एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घनाची आई किती ते मुलाच्या संसारात लक्ष घालते? येताजाता त्याला सल्ले देते. अरे, त्याला हवा असेल सल्ला तर विचारेल ना तो. लहान आहे का घोडा? त्याला एकदम 'मामाज बॉय' करून ठेवलाय. त्याचं म्हणून काही खाजगी आयुष्य आहे की नाही? का तुमचा मुलगा झाला म्हणून तुमची प्रॉपर्टी आहे? वैताग बाई आहे!>>>>>

स्वप्ना असं होतं कधी कधी. मुख्यत्वे एकुलते एक मुल असेल आणि तुम्ही एकत्र कुटुंबात रहात असाल तर होते. त्यात घना हा तर पहिला कुलदिपक दाखवला आहे. त्या नंतर एकदम कुहु आणि ज्ञाना. म्हणजेच नक्कीच घना लाडावलेला, सुस्त, आई बाबांवर अवलंबुन असा. आई ही एकत्र कुटुंबातली मोठी सुन, त्या मुळे सतत सासुला आणि तिच्या डॉमीनेशन ला सहन केलेली. परत धाकट्या दोघी जावांना पाठीशी घालणारी. मुलगा अजुन लहानच आहे ही भावना तिला सुखावणारी, कारण ह्या येवढ्या मोठ्या पसार्‍यात एक तरी तिच्यावर अवलंबुन आहे नीदान!!!!

आई ढीग सल्ले देतिये बाळ कुठे ऐकतय!!!!

माझ्या स्वानुभवाने लिहिते आहे. मी पण अशाच एका मोठ्ठ्या एकत्र कुटुंबात माझ्या आयुष्याची पहिली अनेक वर्ष काढली. तुम्ही आपल्या मुलांबद्दल प्रचंड पझेसीव्ह होता हा माझा अनुभव आहे. मुख्यत्वे तुमचं मुलं एकुलतं एक आणि इतरांना २ मुलं असतिल तर नक्कीच. किंवा मग एकदम बेफिकीर होता त्या मुला बद्दल. एकदम दोन टोकं.

त्यामुळे ही भयानक पझेसीव्ह आई मला पटते आहे. एकत्र कुतुंबात तुमचं असं खाजगी फार कमी रहातं. नाही म्हंटलं तरी थोडं नाक खुपसलं जातच.

माझे आई वडिल माझ्या साठी असेच पझेसीव्ह असायचे. तरुण पणी खुप राग यायचा... पण त्या मागची भावना कळल्यावर भरुन आलं. त्यांना मी एक स्वतंत्र व्यक्ति आहे, माझे निर्णय मी घेऊ शकते, हे पटवायला मला खुप वेळ लागायचा. पण एकंदरीतच माझ्यात खुप पेशंन्स असल्याने त्यांना ते पटलच.

संपदा आणि अवनी >> उ.का. आणि त्याचं काम दोन्हीही क..मा..ल..आहे..!! Proud

स्वप्ना_राज, दीपांजली आणि मंजिरी>>अगदी अगदी..!! मला ही असंच वाटतंय..रादर सीरिअलमध्ये सुद्धा हे एका प्रकारे obvious करतायत (माईआज्जीचे संवाद).. Wink

माझे आई वडिल माझ्या साठी असेच पझेसीव्ह असायचे. तरुण पणी खुप राग यायचा... पण त्या मागची भावना कळल्यावर भरुन आलं. त्यांना मी एक स्वतंत्र व्यक्ति आहे, माझे निर्णय मी घेऊ शकते, हे पटवायला मला खुप वेळ लागायचा.
हे कळते पण वळत नाही. मीही एक पझेसिव आई आहे एकुलत्या एका लेकीची आणि लेकीचे व्यक्तीस्वातंत्र्य मान्य असले तरी तिच्या आयुष्यात मी लुडबुड करतेच करते. कांट हेल्प इट Happy Happy त्यामुळे घनाच्या आईचे मला कैच्या कैच वाटत नाही. उलट आया अशाच असतात हे तिच्याकडे पाहुन अजुन पटते.

मुक्ता त्या अभिर ला ' अहो रानडे' काय म्हणते >> उलट मला ते जाम आवडतं तिचं रानडे म्हणणं. अबिर तिच्या पपा , आत्या सगळ्यांना अतीच इन्फॉर्मल होऊन नावाने हाका मारतो ते तिला खटकलेलं दाखवलयं म्हणून ती मुद्दाम त्याला अहो रानडे म्हणताना दाखवली असावी.

मस्त चाललीये मालिका. असंभव, गुंहृहे वगैरेच्या शेवटाची जी काय माती केली होती त्याबद्दल सध्याची एल्दुगो बघता राजवाडेंना माफ करून टाकलयं मी. Proud

हे भुंग्याचे शब्द :

एलदुगो धागा हा रिटायर्ड सिरियल किलर पुरुष, कामकरी महिला, एक उत्कृष्ट महिला सिरियल समिक्षक, अनेक स्माईली धारक आयडीज, एक कुहूवेडा किटक आणि अनेक हौशी डोकावू आयडीज यांच्या विरंगुळ्यासाठी उघडलेला धागा आहे.

त.टि : हे भुंग्याचे शब्द असुन माझा संबंध केवळ कॉपी पेस्ट पुरताच आहे

कालच्या भागात राधा उकाला विचारते की त्याला होमिओपथी मधले कसे समजते आणि अबीर तिला सांगतो की त्याने बी.ए.एम.एस. ला अ‍ॅडमिशन घेतली होती..
संवाद लिहणार्‍या कडुन अनावधानाने चुक झाली असावी. होमिओपथीसाठी बी.एच.एम.एस. असा कोर्स असतो. बी.ए.एम.एस. हा आयुर्वेदीक साठी.

भुंगोजीराव, द्वारा रीया
आवडलेच !
---एक हौशी डोकाऊ आय डी.
------------
बाकी सारे अनेक, कुहुवेडा कीटक एक

अवनी Wink

राधाचे बाबा आणि तिची आत्या ह्यांच्यातलं नातं मात्र फार सुरेख दाखवलंय. दोघं अगदी 'कुत्र्यामांजरासारखे' भांडत असतात एव्हढे मोठे झाले तरी.>>>> अनुमोदन

त्यांचे संवाद खूप नॅचरल वाटतात. अगदी खर्‍या भाऊ बहिणीसारखेच वाटतात दोघं. विआ मोठा भाऊ म्हणून अगदी शोभतो.

आता कुहू अबिरवर खुश होते का क्कॉय? प्रभातकी जिन्दगीमे अब दूर तलक अंधेरे ही अंधेरे है Happy बाकी आम्ही रोमॅन्टिक कॅटेगरीमध्ये मोडत नसल्याने अबिरच्या कवितेतल्या 'केसांच्या लाटांची अनामिक थरथर' ही ओ़ळ ऐकून 'डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नवे घर मिळते तिथे' ही ओळ आठवली. जाऊ देत! असतं एकेकाचं नशिब Happy

'डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नवे घर मिळते तिथे' >>>>> Rofl Rofl Rofl Rofl खूप दिवसांनी वाचली ही लायसील च्या जाहीरातीतली ओळ.

आजच्या भागाच्या सुरवातीचा दिग्याकाका अन "लिसन"काकू चा सीन एकदम झकास जमला होता.

आता कुहू अबिरवर खुश होते का क्कॉय? प्रभातकी जिन्दगीमे अब दूर तलक अंधेरे ही अंधेरे है बाकी आम्ही रोमॅन्टिक कॅटेगरीमध्ये मोडत नसल्याने अबिरच्या कवितेतल्या 'केसांच्या लाटांची अनामिक थरथर' ही ओ़ळ ऐकून 'डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नवे घर मिळते तिथे' ही ओळ आठवली. जाऊ देत! असतं एकेकाचं नशिब

>>>>
Rofl

ए बाई त्या भुंग्याला हार्ट अ‍ॅटॅक यायचा गं
तो प्रभातचा पत्ता कट करायचा प्रयन्त करतोय आणि आता तू अजुन अबिरला घुसवतेयेस मध्ये
Lol

अबीर जबरी तापवतोय सगळ्या पुरुषांना. Happy घना, दिग्या काका झाला, प्रभात उपस्थीत नव्हता म्हणुन पण तो पण तापला असता.....तसा ज्ञानाही प्रेमात पडलाय त्यामुळे जस्ट विचार करा ज्ञानाच्या त्या आवडत्या मुलीचीसुद्धा अबीर ज्ञानासमोर तारीफ करतोय आणि ज्ञाना एकदम ऊचकुन अबीरला सुनवतोय "त्याच कस आहे ना अबीर, असल्या फाल्तु शब्दरचना करुन मुलींना ईम्प्रेस करण्यात मी माझे ज्ञानामॄत वाया घालवणार नाही" वैगेरे वैगेरे :

अबीर आता घनाच्या आई बाबांना आणि मुख्य म्हणजे आजीला काय संबोधणार बघु? आजीलासुद्धा नावाने हाक मारताना दाखवली आणि राधा, घनाने किंवा काळे परीवाराने सहन केल तर मात्र जरा अबीरपुराण जरा हाताबाहेरच दाखवलय अस वाटेल ::)

पण जबरदस्त टाईम पास चाललाय. घना अणि दिग्या काकाचे एक्सप्रेशन्स मस्त होते अबीर माऊची तारीफ करताना... Happy

>>>आमच्या आईला 'तू तिथे मी' सुरु झाल्यापासून ते 'पवित्र रिश्ता' संपेतो आपल्याला मुलंबाळं आहेत ह्याचा पूर्ण विसर पडलेला अ>>><<<

आईला कशाला ते लक्षात ठेवायला हवय २४/७ की तिला मुलंबाळं आहेत म्हणून. आँ. Proud (ह. घ्या.)

आमच्या घरी(भारतात) आई दिवाबत्ती करून घेते. सगळ्यांना सांगते हाक मारु नका व ७-९ घालवते वेळ आपल्या मनासारखा.

पहिल्यांदा आम्ही(मी व बाबा) कुणकुण केली , उगाच हसायचो तिथे(त्या रूम मध्ये जावून) काय बेक्कार सिरियल्स बघते, काय अचाट आहे, तुला काहीही आवडते, उगाच जोक मारायचो.
मग विचार , आपण आपल्या मनासारखे करतोच ना.. मग कशाला त्रास द्या. कारण मी सुद्धा बघते काही काही अचाट सिरियल्स टिका करायलाच. Happy

<<तिला झी मराठी, सोनी, स्टार प्रवाह वगैरेवरच्या सिरियली वगैरे बघायच्या नसतात का? आमच्या आईला 'तू तिथे मी' सुरु झाल्यापासून ते 'पवित्र रिश्ता' संपेतो आपल्याला मुलंबाळं आहेत ह्याचा पूर्ण विसर पडलेला असतो. '>> Lol

अबीर पण घनाच्या काका काकू ला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्या द्यायला येतो आणि घनाच्या काकूला म्हणतो तुझ्या स्माईल वर मी इतका फिदा आहे न आणि काय मग दिन्या Lol
पुढच्या भागात आजी अबीर ला जवळ बोलून विचारते प्लान सक्सेसफुल? थोडक्यात हा आजी आणि अत्याचा प्लानच आहे घना आणि राधाला जवळ आणण्याचा .:)

अबीर आता घनाच्या आई बाबांना आणि मुख्य म्हणजे आजीला काय संबोधणार बघु? आजीलासुद्धा नावाने हाक मारताना दाखवली आणि राधा, घनाने किंवा काळे परीवाराने सहन केल तर मात्र जरा अबीरपुराण जरा हाताबाहेरच दाखवलय अस वाटेल :स्मित
<<<
LOL सहनशक्ति काय त्यात ?
संबोधुदेत कि नावानी .. माई किंवा घनाच्या आईचं जे नाव असेल त्या नावान Happy .
'काकु' 'आज्जी' सगळेच म्हणतात, एखादा असला नावानी हाक मारणारा तर बायका खुष च होतील !
तसही माईनेच आणल असणार त्याला :).

अगंबाई ! कधी निघाला हा बाफ ? दिसला नाही ते Uhoh
( स्वगत : तेच म्हटलं हल्ली माबोकर्स दिसत नाहीत Proud )

मी आपला एक विचार केला हं घना म्हणजे एकत्र कुटुंबातला, सर्व नाती-गोती असलेला. लहानपणापासून मोठ्या घरात वाढलेला. तो त्यांचे प्रेम आणि असणे गृहित धरणारा. आईचे आपल्याकडे लक्ष आहे ते ही जमेस धरून असणारा. पण राधाबद्दल वाटणारे प्रेम काहीतरी नवीन आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. व्यक्त करावे तर कसे ते समजत नाहिये.

राधा आईविना पोर. कुठेतरी प्रेमाला भुकेली पण तिला प्रेम मिळ्ते आहे तर ते अ‍ॅक्नॉलेज करता येत नाहिये. कारण माहीतच नाही कसे करायचे. कायम स्वतःच्या भावना लपविणारी.

अबीरच्या व्यक्तिरेखेत तो आईवडिलांशी जाम फॉरमल असल्याचे , हॉस्टेल ला राहिल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे तो ही तसा एकटा स्वतंत्र वाढलेला. कुटुंबाचे प्रेम काय चीज असते त्याला माहीत नाही. नाते संबंध माहीत नाहीत. सगळ्यांशी वन टू वन, नावानेच संबंध. ते ही अ‍ॅज इट इज काही भावनांचा पसारा त्यात नाही.
त्याला हे काळे कुटुंब राधाचे बाबा अन आत्या यांचे निखळ भाऊ बहीण नाते नवीन. अशी तिघे समोरासमोर आलेली आहेत.

कुहू ची प्रभात कविता आणि अबिरची कविता पण छान होती.

>>>>LOL सहनशक्ति काय त्यात ?
संबोधुदेत कि नावानी .. माई किंवा घनाच्या आईचं जे नाव असेल त्या नावान .
'काकु' 'आज्जी' सगळेच म्हणतात, एखादा असला नावानी हाक मारणारा तर बायका खुष च होतील !>>>>

अस पहील्याच भेटीत तेसुद्धा बायकांना (त्यांची स्माईलवर फिदा, चेहरयावर ग्लो वगैरे वगैरे लंपटगीरी करुन) एकेरी नावाने हाक मारुन बायका खुश च होतील या मागच विचित्र Logic काही कळल नाही....असो....
ईथे अमेरीकेत तर काही स्त्रिया ईमेलमध्येसुद्धा त्यांच टोपण नाव न लीहेता त्यांच्या जन्माच्या नावाचा उल्लेख केला (e.g. Kim ला Kimberley) तर सरळ रेप्लाय करतात की Kimberley फक्त माझी आई किंवा बाबा बोलवत्तात ते वापरु नका म्हणुन -तसच पुरुषांमध्ये Bob ला त्याच्या खर्र्या नावाने Robert ने हाक मारली की) - (NY Boston चे कीस्से)

तसही त्या अबीरच सगळ्यांशी (मुलींशी, बायकांशी जरा जास्तच) लवकर मैत्री दाखवण जरा अतीच दाखवलय, अस सरधोपट कोणाशीही ओळखी होऊ शकतात मैत्री जरा जास्तच आहे पण मालीकेत बघण ओ.के.
आणी तसही घनासमोर किंवा त्याच्या बाबांसमोर त्याच्या आईला अबीरने देवकी, देऊ अस संबोधन किंवा माई आजीला तीच्या नावाने संबोधन खरच मराठी मालीकेत अती वाटेल....त्यातही तो अबीर भारतातच वाढलेला (आत्तापर्यंततरी) दाखवलाय. काही जणांना नावाने संबोधन ठीक वाटत पण ओपन माईंडेडच्या नावाखाली वयस्कर व्यक्तींना नावाने संबोधन अतीशहाणपणाच वाटत. पण असो तसही हे सगळ माईचच कारस्थान वाटतय त्यामुळे राधा-घनातील गंम्म्त आणि अबीरवर ऊचकलेले घना, दिग्याकाका बघायला जाम मजा येतेय.

इतकी रोख-ठोक, स्वतंत्र विचारांची ,कमावती मुलगी एका मठठ , थंड , अजागळ व आळशी मुलाशी लग्न करते तर करते व आता त्या अडकायला बघते... ए. भा. प्र. Proud

कालच्या भागाच्या शेवटी माईचा अबीरसोबत प्लान कहीतरी आहे असे सुचवले. तो जर स्पेशल पर्पज क्यारेक्टर म्हणून माईंनी आणला असेल तर अबीरबद्दलचे आपले इथले चर्वितचर्वण निरुपयोगी ठरेल.

गिरीराज ... अनुमोदक +१

मी माझ्या आधीच्या प्रतिसादात हाच अंदाज वर्तवला होता.

>> अबिरच्या कवितेतल्या 'केसांच्या लाटांची अनामिक थरथर' ही ओ़ळ ऐकून 'डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नवे घर मिळते तिथे' ही ओळ आठवली.

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

अबीर आता घनाच्या आई बाबांना आणि मुख्य म्हणजे आजीला काय संबोधणार बघु?

अबीर आजीला आणि आजी अबीरला आधीच ओळखताहेत... प्लॅन फत्ते झाला का याची चौकशी चाललीय आज्जीबाईंची.

अस पहील्याच भेटीत तेसुद्धा बायकांना (त्यांची स्माईलवर फिदा, चेहरयावर ग्लो वगैरे वगैरे लंपटगीरी करुन) एकेरी नावाने हाक मारुन बायका खुश च होतील या मागच विचित्र Logic काही कळल नाही....असो....

असं नाहीय.. राधा-अबीरची दोस्ती होते तेव्हा अबीरने त्याच्या पुर्णपणे इनफॉर्मल वागण्यामागचे स्पष्टीकरण दिलेले होते.

इतकी रोख-ठोक, स्वतंत्र विचारांची ,कमावती मुलगी एका मठठ , थंड , अजागळ व आळशी मुलाशी लग्न करते तर करते व आता त्या अडकायला बघते

प्रेमात पडलीय ना आता. मुळात जर प्रेम असेल तर सगळे दोष खपुन जातात..

>>आईला कशाला ते लक्षात ठेवायला हवय २४/७ की तिला मुलंबाळं आहेत म्हणून. आँ.

तुम्ही पूर्ण पॉइन्टच मिस केलात हो. माझं म्हणणं हे होतं की घनाने आईला ह्या सिरियली बघायची आवड निर्माण करून द्यावी म्हणजे ती त्याचा पिच्छा सोडेल.

>>राधा आईविना पोर. कुठेतरी प्रेमाला भुकेली पण तिला प्रेम मिळ्ते आहे तर ते अ‍ॅक्नॉलेज करता येत नाहिये.

अश्विनीमामी, राधा अनाथ नाहिये. तिच्यावर प्रेम करणारे वडिल आणि आत्या आहेत. माझ्या मते लहानपणापासून स्वतंत्र विचाराने वागायची सवय झाल्याने आपल्याला कोणीतरी हवंहवंसं वाटतंय, त्याला आपण मिस करतोय, त्याच्यावर कुठेतरी अवलंबून रहातोय हे बरोबर आहे की चूक आणि ह्यात लक्ष्मणरेषा कुठे आखायची हे नीट न कळल्यामुळे तिची गोची झालेली आहे. तसंच आत्तापर्यंत आपले निर्णय आपण घ्याय्ची सवय असल्याने ह्यापुढे ते घेताना दुसर्‍याची सोयसुध्दा लक्षात घ्यावी लागणार आहे हे लग्नानंतरचं बदललेलं वास्तव पचत नाहिये. आईवडिलांनी जिथे 'आम्ही सल्ला देऊ, पण निर्णय तुमचे तुम्ही घ्या' अशी मुलं वाढवलेली असतात तिथे हे होऊ शकतं.

Pages