एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण अबीर 'अ‍ॅब्ज ' आवडला. हनुवटीवरील खळी गोड आहे. स्वप्नील त्यामानाने थोराड व लोद्या स्पेसिफिकेशन्स चा आहे. ( काम मस्त करतो आहे नो तक्रार) मुक्तीचा कुर्ता पाहिलात का काल? छान होता. बरोबर लेंग्थचा. आणि लेगिंग्ज. आपला फीडबॅक पोहोचला आहे. आता ती बेकार पर्स बदलून नवी दिली म्हणजे बरे.
लहान पणा पासून आपले बाबा स्वयंपाक, कॉफी इत्यादी करून वैतागले असतील हे मुक्ताच्या पात्राला समजत नाही का? ते बरोबर दाखविले आहे.

मुक्ता घरी आली ती काळ्या लेगिंग्जमधे , आणि पपांवर वैतागून दुसर्‍या खोलीत जाऊन बसली, तेव्हा मरून लेगिंग्ज होते.

मुक्ता घरी आली ती काळ्या लेगिंग्जमधे , आणि पपांवर वैतागून दुसर्‍या खोलीत जाऊन बसली, तेव्हा मरून लेगिंग्ज होते.>>>>>>>>>> काय हे आता काय तिने लेगिंग्ज बदललेले पण दाखवायला हवे काय??

काय हे आता काय तिने लेगिंग्ज बदललेले पण दाखवायला हवे काय??
>>>>>>>>>>

Rofl

कंटिन्युटी चेक ठेवायला विसरले बहुतेक......... Proud

दुसर्‍या भागापासून अबीरला बघायला मजा येतेय. काय मस्त काम करतो उका. पहिल्या भागात जरा स्लो स्टार्ट घ्यायला हवा होता त्याचं कॅरेक्टर रंगवण्यात. कालचा भाग छान होता. आजच्या भागात घना आणि अबीरला समोरासमोर बघायला अजून मजा येईल असे वाटते. प्रेमत्रिकोण ही संज्ञा कितीही घिसीपिटी असली तरी कथा, संवाद, कलाकार चांगले असतील तर मी दरवेळी ते त्रिकोण तितक्याच उत्साहाने बघू शकते हे सिद्ध झाले Wink

सिरियलवाल्यांना हेच हवंय की तुम्ही फार लक्षपूर्वक एपिसोड बघावेत रोजच्या रोज
>>>>>>

अच्छा, म्हणून राधाला लेगिंग्ज का काय ते बदलायला लावले काय.... बरं बरं..... Proud Rofl

खरे तर हा त्रिकोण वगैरे नाहीये अजून तरी. राधा घना इज अ कपल. अ‍ॅब्ज इज जस्ट देअर. तसा तर मानव पण आहे एक तर्फी पण ते विनोदाच्या अंगाने गेले आहे. तिला अबीर बद्दल आकर्षण वाटेल का अशी नुसती शंका येऊन त्या बेसिस वर घनाच्या मनातले राधाबद्दलचे प्रेम अधिक ठळक होइल, व्यक्त होइल. असे वाटते. कभी कभी ऐसा होता है नं?

आणि राधाचेही घनावरचे प्रेम होते आहेच अजून ठळक.. पाणीपुरीचेही समर्थन करायला लागली आहे ती, आणि 'मिस्टरांच्या' स्वयंपाकाचे कौतुकही! Happy

लोद्या स्पेसिफिकेशन्स >>:हाहा: काय हो अमा! स्वप्निल गोड आहे!

टोके, मला अजूनही कालचे कुहूचे "घनादादा घनादादा" हे शब्दच ऐकू येतायत Wink
काय अप्रतिम काम केलं काल कुहूने. नंतर मी काही पाहिलंच नाही Proud

काल स्व. जो. ला अबीर बद्द्ल कळाले तेव्हाचे त्याचे expressions एकदम मस्त.. थोडासा jealous वगैरे.. मला आवडले.. Happy ....

गेल्या पंधरावीस दिवसांतले सगळे भाग मस्त होते. मनस्विनी, स्वप्नील, मुक्ता एकदम फॉर्मात. मुक्ता-राधा यांचे नकळत प्रणयाराधान छान रंगले आहे. रात्री झोपायच्या आधी एकमेकांना फोन,फोन ठेवण्यासाठी पहले आप पहले आप करायचं
सकाळी उठले की परत पहिला फोन तिकडेच. एकमेकांना भेटायला जायचे आणि तुझ्या घरच्यांना भेटायला आलोय सांगायचे.
काल वडिलांनी तुझ्या इथे असण्याचा मला कंटाळा आलाय असं अगदी गमतीत म्हटल्यावरच्या राधाच्या प्रतिक्रिया मुक्ताने सॉलिड रंगवल्या.
पSSSSण ( Wink )...........राधाच्या घरी पीजी ठेवला जातोय म्हटल्याबरोबर लगेच सॉन्याच्या शेजारपाजारचे पीजी चोर्‍यामार्‍या करायला लागतात हे अगदी सरधोपट.
घनाच्या डोक्यातला गोंधळ वाढवायला चक्क ज्ञानाला प्रेमात पाडायचं म्हणजे भारीच.

ओह....
काय घाबरलो मी...सेन्सॉर करण्यासारखं काहीतरी लिहिलं म्हणून Lol

मुक्ता-स्वप्निल किंवा राधा-घना हवं आहे तिथे. Lol

मुक्ता-राधा यांचे प्रणयाराधन वाचून मीच घाबरले Lol

भरत Biggrin

Lol

ह्या आठवड्यात कधीतरी स्पेशल वन अवर भाग आहे त्यात ते तुझ्याविना गाणे येणार आहे. मी आधीच सांगितले बघा. प्लॅन करा.

मुक्ता घरी आली ती काळ्या लेगिंग्जमधे , आणि पपांवर वैतागून दुसर्‍या खोलीत जाऊन बसली, तेव्हा मरून लेगिंग्ज होते.
>>>>>>>>>>>>> हो माझ्याही लक्षात आलं होतंते!
>>>>>>>>लोद्या >>>>>> अगदी अगदी अमा! कम्प्लीट लोद्या!

Pages