Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माईआज्जींनी हा प्लॅन करून
माईआज्जींनी हा प्लॅन करून रिस्क घेतली आहे बुवा. समजा राधा घनाला सोडून अबिरच्या मागे लागली तर? मग राधा आणि अबिर बसून गुजगोष्टी करताहेत आणि घना तिथे आला तर बॅकग्राउन्डला गाणं वाजेल - कारे कारे बादरा जा रे जा रे बादरा, मेरी अटरिया ना शोर मचा.
ह्या बाफवर दोन ग्रूप आहेत.
ह्या बाफवर दोन ग्रूप आहेत. आवडती मालिका आणि नावडती मालिका असणारा. आणि दोनहि ग्रूप कोणत्याहि कारणाने का होईना अगदी नियमितपणे ही मालिका बघतात आणि ईथे सविस्तर मतं पण लिहितात. त्यामुळे मालिका तर चांगलीच प्रसिद्ध झालीय हे सिद्ध होतय. बराच प्रेक्षकवर्ग लाभलाय.
काल मला राधालापण गुपीत कळलय असं वाटत होतं. कसली बिनधास्त वागत होती अबीरबरोबर.बाकि एवढं प्रेमळ सासर मिळायला खरच नशीब लागतं. त्यामुळे राधाच काय कोणीहि असच वागलं असतं.
पण घना एकदा अमेरिकेला गेलेला
पण घना एकदा अमेरिकेला गेलेला दाखवणार असं मला वाटतय :).
म्हणजे सध्याच्या ट्रॅप नुसार 'प्यार का इजहार' पर्यंत पोचणार पण अमेरिकेची संधी नेमकी येणार आणि मग 'लव्ह आज कल' टाइप स्वप्नील येणार निघून मुक्ता कडे!
मला वाटलच होत त्या उका ला
मला वाटलच होत त्या उका ला मुद्दाम कोणीतरी आणलाय. बहुतेक राधाच्या वडिलांनी. पण ती आजी निघाली.
माईआज्जींनी हा प्लॅन करून
माईआज्जींनी हा प्लॅन करून रिस्क घेतली आहे बुवा. समजा राधा घनाला सोडून अबिरच्या मागे लागली तर?
एवढं शहाणपण कुठुन येतेय मालिकांमधल्या हिरविनींकडे....
मी एक पण एपिसोड पाहीलेला
मी एक पण एपिसोड पाहीलेला नाही. आता मधूनच ही मालिका पाहिली तर कळेल का ?
सुरुवातीपासूनची ष्टोरी लिहाल का माझ्यासाठी ? प्लीज..
अबीर ती 'थरथर' वाली कविता
अबीर ती 'थरथर' वाली कविता म्हणतो
तेंव्हा राधाच्या चेहर्यावर मी काही सूचक विभ्रम बघितले.(का हा मा दॄ दो)
मानव, त्याचं काय आहे ना? एक
मानव, त्याचं काय आहे ना? एक असते राधा देसाई. तिला तिच्या बाबांनी वाढवलेलं असतं. ती कुठल्याश्या अॅड एजन्सीमध्ये काम करत असते. तिथे लोकांना ऑफिसमध्ये फारसं काम नसतं म्हणून ते एकमेकांच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसत असतात. राधाचा एक मित्र असतो - मानव.....दुर्देवाने तुमचं आणि त्याचं नाव सेम आहे. तर हा मानव राधावर प्रेम तर करत असतो पण तिला सांगू शकत नाही. तिच्यासाठी तो एक चांगला मित्र असतो. तिची आणखी एक कलिग असते - सोनया. अतीव bubbly एव्हढंच तिचं वर्णन करते. पुढे तुम्ही बघालच. राधाला एक आत्याही असते. ती इंदोरला असते. मराठी बोलताना मधेच डोक्यावर एखाद्या भैय्याचं भूत बसल्याप्रमाणे हिंदी बोलणे हा तिचा आवडता छंद.
आणि एक असतो घनश्याम काळे उर्फ घना. हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का हार्डवेअर ह्याबाबत् शिवाजीराजांच्या जन्मतिथीबद्दल नसतील एव्हढे मतभेद आहेत. पण सदोदित लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. काशीनु जनम ने सुरतनु मरण अशी म्हण आहे. पण घनाच्या बाबतीत भारतनु जनम अने अमेरिकानु मरण अशी स्थिती असते. थोडक्यात येनकेनप्रकारेण अमेरिकेला जाणे हा त्याचा ध्यास अजून पूर्ण झालेला नसतो. त्याचं संयुक्त कुटुंब. आई देवकी (ह्या श्यामला एकच आई आहे!) म्हणजे चिंतातुर जंतू. घरातली मोठी सून. सर्वांना संभाळून घेणे हा स्थायीभाव. नेहमी स्वयंपाकघरात आढळत असते. वडिल (वसुदेव नव्हेत!) आहेत. दोन काका आहेत. त्यामुळे अर्थातच दोन काकू आहेत. एक सुप्रियाकाकू सुगरण. दुसरी वल्लीकाकू. काही चुलतभावंडं आहेत. एक आहे कुहू. कोकिळा बिचारी वसंत ऋतूत गाते. ही कुहू वेळीअवे़ळी कवितांचा रतीब घालत असते. तिचं प्रेम आहे प्रभातवर. दुसरा चुलतभाऊ आहे ज्ञाना. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले असतील. पण हा ज्ञाना एव्हढा बोअर आहे की त्याच्या बकबकीला वैतागून भिंतीही वेद, पुराणं सगळं म्हणतील. घनाला एक आत्या आहे. ती शिक्षिका आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. पण तिचा नवरा अजूनही ह्या कुटुंबाच्या आणि तिच्या संपर्कात आहे. आणि हो, घनाला सदोदित अंथरुणात बसलेली, स्वेटर पायमोजे घातलेली आणि ओव्हरअॅक्टींग करणारी एक आजी आहे.
राधाला वडिलांची काळजी असल्याने आणि मुलगे बघून बघून थकल्याने लग्न ह्या गोष्टीत राम वाटत नसतो. घनालाही लग्नाबिग्नाची फिकिर नसते. दोघं भारतातलं सरासरी लग्नाचं वय बघता 'घोडनवरा-नवरी' कॅटॅगरीतले. नशिबाच्या एका ट्विस्टने दोघांच्या पत्रिका त्यांच्या घरी पोचतात. आणि घरच्यांची कट़कट मिटवायला दोघं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात.
लग्नानंतर संयुक्त कुटुंबात रहाताना राधाची प्रथम गोची होते. पण नंतर तिला माणसं आवडायला लागतात - त्यांनी किती भोचकपणा केला तरी.
घना अमेरिकेला गेला की दोघांचं
घना अमेरिकेला गेला की दोघांचं लग्न मोडणार असा दोघांचा प्लॅन असतो.
मानवला राधाचं लग्न होणं खपलेलं नसतं पण 'चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो' म्हणणं शक्य नसल्याने तो तिच्या वैवाहिक जीवनात काड्या घालायचा वगैरे प्रयत्न करत असतो.
अश्यात घना जातो हैदराबादला - कुठल्याश्या कंपनीत अमेरिकेतल्या जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला. तिथे तो शॉर्टलिस्ट होतो आणि मग ती महान कंपनी त्याला हैदराबादेत ट्रेनिंग द्यायला ठेवून घेते काही दिवस. इथे घनाला अमेरिकन सिटिझनशिप मिळालीच अशा थाटात घनाच्या आईची आणि राधाच्या वडिलांची आदळआपट सुरु होते. पण घनाला तो जॉब काही मिळत नाही. मग तो सगळं खापर राधा आणि त्याच्या घरच्या मंडळींवर फोडतो. थोड्या गैरसमजूतीनंतर तो राधाची रीतसर माफी वगैरे मागतो.
मग कधीतरी राधा आणि घना दोघांनाही आपल्याला एकमेकांविषयी आकर्षण वाटत असल्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे राधा काही दिवसांसाठी माहेरी येते. देवकीमाता तमाम सासवांच्या नावावर 'धब्बा' असल्याने तिला सुनेशिवाय करमत नाही. घनाच्या आज्जीला पणतू पहायची घाई झालेली असते. त्यामुळे ती काहीतरी कट करून 'अबिर' नावाच्या सकलगुणसंपन्न माणसाला राधाच्या वडिलांनी दिलेल्या पेइंग गेस्टच्या अॅडच्या संदर्भात त्याच्या घरी पाठवते.
राधाचे बाबा आणि आत्या (हिचा हात मोडणे, फूड पॉइझनिंग होणे आदी दुखण्यांनी तिचं इंदोरला जाणं लांबतंय. कित्ती कित्ती लकी ते इंदोरवाले!) अबिरमय होतात. तर राधाला तो डोळ्यांसमोर नको होतो.
कालच्या एपिसोडमध्ये राधा आणि अबिर 'फ्रेन्डस' झालेत आणि ते पाहून घनाला असुरक्षित वाटू लागलं आहे.
मी पाच वाक्यांत सांगतो
मी पाच वाक्यांत सांगतो गोष्ट.
लग्नाची अॅलर्जी असलेल्या राधा आणि घना यांनी आपापल्या कुटुंबियांच्या समाधानासाठी (सहा महिन्यांसाठी म्हणून) मॅरेज ऑफ कन्व्हेनियन्स केले आहे. पण लग्नानंतर राधा आणि घनाच्या संयुक्त कुटुंबाचा गोतावळा एकमेकांत गुंतत जातात. एका प्रसंगानंतर राधा आणि घना यांना आपणही एकमेकांत गुंतत चालल्याचा साक्षात्कार होऊन ते प्रचंड बावचळून जातात आणि एकमेकांप्रती निर्माण झालेल्या आकर्षणाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न म्हणजे लांब लांब राहणे म्हणजे राधाने काही दिवसांसाठी माहेरी जाणे. हे सगळे प्रकरण घनाच्या आजीला आपल्या गुप्तहेरांकडून किंवा दिवदृष्टीमुळे कळते आणि ती मार्गावर आणण्यासाठी कारस्थान.....ऊप्स... योजना आखते.
आत पुढे प्रत्यक्ष पडद्यावर पहा.
स्वप्ना.................
स्वप्ना.................
याचसाठी केला होता अट्टाहास.............. असे लिहायचे होते म्हणून इतके दिवस एपिसोड्स बद्दल लिहित नव्हतीस का!!!!!!
एकुण बर्या पैकी ससुराल
एकुण बर्या पैकी ससुराल गेन्दा फुल चालु आहे.
तिथे सुहानाला जेलस करायला बडी मा सोना ला बोलवते , इथे घनाला जेलस करायला आजी हा अभिर आणते!
दीपांजली +१ तिथे इशानचे
दीपांजली +१
तिथे इशानचे सुहानावर प्रेम होते. इथेही गेल्या बर्याच भागांत (स्वारी हैद्राबादला गेल्यापासून) राधाच्या बोलण्या-वागण्यातून तिला घनाबद्दल जे काही वाटतेय, ते थांबायला नकोय, उलट घनाकडून होकार हवेत असे दिसतेय.
कालचा भाग पहायला
कालचा भाग पहायला मिळाला.
माईआज्जी सॉलिड आहेत हं.. (स्वप्नाराज त्यांच्यावर का नाराज आहेत बरे? )
अबीर प्रकरणाचा बर्यापैकी पोलखोल झालेला दिसला काल. अबीर आणि माईआज्जीचा एक्स-जावई याशिवाय आणखी दोन पात्रे 'कटात' सामिल आहेत असा क्लू दिलाय.
कोण असावीत बरे ती?
पण बर्याचदा सुहाना डोक्यावर
पण बर्याचदा सुहाना डोक्यावर पडलेली, 'कुठल्या जगात असतेस बाई?' इत्यादी वाटायची (रागिणी खन्ना ते अत्यंत बेमालूम करायची त्यामुळे खटकायचं नाही!) तसे राधा वा घना वाटत नाहीयेत.
एक गब्बुआत्या. दुसरे दिगूकाका
एक गब्बुआत्या. दुसरे दिगूकाका असावेत असे वाटतात. अशा खास मोहिमां माईआजी त्यांच्यावरच सोपवतात.
माईआज्जी सॉलिड आहेत हं..
माईआज्जी सॉलिड आहेत हं.. (स्वप्नाराज त्यांच्यावर का नाराज आहेत बरे? स्मित )<<<
त्यांचे मेन काम सिरीयल्सना झोडणे हे आहे. कशीका असेना सिरीयल. त्या कर्तव्यापासून ढळत नाहीत. स्वप्ना
कोण असावीत बरे ती? <<
कालचा भाग पाह्यला नाही पण याचे उत्तर सोप्पे आहे.
दोन्ही आत्या.
मला राधाची आत्या(तर असणारच
मला राधाची आत्या(तर असणारच १००%) व तिचे बाबा वाटतायत.
सुहाना हे अतिशय स्टुपिड,
सुहाना हे अतिशय स्टुपिड, कसलीही अँबिशन नसलेलं कॅरॅक्टर होतं, राधा इंटेलिजन्ट-स्वाभिमानी , प्रॅक्टिकल वाटते.
ती रागिणी मला अजिबात आवडत नाही पण तिला कॉमेडीचा सेन्स जबरी आहे.
त्या सगेफु मधे बरीच कॅरॅक्टर्स चांगलं अॅक्टिंग करायचे.
ती रागिणी मला अजिबात आवडत
ती रागिणी मला अजिबात आवडत नाही पण तिला कॉमेडीचा सेन्स जबरी आहे.
त्या सगेफु मधे बरीच कॅरॅक्टर्स चांगलं अॅक्टिंग करायचे.<<<
मला रागिणी आवडते. बाकी +१
स्वप्ना तुझा हातखंडा आहे यात
स्वप्ना
तुझा हातखंडा आहे यात
वेगळ्या बाफ वर टाकशील का ?
<रिक्षा मोड>माझ्या लेटेस्ट
<रिक्षा मोड>माझ्या लेटेस्ट 'काकाक' मधे मी या धाग्याचा संदर्भ घेत राधा-घनाला आणले आहे.
मुखपृष्ठावर बघा- "देत जा येऊन थोडी कल्पना."
एकुण बर्या पैकी ससुराल
एकुण बर्या पैकी ससुराल गेन्दा फुल चालु आहे.
तिथे सुहानाला जेलस करायला बडी मा सोना ला बोलवते , इथे घनाला जेलस करायला आजी हा अभिर आणते!
>>>
+१००००
मला ही सिरिअल आवडतं असुनही स्वप्नाचे अॅनलिसिस जास्त आवडतात
स्वप्ना
सुहानाची व्यक्तिरेखा
सुहानाची व्यक्तिरेखा अतिश्रीमंत पित्याची अतिलाडावलेली आईवेगळी आत्मकेंद्रित मुलगी म्हणून छान होती. पण तिचा उपयोग विनोदनिर्मितीसाठी करताना तिला आजूबाजूच्या जगाचे अजिबात भान नसलेले दाखवले. (नायिका विनोदी 'पात्र' झाल्याचे कौटुंबिक मालिकेत आणखी उदाहरण दिसत नाही.) तिच्या स्वभावातला पारदर्शकपणा आणि निरागसपणा आवडायचा. सासरी आल्यावरही ती आपल्या मूळ स्वभावाला बरीच धरून होती.
बिचार्या राधाला मात्र आपला पीळ (सुंभ जळल्यावरही जळत नाही तो) माहेरी ठेवूनच लुटुपुटीच्या सासरी यावे लागले.
अबिर हा मथुमावशीचा कोणी
अबिर हा मथुमावशीचा कोणी नातेवाईक आहे का ? काल माई आजी त्याच्याशी बोलताना - चेहरेपट्टी मथुसारखी आहे - असं म्हणाल्या असं वाटलं, तसं असेल तर काळे कुटुंबिय त्याला ओळखत कसे नाहीत ?
अमेरिकेत होता ना तो, त्यामुळे
अमेरिकेत होता ना तो, त्यामुळे अनेक वर्षांत भेट नाही झाली. काळे कुटुंब मथुआजीला तरी ओळखत असेल का याबद्दल शंकाच आहे.
'तुझ्याविना' गाण मस्त जमलय
'तुझ्याविना' गाण मस्त जमलय ,स्वप्निलचे ड्रेस्-अप बघुन 'कधि तु' आठवले पण, स्वप्निल मधे जरा जास्तच फरक पडलाय, सिरियलतल्या बाबांचे एकुन त्याने आता प्रत्यक्षात धावायला जावे झाल..
'तुझ्याविना' गाण मस्त जमलय
'तुझ्याविना' गाण मस्त जमलय >>>>>> १००% अनुमोदन.
स्वप्निलचे ड्रेस्-अप बघुन 'कधि तु' आठवले पण, स्वप्निल मधे जरा जास्तच फरक पडलाय >>>> हो काम भारी करतोय. मला तो इतका आवडेल असं नव्हतं वाटलं कधी पण अलिकसे मुक्ताच्या सरस वाटतो काही प्रसंगी.
पुढच्या भागापासून बहुतेक दिलजमाई होउन हळुहळु wrap up होणार. राजवाडे ६ महिन्याच जरा जास्तच मनावर घेतायेत अस दिसत.
मस्तं होता आजचा 'शब्दात न
मस्तं होता आजचा 'शब्दात न मांडता येणे' एपिसोड :).
स्वप्निल खरच टु गुड एक्प्रेसिंग 'नॉट बिंइंग एबल टु एक्स्प्रेस्स अनिथिंग सीन' :),!
रिक्षेवाल्याचा सीन भारी
सही, राधाला कळलय की घना
सही, राधाला कळलय की घना तिच्या प्रेमात पडलाय पण कबुल करत नाहीय आणि तीसुद्धा घनाच्या तोंडुन ते ऐकायला आतुर झालीय, पण घना काही केल्या राधाच्या प्रेमात पडल्याच मान्य करायलाच तयार नाहीय. आणि ते लपवण्यासाठी देत असलेली थातुर-मातुर कारण......त्या दोघांमधली शाब्दीक बाचाबाची सगळ बघायला एकदम झकास.......
Pages