Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिजे, इथे तुला असंभवचे सगळे
डिजे, इथे तुला असंभवचे सगळे एपिसोडस दिसतील. स्टोरी फार वेगळी आहे, त्याची चर्चा इथे नको करायला. पण कधी वेळ झालाच तर बघ
http://video.india.com/program/mypopkorn/224/1/all/asambhav.html
आजच्या एलदुगोच्या दुसर्या हाफमध्ये उ का चे खट्याळ एक्स्प्रेशन्स बघ, मजा येईल
थँक्स संपदा, बघीन असंभव
थँक्स संपदा, बघीन असंभव :).
मराठीत गुड लुकिंग- वेल ग्रुम्ड, वेल टोन्ड अॅक्टर्स फार कमीच आहेत , उ .का लुक्स रेअर वन :).
स्वप्नील ची चिडचिड आवडली आजच्या एपिसोड मधे :).
Btw, ए.ल.दु.गो मधे राधाच फक्त सासरच्या मंडळीत फार गुंतलीये, स्वप्नील मात्रं किती वेळा बोलावून सासरी गेला नाही !
बरं झालं ठोंब्याला परवा चॉकलेट मुस वर भागवून परतवला
तुझ्या पूर्ण पोस्टला प्रचंड
तुझ्या पूर्ण पोस्टला प्रचंड अनुमोदन
अगं असंही राधाच्या माहेरी फक्त तिचे बाबा आणि अधूनमधून येणारी आत्या, घनाला स्वतःच्या गोतावळ्यातून वेळ नसेल मिळत , देसायांकडे यायला
अबीर राधाकडे काय दिलखेचक बघतो
अबीर राधाकडे काय दिलखेचक बघतो ना ! मी तर मेलेच...
मला असंभव मालिका बघायची आहे
मला असंभव मालिका बघायची आहे पण संपदा, तू दिलेल्या साईट वर ४-५ मिनीटांचेच एपिसोड्स दिसत आहेत. पूर्ण एपिसोड्स कुठे बघायला मिळतील ?
बाकी एलदुगो ची मी पण पंखा
अबीर राधाकडे काय दिलखेचक बघतो
अबीर राधाकडे काय दिलखेचक बघतो ना ! मी तर मेलेच... >>> हो ना.. आणि वर माझा नवरा म्हणतो कसा राधाला उका च चांगला दिसतो स्वजो पेक्षा .. काय हे.. मी चिडले त्याच्यावर. म्हणजे मला पण असं वाटत की तो राधा ला परफेक्ट आहे पण प्रेम केल्यावर समोर कितीही परफेक्ट व्यक्ती आणुन ठेवली तरी आपलीच व्यक्ती अधिक भावते.. (स्वानुभव बरं का ) आणि स्वजो राग पण आवडला जो आज बघायला मिळेल..
राधाचा कालचा ड्रेस मस्त.
राधाचा कालचा ड्रेस मस्त. उकाला अजून छान मिळेल की कोणीतरी. पण तो टीशर्ट वर स्वेटर का घालतो? मुंबईत?
आणि पर्याय म्हणून फक्त घनाचं
आणि पर्याय म्हणून फक्त घनाचं घर आहे काय? तिथे जाण्यासाठी एव्हढा गळेपडूपणा? स्वतःच्या पायावर उभी आहे ती. एक भाड्याचं घर घेऊन नक्कीच राहू शकते >> स्वतःच्या पायावर उभे रहायचा प्रश्न नाहीये इथे. ती काँट्रॅक्ट मॅरेज करते कारण तिला पपांची काळजी वाटत असते. तिला काळे कुटुंब आवडायला लागले असते पण तरी पपांच्या काळजीपोटी ती आपल्या निर्णयावर ठाम रहायचा प्रयत्न करतेय. आणि तेच पपा तिला 'तुझा कंटाळा येतोय' असे सुचीत करतात (कटाचा भाग म्हणून असेल पण ते तसे करतात). मग ज्यांच्याकरता मी परत आलेय त्यांनाच मी नकोशी होतेय ही भावना तिच्या मनात येणारच ना?
नेमक्या त्याच वेळेला अबीर तिच्या वर्मावर बोट ठेवतो 'तुझे लग्न झालेले वाटत नाही' (हे मात्र मलाही नाही पटले. दोन माणसे १-२ महिन्यात सेटल्ड दिसत नाहीत ) त्यामुळे तिला असुरक्षीत वाटणे स्वाभाविकच आहे की.
आधी फार्सिकल वाटणारी ही मालिका आता मस्त मुरत चाललीये. बटबटीतपणा बराच कमी झालाय. पण इतक्या मस्त जमून आलेल्या मालिकेत विवेक लागू मात्र खड्यासारखा दाताखाली येतोय. स्वजो मला आवडत नाही पण घनाचे पात्र त्याची अभिनय क्षमता लक्षात घेऊन बेतलय त्यामुळे ते पात्र मस्त रंगलय. पण बाबांचे पात्र मात्र तसे नाही. त्याला मोहन जोशीच हवे होते.
ते एवढ्या तिशीच्या पुढच्या
ते एवढ्या तिशीच्या पुढच्या मुलाच्या रिलेशन शिप मध्ये आईने इतके लक्ष घालणे पण पटत नाही. अश्याने तो कायमच बाळ राहणार ना.? त्याला स्वतःची काही प्रायव्हसी नको का?
हायला, मुलगी माहेरी आली तर
हायला, मुलगी माहेरी आली तर इतकं काय 'ते' वाटायला पाहिजे... कैच्याकै
मुलगी बॅगा बिगा भरुन आली आणि 'आमच्यात मतभेद आहेत' म्हणुन सांगयला लागली तर काळजी वाटणारच. याच्या आधीही राधा बरेचदा आलेली पण तेव्हा माहेरी आनंदच झालेला तिच्या येण्याने. आताचे येणे वेगळे आहे हे तिलाही माहित आहे आणि घरच्यानाही कळलेय.
कालचा एपिसोड मस्तच.. राधाने खरेच घनाला खेचायला पाहिजे. तो आल्यावर ती एवढा त्याचा हात धरायला जातेय तर हा सरळ हात काढुन घेतोय हातातुन. मग अबीर-राधाला एकत्र पाहिल्यावर एवढा तिरसटपणा कशाला करायला हवा??
अबीर राधा कपल म्हणुन जास्त छान दिसले काल.. राधा शुड थिंक अगेन जो अजुन जबाबदारी घ्यायला तयार नाहीय, त्याच्या गळ्यात पडुन पुढे दु:खच पदरी येईल. टचवुड राधेच्या बाबतीत असे नको व्हायला....
ते एवढ्या तिशीच्या पुढच्या
ते एवढ्या तिशीच्या पुढच्या मुलाच्या रिलेशन शिप मध्ये आईने इतके लक्ष घालणे पण पटत नाही
आपल्याकडे घालतात... एकत्र कुटूंब असेच असते.
अमा, घनाच्या बाबांचा कालचा
अमा, घनाच्या बाबांचा कालचा संवाद ऐकलात का? तसे कुटंबातले वातावरण असेल तर पटते ते वागणे पण. ते बरोबर का चूक हा भाग अलहिदा.
<तो आल्यावर ती एवढा त्याचा
<तो आल्यावर ती एवढा त्याचा हात धरायला जातेय तर हा सरळ हात काढुन घेतोय हातातुन. मग अबीर-राधाला एकत्र पाहिल्यावर एवढा तिरसटपणा कशाला करायला हवा?>
अबीर राधाला हात धरताना पाहिले म्हणून रागाने हात घेचून घेतला त्याने.
माधव+१
स्वजोच्या अभिनयाबाबत सोडून. मी त्याला यापूर्वी हिंदीतल्या कॉमेडी शोत आणि देस में निकला होगा चांद अशा काहीतरी नावाच्या मालिकेत पाहिलाय. त्यामुळे जर इथे तो एफिशियन्ट वाटतोय तेवढे मला पुरेसे आहे.
त्या आत्या ला तेवढे आवरा...
त्या आत्या ला तेवढे आवरा... असह्य होतेय.... "मै अभी थोडी थोडी बरी हू" LOL
माधव वरचे लिहिताना मलाही तेच
माधव वरचे लिहिताना मलाही तेच आठवत होते.
गेल्या वेळीही त्याची घाई
गेल्या वेळीही त्याची घाई चाललेली राधाचा हात सोडवुन घ्यायची. त्याला उगीच भिती वाटते जास्त वेळ हात हातात राहिला तर मग तो सोडवणारच नाही याची
मुक्ता बरोबर स्वप्नीलच
मुक्ता बरोबर स्वप्नीलच ठिके.
मुक्ता त्या अभिर ला ' अहो रानडे' काय म्हणते .. ते 'फॉर्मल नाही शाळेतल्या बाईं सारखं वाटतं
घना विचार करताना दाखवलाय
घना
विचार करताना दाखवलाय दोन दिवस. मनाची घालमेल चालू आहे? काय करावं? राधावर प्रेम आहे, संसार हवाहवासा वाटतोय आणि ते अमेरिकन स्वप्नंही बोलावतंय. काय करावं नक्की? काय मस्त अभिनय करतोय स्वप्निल! त्याचा गंभीर चेहरा पाहिला की कसंसंच होतं!
नेमक्या त्याच वेळेला अबीर
नेमक्या त्याच वेळेला अबीर तिच्या वर्मावर बोट ठेवतो 'तुझे लग्न झालेले वाटत नाही' >>>
ती तर गळ्यात मंगळसुत्र घालते. तरी त्याला असे का वाटले???
विचार करताना दाखवलाय दोन
विचार करताना दाखवलाय दोन दिवस. मनाची घालमेल चालू आहे? काय करावं? राधावर प्रेम आहे, संसार हवाहवासा वाटतोय आणि ते अमेरिकन स्वप्नंही बोलावतंय. काय करावं नक्की? काय मस्त अभिनय करतोय स्वप्निल! त्याचा गंभीर चेहरा पाहिला की कसंसंच होतं!
<< + १ पूनम :).
फार सहज आणि परफेक्ट एक्स्प्रेशन्स आहेत स्वप्नील ची !
आता घना, राधाला अबीरकडे
आता घना, राधाला अबीरकडे ढकलण्याचा प्रयत्न करणार, आणि घना ढकलणार म्हणजे धक्का जोरदारच!
आगाऊ, मला असं वाटत की घना
आगाऊ, मला असं वाटत की घना राधाला ढ्कलण्यापेक्षा उका च त्यांच्यातले प्रेम अजुन वाढायला मदत करेल.. थोडिशी जेलसी निर्माण करुन.. काय वाट्त???
उ . का त्यासाठीच आलाय, त्याचं
उ . का त्यासाठीच आलाय, त्याचं काम पार पाडेल.
मुक्ता-उ.का चं एकत्रं जॉगिंग, एकत्रं स्वयंपाक वगैरे सुरु होईल लवकरच, मग जेलसीने घनाचा बांध फुटणार लवकरच :).
Btw, आसावरी जोशी- विनय आपटे ट्रॅक जोडी कधी जमणार ?
विवेक लागू मात्र खड्यासारखा
विवेक लागू मात्र खड्यासारखा दाताखाली येतोय. >>>अनुमोदन, परवा त्या घनाला उठवायला त्याच्या खोलीत ते आले तेव्हाच्या सीनमधे, सत्यनारायणाच्या पुजेला आमच्याकडे येणारे गुरूजी आठवले मला, रग्गड पाठ झालेले मंत्रोपचार अगदी निर्विकारपणे पुटपूटून निघून जाणारे, चेहर्यावर कसलाही भाव नाही.
काल घनाच्या आईच्या तोंडचं एक
काल घनाच्या आईच्या तोंडचं एक वाक्य ऐकून कान प्रचंड तृप्त झाले. 'मुलाने हो म्हटलं की झालं मुलगी लगेच परत येते' असं काहीसं होतं. म्हणजे मुलाने काही करावं - मुलीला तू त्रास आहेस, तुझ्यामुळे मी लग्नाच्या भानगडीत अडकलो असं म्हणावं, स्वतःला अमेरिकेला जाता आलं नाही त्याचं खापर तिच्यावर फोडावं आणि मग खुशाल 'ये तू घरी' असं म्हट्लं की तिने आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असं समजून त्याच्याकडे परत जावं का? वा! प्रेम करावं, सर्वस्व ओतून करावं हे कबूल पण त्यासाठी स्वाभिमानाची आहुती कधीच देऊ नये. आपल्याला स्वतःची किंमत कळली नाही तर दुसरे आपली पत्रास काय ठेवणार? घनाच्या आईचं वाक्य खड्यासारखं बोचलं.
घनाची आई किती ते मुलाच्या संसारात लक्ष घालते? येताजाता त्याला सल्ले देते. अरे, त्याला हवा असेल सल्ला तर विचारेल ना तो. लहान आहे का घोडा? त्याला एकदम 'मामाज बॉय' करून ठेवलाय. त्याचं म्हणून काही खाजगी आयुष्य आहे की नाही? का तुमचा मुलगा झाला म्हणून तुमची प्रॉपर्टी आहे? वैताग बाई आहे!
तिला झी मराठी, सोनी, स्टार प्रवाह वगैरेवरच्या सिरियली वगैरे बघायच्या नसतात का? आमच्या आईला 'तू तिथे मी' सुरु झाल्यापासून ते 'पवित्र रिश्ता' संपेतो आपल्याला मुलंबाळं आहेत ह्याचा पूर्ण विसर पडलेला असतो. 'फिर सुबह होगी; चं टायटल सॉन्ग सुरु झालं की ती माणसात परत येते. घनाने ह्या सिरियली स्वतः पहायला सुरुवात करावी. मग आईला सवय लागेल आणि ती त्याचा पिच्छा सोडेल.
राधाचे बाबा आणि तिची आत्या ह्यांच्यातलं नातं मात्र फार सुरेख दाखवलंय. दोघं अगदी 'कुत्र्यामांजरासारखे' भांडत असतात एव्हढे मोठे झाले तरी.
अबिरचं कॅरेक्टर 'बावर्ची' मधल्या राजेश खन्नासारखं असावं असं मला वाटायला लागलंय. तोही असाच सर्वगुणसंपन्न असतो ना?
इथला अबिर आणि 'क्या हुवा तेरा
इथला अबिर आणि 'क्या हुवा तेरा वादा' मधला हितेन तेजवानी एकाच हेतुने आलेत शो मधे !
नवरा बायकोच्या मधे जेलसी ब्रिज बनून प्रेमाचा साक्षात्कार !
मला तर अबीरचे पात्र 'बावरची'
मला तर अबीरचे पात्र 'बावरची' मधल्या राजेश खन्ना सारखे वाटायला लागले आहे.... सर्व कला निपुण, पण तरी संशयास्पद, आणि शेवटी स्वारी गुल होणार राधा-घना ला एकत्र आणून... आणि लोकांना डबडबलेल्या डोळ्यांनी साक्षात्कार होणार... आणि इला भाटे तर कहरच करेल अश्रूंचा आणि भावनातिरेकाचा
स्वप्ना, शेवटची पोस्ट आवडली
स्वप्ना, शेवटची पोस्ट आवडली
अरेच्चा, स्वप्नाने आधीच
अरेच्चा, स्वप्नाने आधीच लिहिलंय की, तरीपण मला इन्डिपेन्डन्टली वाटलं होतं
घनाने ह्या सिरियली स्वतः
घनाने ह्या सिरियली स्वतः पहायला सुरुवात करावी. मग आईला सवय लागेल आणि ती त्याचा पिच्छा सोडेल.>>
आमच्या मातोश्रींना ही सवय लागली तेंव्हा मला काही काळ बरं वाटलेले (खोकाबो?) पण आता मात्र डोक्यावरुन पाणी गेलेय, तिच्या सिरेलच्या वेळा पाहून फोन करावा लागतो!!!
Pages