एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची शाब्दिक बाचाबाची, दोन्हीवेळा समेवर पाणीपुरी - हे मस्तच जमलं.
पण गाण्याची जागा चुकलीच जराशी... असं वाटलं मला.

पण गाण्याची जागा चुकलीच जराशी... असं वाटलं मला.>>> असेल, पण दिवस बरोब्बर निवडला होता. काल सगळ्या माबोकरांची अवस्था 'तुझ्या विना...' अशीच झाली होती. Proud

बॅक्ग्राउंडला गाणं लावणं वगैरे ठीके हो, पण अख्खं गाणंच फिलर म्हणून सिरियलमधे घुसडायचं याला काय अर्थ आहे... वेळकाढूपणा आहे झालं हा राजवाड्यांचा.... आता इजहार-ए-मुहोब्बत का काय म्हणतात तेवढंच राहिलंय कथानकात.

अवांतर : कालच्या एपिसोडमधे बॅकग्राउंडला QSQT मधलं म्युझिक वाजत होतं Proud

मंजे, राजवाडेंना कै बोलायच नाही. Lol एवढा रोमँटिक फिल दिला त्याच काही नाही, तुम्हाला ना सरधोपट ते कौटुंबिकच सीन बघायची सवय लागलिये. हिरो हिरविणीने काय प्रेमाची कबुली, हुरहुर काय स्वयंपाकघर नायतर परसदारात व्यक्त करायची काय?? Proud
लालपाढर्‍यातला स्वप्नील आणि पांढर्‍या ड्रेसमधली मुक्ता फारच छान दिसत होते.

मला काल ते गाण बघताना सारखं सरफरोशमधल्या आमिरसारखा स्वप्नील लाल शर्ट काढुन लंबोदराच दर्शन घडावतोय का अशी भिती वाटत होती Lol
गाण्याचा सगळा फील, जो हाल दिलका इधर हो रहा है सारखाच होता अगदी स्वप्नीलचा ड्रेसपण.

QSQT मधलं म्युझिक >>> हो, हो... ते ऐकून कालेजातल्या दिवसांची लैच आठवण झाली. Happy

प्राची Lol
खरंय तुझं. माबो व्यसनमुक्ती विभाग काढायला लागणार मुक्तांगणला लवकरच.. Happy

QSQT मधलं म्युझिक >>> हो, हो... ते ऐकून कालेजातल्या दिवसांची लैच आठवण झाली. <<<
अगदी अगदी लले Happy

शुभे Lol

कालेजातल्या दिवसांची लैच आठवण झाली>>>>>>>>>> आणि पुढे 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन' असं पण गाणं मनातल्या मनात ऐकायला यायला लागलं

हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है....

पण एका शॉटमध्ये हिरो-हिरवीन मर्त्य मानवासारखे बोलताहेत आणि दुसर्‍या शॉटला बीचवर, पर्वतावर, जंगलात गाणं म्हणताहेत हे आजपर्यंत पिक्चरात पाहिलं होतं. इथे सिरियलीत राधा आणि घना एका क्षणाला पाणीपुरी, रिक्षा ह्या गोष्टींतून दुसर्‍या शॉटला एकदम समुद्राची गाज, खडकावर बसलेला घना इथे पोचलेले पाहून मध्ये माझा डोळा लागला की काय अशी शंका आली Proud

मातोश्री बालिकाबधू पाहून ८:३० ला झी मराठी लावत असल्याने मालिकेचं शीर्षकगीत चुकतं माझं. पण एपिसोड सुरु होण्यापूर्वी शेवटची फ्रेम एका बाजूला घना, एका बाजूल अबिर आणि मध्ये राधा अशी हवी. .....मग टॅगलाईन - अबिर, ज्याच्यामुळे राधा आणि घनाला एक्मेकांचं महत्त्व समजलं

गाण्याचे एकूण पिक्चरायजेशन पाहून मला 'सूरज हुआ मध्धम..' आठवले. लाल शर्ट वगैरे ठीक आहे हो, पण घनासारखी 'बॉडी' असणार्‍यांनी पारदर्शक शर्ट घालू नये, असे सुचवावेसे वाटते. तरी नशिब, घना शारुकसारखा पाण्यात भिजला वगैरे नाही. अन्यथा पारदर्शक शर्ट अंगाला चिकटणे वगैरे दुर्धर प्रसंग झाला असता. Wink

राधा मात्र पांढर्‍या कपड्यांमधे, फॉर अ चेन्ज, जरा बारीक दिसत होती. आणि त्यामुळे सुंदरही ! Happy

गाण्याचे एकूण पिक्चरायजेशन पाहून मला 'सूरज हुआ मध्धम..' आठवले. लाल शर्ट वगैरे ठीक आहे हो, पण घनासारखी 'बॉडी' असणार्‍यांनी पारदर्शक शर्ट घालू नये, असे सुचवावेसे वाटते. तरी नशिब, घना शारुकसारखा पाण्यात भिजला वगैरे नाही. अन्यथा पारदर्शक शर्ट अंगाला चिकटणे वगैरे दुर्धर प्रसंग झाला असता >>> Happy
मला घनाला पाहून गोविंदाचं 'कुली नं १' आठवलं Happy लाल शर्ट आणि पांढरा पायजमा Happy
राधा मात्र एकदम सहज सुंदर... नेहमीसारखी ! Happy

दोघांचं 'हा' आणि 'ही' वालं संभाषण मस्तच होतं...

रच्याकने, तो 'एक तासाचा' पेशल येपिसोड झाला का ?

काल चे गाणे छान होते.......पण वैशाली सावंत चा आवाज लागला नाही........तिचाच आवाज जास्त खटकत होता.....तिच्या पेक्षा बेला शेंडे चा आवाज जास्त छान दिसला असता मुक्तावर.. Happy

तो 'एक तासाचा' पेशल येपिसोड झाला का ?>>>>>>>>> Lol येडा बनवला राजवाडे ने तमाम पब्लिकला, सगळे शनिवारपासून ८ ते ९.३० झी मराठी लाऊन पहात होते, पण हाय रे दैवा! एक तासवाला येपिसोड काई दिसता दिसेना Proud

एक जरा अवांतर प्रश्न -

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमात फाळकेंच्या मुलांची कामं केलेले जे २ बाल कलाकार आहेत, त्यातल्या धाकट्याचं नाव अथर्व काहीतरी आहे; मोठ्याचं माहित नाही; पण तोच मोठा आता अधिक मोठा होऊन ज्ञानाची भूमिका करतोय का?

लाल शर्ट वगैरे ठीक आहे हो, >>>> अर्धपारदर्शक लाल शर्ट इन न केल्याने दिसणारी त्यातून दिसणारी पांढरी पॅण्ट सगळ फारच ओंगळ दिसत होत. ते मिथुन ला वगैरे ठीक दिसत हो.

तू अगदी काय ते अगदी ही मुलगी आहेस.... तू म्हणजे ना काय ते अगदी हा मुलगा आहेस... बघायला फार मजा वाटत होती.

ज्ञानेश, घना-लालशर्ट-पारदर्शक-भिजणे... सगळ्याबद्दल अनुमोदन Happy

पण वैशाली सावंत चा आवाज लागला नाही<<<
ती सामंत आहे.

पण तोच मोठा आता अधिक मोठा होऊन ज्ञानाची भूमिका करतोय का?<<
हो..
काय पटापट मोठी होतात नै मुलं Proud

गायक काय. कालचं ते गाणंच मला बोर झालं. ललि म्हणते तसं त्या गाण्याची जागा लईच चुकली. इतक्या फर्मास सीननंतर तर अगदीच नको नको. Happy

उत्साही लोकांनो, जरा ब्रेक घ्या.
ह्या धाग्यावर २०००च्या वर पोस्टी झाल्या आहेत. संकेत असा आहे, की साधारण २०००च्या वर पोस्टी गेल्या की तो धागा बंद करावा- पानं लोड होण्याच्या दृष्टीने. त्यामुळे कोणीतरी नवीन धागा सुरू करा- गोष्ट पुढे चालू असा Happy
पुढच्या पोस्टी नव्या धाग्यावर लिहूया.

कालच्या तुझ्याविना मधे.... घना एकदम 'तुंदिलतनू" दिसत होता...
कधी तू चं एक्स्टेंशन होतं ते गाणं........... कशाला तो पारदर्शक कपडे घालून शाहरुखसारखं हात पसरवायचा अट्टाहास......... गड्या आधी जरा पोट बघ Proud

त्याची पँट म्हणजे अक्षरश: कोल्हापुरी लेंगा होता......... Angry

बाकी दोघांमधले संवाद मात्र छान होते काल.

गायक मंगेश बोरगावकर आणि वैशाली सामंत........ त्यापेक्षा निहिरा जोशी हवी होती गायिका..........
महालक्ष्मी अय्यर पण चालली असती Happy

Pages