एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधाचे ड्रेस खरंच गंडले आहेत. सगळे कुडते म्हणजे 'खरंतर थोडा शॉर्ट कुडता शिवायचा होता. पण कापड फारच कमी पडलं बै. म्हणून बाकी फ्याशन तशीच ठेवून जीन्सवरच्या टॉप एवढी लेंथ ठेवली' असे वाटताहेत!

टोकू, तसा मी पण कोणाचा नवरा नाही ग वाटत पण काय करणार ..... असतं एकेकाचं नशीब >>>>>> खरंय भुंग्या Biggrin

लले, नक्की काय म्हणायचंय तुला?
अभीर असंच ऐकू आलं का तुला? मला तरी अबीर ऐकू आलं.

अबीर असं नाव नसतंच असं म्हणत असशील तर FYI जयू-नचिकेत यांच्या मुलाचं नाव अबीर आहे.

टोकूरिकाने कुणाच्याही प्रश्नाचे उत्तरच दिले नाही.
गिरिश रसिकाचा नवरा वाटत नै म्हणजे काय नक्की? Happy

नेहाला बहुतेक त्याच्या दिसण्या आणि या सिरेलीतल्या अभिनयक्षमतेवरुन तो रसिकाचा नवरा असू शकत नाही असे वाटले असेल कारण रसिका दोन्ही बाबतीत वरचढ होती (अर्थात हा माझा कयास आहे) Happy
बाकी एकमेकांना समरुप जोडीदार अपवादानेच असतात, उरलेले कुठेना कुठे तरी कमी जास्त असतातच आणि म्हणुन ते नवरा-बायको असतात Lol

राजवाडेंचा सेन्स ऑफ ह्यूमर लाजवाब! उमेश कामत शूटर? मी सोफ्यावरून पडले हसता हसता. अरे मुला, तुझी उंची काय, ती गन केव्हढी मोठी? त्याच्या recoil ने हे महाराज आडवे होतील. माझ्या मनात एकदम 'ये बच्चोंके खेलनेकी चीज नही' हे उद्गार आले एकदम.

दुसर्यांच्या घरात डोकावण्याची किती उत्सुकता आहे सर्वाना. ते रसिका आणि गि जो बघतील ना एकमेकांना अनुरूप आहेत कि नाहीत, बाकीच्यांना का एवढी काळजी त्याची.

ज्ञाना सुध्दा कुणाच्यातरी प्रेमात पडलाय का? अस काहीतरी काल मी अर्धवट पाहिल. प्रेमाचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करायला हवा अस काहीतरी तो म्हणत होता Lol

उमेश कामतचं पात्र आत्तापर्यंत जेवढं दाखवलं त्यावरुन तरी 'कुछ जम्या नहीं' असं वाटलं. अतिरंजित वाटलं. अर्थात तो कटाचा भाग म्हणून घरी आला असेल तर मग ठीक आहे.

अबीर असं नाव नसतंच असं म्हणत असशील तर FYI जयू-नचिकेत यांच्या मुलाचं नाव अबीर आहे.>>>
पंजाबमध्ये बीयर ला बीर म्हणतात व ते पिणारे सर्व "बीरजी" असतात
म्हणून

उका हा नक्की अबीर आहे
अ---- बीर ( म्हणजे बीयर न पिणारा Happy
म्हणजे बीर न पिणारा "अ----बीरजी"

परवाच्या भागात ती सुनेची आठवण काढणारी, गहिवरणारी सासू पाहून अगदी भरून आले. अशी सासू एक दिवस का होइना मिळावी. Happy नशीबच हवे.

घनाचे प्रेम व आकर्षण विश्लेषण छान वाटले. त्याला हळू हळू आपण प्रेमात पडलो आहेत हे समजून येत आहे का?
एक साधी गोष्ट, ती लोखंडी कॉट व त्यावरचे अंथरूण हा चांगला ट्च होता. नाहीतर कायम डिझ्यायनर हे ते फर्निचर साड्या असलेच असते. आत्या चे काम करणारी नटी भारती आचरेकर मार्गाने जात आहे, वय प्लस वजन. बोजड चेहरा इत्यादी. थोडी वजनाची काळजी घेतली तर?

आत्या चे काम करणारी नटी भारती आचरेकर मार्गाने जात आहे >>>>>> ??? तुम्हाला आसावरी जोशी म्हणायचे आहे का ?

<<< उमेश कामत शूटर? मी सोफ्यावरून पडले हसता हसता. अरे मुला, तुझी उंची काय, ती गन केव्हढी मोठी?

स्वप्ना, शूटर असण्यासाठी खेळाडूची उंची " तेव्हढी " महत्वाची नसावी ( हे माझं प्रामाणिक मत Happy , मला ह्यातली जास्त माहिती नाही Happy ). अंजली वेदपाठक भागवत ही आपल्याला माहित असलेली शूटर , जी फारफार तर ५.५ फूट उंच असेल. अभिनव बिंद्राची उंची मला माहित नाही Happy

बायदवे, मला सुद्धा अजूनही त्याचं नांव अबीरच ऐकू येतंय Proud

फिटनेसच्या बाबतीत अजूनतरी उ का खेळाडू शोभतोय/ वाटतोय Proud

उमेश कामतचं पात्र आत्तापर्यंत जेवढं दाखवलं त्यावरुन तरी 'कुछ जम्या नहीं' असं वाटलं. अतिरंजित वाटलं. + १

राष्ट्रीय स्तरावरचा नेमबाज आहे तर ह्याला तरी किमान सराव करण्यासाठी घराबाहेर पडलेला दाखवावा. नाहीतर घनासारखा, दिग्याकाकासारखाच हाही सतत रिकामटेकडा घरात बसलेला आणि तरी भरपूर पैसे कमावणारा! Uhoh

त्याची आणि राधाची वादावादी, मग मैत्री असं हळूहळू दाखवतील. मग काळे कुटुंबाला ब्रेक मिळेल जरासा.

बघायला खूप माणसं आहेत Proud काळे कुटुंब मोठं आहे चिकार!
किमान तो बाहेरून आलाय किंवा चाललाय हे तरी दाखवता येईल, संवादांमधून ऐकवता येईल.

तो नेमबाजीच्या सरावासाठी/ स्पर्धेसाठी बाहेर पडला तर मग इथे विचारणार 'तो कूक कसा काय?' किंवा 'नेमबाजीच्या खेळातून भरपूssर पैसे कसे काय मिळतात?'

त्यापेक्षा जे दाखवताहेत त्याला आपलं म्हणा!

Proud

Lol खरंय!

उमेश कामतचं पात्र आत्तापर्यंत जेवढं दाखवलं त्यावरुन तरी 'कुछ जम्या नहीं' असं वाटलं. अतिरंजित वाटलं. + १

त्याची आणि राधाची वादावादी, मग मैत्री असं हळूहळू दाखवतील

त्याची राधाशी वादावादी होण्याआधी घनाशी होईल अशी चिन्हे दिसताहेत. घनाने राधाला कॉल केलाय तिच्या सेलवर आणि हा मि. पर्फेक्ट तिचा सेल उचलुन घनाला आपण कोण म्हणुन प्रेमळ चौकशी करतोय...

त्याची आणि राधाची वादावादी, मग मैत्री असं हळूहळू दाखवतील
बापरे! आणखी इतकी पिळवणूक बाकी आहे म्हणायची. Wink
काय तो लवकर निकाल लागू दे एवढेच त्या देवाकडे मागणे. Wink
त्या मालिकेतला पात्रांच्या संवादातला वेळकाढूपणा कमी केला तरी संवादाच्या दहा ओळी जास्त म्हणता येतील.

'अबीर' म्हणजे कपाळाला लावतात तो काळा बुक्का ना? (अबीर गुलाल उधळीत रंग.. नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग).

Pages