एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अरे... इतके एपिसोड पाहून त्यावर चर्चा करून झाली तरी लेखक वाल्मिकी आहे की व्यास हेच ठरवताय अजून Proud

पटकथा चिमाची आहे>>>>>>> हा, म्हणजे दुधी हलवा आणि प्रभातचा अ‍ॅक्सिडंट दोन्हीही घडवून आणू शकतो भुंगा संध्याकाळच्या चहाला Wink

दुधी हलवा आणि प्रभातचा अ‍ॅक्सिडंट दोन्हीही घडवून आणू शकतो भुंगा संध्याकाळच्या चहाला >> ऐसा क्यु??? भुंग्याची एवढी वट???

कोण मनस्विनी? संवाद - चिन्मय मांडलेकर असं दाखवतात ना?

नीट बघत जा की.. हल्ली तर मेले बघायलाही मिळत नाही.. थेट सिन्स सुरू करतात, मग नावे कोण वाचत बसेल?????

भान हरपणारे सीन्स म्हणजे? बापरे, इथेही त्या 'बडे अच्छे लगते है' सारखं दाखवणारेत का?

भान हरपणारे सीन्स म्हणजे? बापरे, इथेही त्या 'बडे अच्छे लगते है' सारखं दाखवणारेत का?
>>>>>>>>>> फक्त अश्याच सीनने भान हरपतं का तुमचं Happy Light 1

फक्त अश्याच सीनने भान हरपतं का तुमचं
>>>>>>>>>>>>>>>

भानने अगदी भानावर आणणारा मार्मिक प्रश्न विचारलाय Proud

>>>>>>>>>> फक्त अश्याच सीनने भान हरपतं का तुमचं
Lol
मराठी मालिका हिंदीच्याच वाटेवर चालल्यात सगळ्या. म्हणून बोललो हो Wink

मराठी मालिका हिंदीच्याच वाटेवर चालल्यात सगळ्या. म्हणून बोललो हो >>>>> नाहि हं. आत्ताच्या एकाहि हिंदी मालिकेत मुख्य नायिका नोकरी करताना दाखवलीय? लग्नानंतर साडी तीहि भरजरी ,त्यावर भरमसाठ दागिने ई न घालता साधे पंजाबी सूट घातलेली नायिका बघितलीय? म्हणूनच आमची एलदुगो वेगळी आहे हो Happy

अरेच्चा!! मंजिरीसोमण तुला मनु माहित नाही काय? मनस्वीनी लता रविंद्र Proud इकडे बरेच जवळचे लोक तिला मनु म्हणतात Biggrin
मंदार, तुला इतकाच त्रास होत असेल तर पाहु नकोस की रे दाद्या Angry Proud उगाच इथे टीआरपी वाढवतोस. एका फुटकळ सिरेलच्या बीबीवर २००० च्या आसपास पोस्टी Uhoh

तेच ना साधना, आणि सिन्स पण असे सुरू करतात ना एकदम की भानच हरपतं बघ

हो गं.... परवा शेवटच्या सिनचा काल सुरवातीला रिपीट टेलेकास्ट.. तरी आम्ही चवीने पाहिला Proud

भान हरपणारे सीन्स म्हणजे? बापरे, इथेही त्या 'बडे अच्छे लगते है' सारखं दाखवणारेत का?

अजुन वेळ आहे हो....... आत्ता तर कुठे प्रेमात पडलेत... Wink

खुशी Uhoh

>>पपांनी राधाचा या घरावरचा हक्क पुसून टाकलाय. तिला वाटणारच ना असुरक्षीत? तिची परीस्थिती तर ना घर की ना घाट की अशी झालीये त्यामुळे.

कैच्या कै माधव. माहेरच्या घरात पेइंग गेस्ट आला की तिला त्यात असुरक्षित वाटणार? वडिलांना राधा जवळची का अबिर? आणि पर्याय म्हणून फक्त घनाचं घर आहे काय? तिथे जाण्यासाठी एव्हढा गळेपडूपणा? स्वतःच्या पायावर उभी आहे ती. एक भाड्याचं घर घेऊन नक्कीच राहू शकते. Angry

आणि हलव्याचं म्हणाल तर राधाची आत्या लाल, दुधी भोपळाच काय तर बीटाचा हलवा पण करू शकते....मागे खवय्येमध्ये केला होता तो तुपात पोहणारा हलवा. आहात कुठे? त्या अबिरसमोर तिने तो ठेवला तर तो जो पळत सुटेल तो भारताबाहेर गेल्यावरच थांबेल.

रच्याकने, बडे अच्छे लगते है टीआरपी सावरण्याचा नवा प्रयत्न म्हणून ५ वर्षांनी पुढे जातेय. त्यात राम आणि साक्षीला एक मुलगी दाखवली आहे. इव्हा ग्रोव्हरने आजीचा रोल करायला नकार दिल्याने तिचं कॅरेक्टर मेलेलं दाखव्नार आहेत (भिंतीवर फोटो, फोटोला हार, आणि 'आज तुम्हारी दादी जिंदा होती तो टाईप्स ड्वायलॉग्ज).

रच्याकने, बडे अच्छे लगते है टीआरपी सावरण्याचा नवा प्रयत्न म्हणून ५ वर्षांनी पुढे जातेय. त्यात राम आणि साक्षीला एक मुलगी दाखवली आहे. इव्हा ग्रोव्हरने आजीचा रोल करायला नकार दिल्याने तिचं कॅरेक्टर मेलेलं दाखव्नार आहेत (भिंतीवर फोटो, फोटोला हार, आणि 'आज तुम्हारी दादी जिंदा होती तो टाईप्स ड्वायलॉग्ज).

>>>

बाप्रे
याक्स
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई

=================================================

आणि हलव्याचं म्हणाल तर राधाची आत्या लाल, दुधी भोपळाच काय तर बीटाचा हलवा पण करू शकते....मागे खवय्येमध्ये केला होता तो तुपात पोहणारा हलवा. आहात कुठे? त्या अबिरसमोर तिने तो ठेवला तर तो जो पळत सुटेल तो भारताबाहेर गेल्यावरच थांबेल.
>>>>>

Rofl

आणि हलव्याचं म्हणाल तर राधाची आत्या लाल, दुधी भोपळाच काय तर बीटाचा हलवा पण करू शकते....मागे खवय्येमध्ये केला होता तो तुपात पोहणारा हलवा. आहात कुठे? त्या अबिरसमोर तिने तो ठेवला तर तो जो पळत सुटेल तो भारताबाहेर गेल्यावरच थांबेल.

>>>>> Rofl

तो बिटाचा हलवा करायला दाखवलेला खवय्येचा एपिसोड मी सुद्धा पाहिला होता. हरे राम!

आजचं goof-up म्हणजे अबीर होमियोपथीची औषधं सांगत असतो आणि राधाला सांगताना सांगतो की तो B.A.M.S ला पण गेला आहे.

हायला, मुलगी माहेरी आली तर इतकं काय 'ते' वाटायला पाहिजे... कैच्याकै. (आम्ही तर सतरांदा जातो.. तरीही कोणी विचारत नाही... का का बाबा घरी आलीस..?) Proud

मी पाहिला कालचा भाग. इतके काय ते चिकटणं घनाला... कशाला आणि कोणाला दाखवायला?

प्रेम स्विकारायला इतका वेळ... काय ते हो म्हणा नी करा एकदाचं(म्हणजे मालिका पुढे तरी जाईल.. हो). Wink

उलटं राधाने ज्यास्त खेचली पाहिजे घनाची.. तोच म्हणला होता ना की तो म्हणजे एक त्रास आहेस.. इथे ती तर कधी एकदा घना हो म्हणतोय व मी जाईन त्याच्या घरी.... छ्या...

होय मनस्विता , मी सुद्धा ऐकलं ते. मन:स्विनी लता रविंद्रला ते माहित नसावं Wink

असला सणसणीत सेकंड हाफ होऊन सुद्धा इकडे एकही पोस्ट नाही?? आग़ अभी दोनों तरफ लगी है Wink उ का चा मिश्किलपणा जाम आवडला Wink

<< उलटं राधाने ज्यास्त खेचली पाहिजे घनाची.. तोच म्हणला होता ना की तो म्हणजे एक त्रास आहेस

झंपी, हे पटलं बरंका Happy

तो पेइंग गेस्ट उमेश कामत (?) तो शरद केळकर चा भाउ/मुलगा म्हणून शोभेल, एकदम सेम फेसिंग आणि हास्य आहे !
index.jpgimages_2.jpg

एक मोठ्ठा फरक आहे डीजे, शरद केळकरला हल्लीच कुछ तो लोग कहेंगे मध्ये पाहिला मी. भयंकर अवघडलेला वाटतो, मी त्याची सात फेरे ही झी वरची सीरीयल पाहिलेली नाही. कुछ तो मध्ये तो मोहनीश बेहलला रीप्लेसमेंट म्हणून आलाय. त्या कॅरॅक्टरची तशी गरज असली तरी त्याचा वावर ईझी नाहीये. ह्याउलट उमेश कामत काँन्फिडंट तर आहेच पण त्याचा अभिनय फारच सहज आहे. तू त्याची असंभव सीरीयल पाहिली नव्हतीस का? सतिश राजवाडे दिग्दर्शित. तेव्हापासून मी उ का ची फॅन आहे पण सतिश राजवाडेची मात्र ऑन ऑफ फॅन आहे Happy

नाही संपदा, मी ए.ल.दु.गो सोडून कुठली मराठी सिरियल पाहिली नाहीये गेल्या १० वर्षात :), हा उमेश कामत इसम पण पहिल्यांदाच पाहिला.
शरद केळकर ची अ‍ॅक्टिंग बोंब आहेच, सात फेरे पासूनच अवघडलेलाय Proud
मी कुछ तो लोग कहेंगे नाही पहात , मला स्टार कास्ट नाही आवडत.. मोनिश बहल ठोकळाच होता आणि मेन म्हणजे ती निधी चा रोल कोण करते ती अ‍ॅक्ट्रेस प्रचंड इरिटेटिंग वाटते.. नाकाचं हाड वाढल्या सारखी बोलते..

Pages