे / ओवा / इटालिअन हर्ब्ज, दूधाऐवजी बटरमिल्क आणि चविला मिठ घालुन सेवरी टाईप्स करता येतिल. यात आवडीप्रमाणे थोडे चिझ देखिल घालता येइल Happy सॉस बरोबर गरमागरम छान लागतिल Happy

लाजो, अगं कसले भारी दिसतायंत मफिन्स. नक्कीच करुन बघणार. ते मिनी लोफ पॅन कसले मस्त आहे. मी पहिल्यांदाच पाहिले Happy

Pages