Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार तू काहून पाहू र्हायलास
मंदार तू काहून पाहू र्हायलास ही सिरेल? सरळ झोपून घेत जा ना बापडा अर्धा तास. राखीला अनुमोदन. तू अगदी मनापासून बघतोस ही सिरीयल अन तेही कुचाळक्या करण्यासाठी. त्यापेक्षा वाचन, मनन, चिंतन असे अनेक उपाय सुचवू शकते मी तुला
टोके, सिरिअलवर टिका करु नये
टोके, सिरिअलवर टिका करु नये असा नियम वाचला नव्हता
(No subject)
>>काल घनाची आई त्याच्या
>>काल घनाची आई त्याच्या बाबांना म्हणते की, '' सून काय म्हणता हो? मुलगी आहे ती माझी!'' स्मित कित्ती गोड सासू! (काश मेरी भी ऐसी एक तरी सास होती! :उसासा टाकणारी बाहुली: )
अहो, त्या घनाच्या आईला स्वतःची मुलगी नाहिये म्हणून असं म्हणतेय ती. नाहीतर 'नावडतीचं मीठ अळणी.....' तश्यातला प्रकार झाला असता. रच्याकने, ती 'घना राधाला मनवून घेऊन येईल' असं म्हणाली. 'राधाची समजूत काढून' किंवा 'तिचं मन वळवून' असा शब्दप्रयोग बरोबर झाला अस्ता.
मला कालचा एपिसोड फारसा आवडला नाही. राधाची एकूण वागणूक गळेपडू वाटली. असुरक्षिततेच्या भावनेतून आलेली. म्हणजे आपलं लग्न झालंय तरी आपण माहेरी आहोत ह्याचं स्पष्टीकरण न देता आल्यामुळे किंवा द्यायची इच्छा नसल्यामुळे सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठी केलेला अट्टाहास वाटला.
तसंच घना परत जायच्या वेळी आकर्षण अजून वाटतं आहे का ते पहाण्यासाठी हातात हात घेऊन पाहणं वगैरे naive वाटलं. असो. आता ह्या पोस्टसाठी जोडे खायची तयारी ठेवली पाहिजे.
मुक्ता-राधाचं
मुक्ता-राधाचं प्रणयाराधन>>>>>> (माझ्या मुलींची नावे आहेत ही, मुक्ता आणि राधा :हाहा:)
मला कालचा एपिसोड फारसा आवडला
मला कालचा एपिसोड फारसा आवडला नाही. राधाची एकूण वागणूक गळेपडू वाटली. असुरक्षिततेच्या भावनेतून आलेली. म्हणजे आपलं लग्न झालंय तरी आपण माहेरी आहोत ह्याचं स्पष्टीकरण न देता आल्यामुळे किंवा द्यायची इच्छा नसल्यामुळे सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठी केलेला अट्टाहास वाटला
<< अनुमोदन स्वप्ना :).
मुक्ता च्या कॅरॅक्टर कडून गळेपडु पणा अनपेक्षित आणि अनप्ल्झेन्ट होता पहायला :).
बाकी स्वप्नील मुक्ताची केमिस्ट्री जाम सही आहे म्हणूनच सिरियल बघावीशी वाटते , २३ मे च्या एपिसोड मधे दोघांची एक्स्प्रेशन्स ज ब री, फुल्ल मार्क्स :).
Btw, सध्या तो जो कोणी वेडा यांत्रिक मानव कुक कम पेइंग गेस्ट आलाय त्याच्या समोर हे सगळे काहीही फॅमिली मॅटर्स का डिस्कस करतायेत ?
स्वप्ना
स्वप्ना
>>>>घना राधाला 'तुझ्या
>>>>घना राधाला 'तुझ्या पापण्या चंद्रकोरासारख्या दिसतात' म्हणतो... चंद्रकोरीसारख्या हवंय ना? छे छे
"लिंगाशी"
फार खेळतात हे लोक! संवादातलं व्याकरण फारच गंडलंय!
मेलो मेलो... वारल्या गेलो आहे =))
@राखी कदाचित कुरघोड्या,
@राखी कदाचित कुरघोड्या, द्वेष, राग हे बघुन बघुन प्रेम, माया, आपुलकी अशाही भावना असतात हे आपण विसरुन गेलोय का? >>>> बुल्स आय !! ( शूटींग चॅम्प वगैरे असणार्या मालिकेवर च्या चर्चेत असच काही तरी लिहायला हव ना )
रच्याक : हे चॉकलेट मूस काय भानगड असते?
सध्या तो जो कोणी वेडा
सध्या तो जो कोणी वेडा यांत्रिक मानव कुक कम पेइंग गेस्ट आलाय त्याच्या समोर हे सगळे काहीही फॅमिली मॅटर्स का डिस्कस करतायेत ?
पटलच अगदी. मुळात भाडोत्री पाव्हण्याला कोणीच घरात इतका शिरकाव देणं शक्य नाही. त्यातुन घरगुती चर्चा त्याच्यासमोर त्याला उत्तर द्यायला बांधील असल्याप्रमाणे करत राहणं अ श क्य आहे. १५-२० टक्के गम्मत आणि बाकी सगळा इतर डेलीसोप छाप बाजार आहे. फक्त हा त्यातल्या त्यात ऑरगनाईझ्ड बाजार आहे. असो.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Mousse
सध्या तो जो कोणी वेडा
सध्या तो जो कोणी वेडा यांत्रिक मानव कुक कम पेइंग गेस्ट आलाय त्याच्या समोर हे सगळे काहीही फॅमिली मॅटर्स का डिस्कस करतायेत ?>>>>
तिच तर तिसरी गोष्ट आहे!!!! मला वाटतय की माई आजी आणि आत्याचं जे पुण्याचं सीक्रेट आहे ते म्हणजे हा अबीर.... माई आजी हिन्ट पण देते...... आणि दिग्या काका पण गप्प आहे तिकडुन आल्या पासुन.....
हा नक्कीच आजी आणि आत्याचा प्लॅन असणार... एक असा मासा तळ्यात घालायचा की त्या मुळे दोघांनाही असुरक्षित वाटायला लागेल. आणि मग राधाला आणि घनाला एकमेकांच्या वाचुन आपण जगु शकत नाही ह्याची जाणीव होइल......
( किती तो द्रावीडी प्राणायाम!!!!!)
मोकीमी अनुमोदन.. अशोकराव ही
मोकीमी अनुमोदन.. अशोकराव ही सामिल आहेत यात, म्हणुन तर ते राधाला लागेलसे सुचक बोलत राहतात.
कालचा एपिसोड आवडला. घनाच्या शर्टावर मुस पडल्यावर तो शर्ट चाटायला उचलतो नी राधा त्याच्ज्यवर डाफरते हे पाहुन लेक वैतागली, तिच्या मते तिनेही सेम घनासारखेच केले असते. इतके छान मुस चक्क टिशुने पुसायचे म्हणजे काय??????????????
सध्या तो जो कोणी वेडा
सध्या तो जो कोणी वेडा यांत्रिक मानव कुक कम पेइंग गेस्ट आलाय त्याच्या समोर हे सगळे काहीही फॅमिली मॅटर्स का डिस्कस करतायेत ?>>>>>>>
अगदी अगदी! निदान राधाच्या तरी हे लक्षात यायलाहवं होतं! आणि त्या उकाला तरी कळायला हवे ना! यांचं डिस्कशन चाललंय तरी तिथेच चिकटून हा!आणि यांनाही काहीच वाटत नाही त्या उकासमोर सगळं चर्वितचर्वण करायला!
मला कालचा एपिसोड फारसा आवडला
मला कालचा एपिसोड फारसा आवडला नाही. राधाची एकूण वागणूक गळेपडू वाटली. असुरक्षिततेच्या भावनेतून आलेली. >> अगदी अगदी. पण तेच तर दाखवायचं आहे ना? पपा आणि राधामधला तो बोरींग वाला संवाद सांगतो की पपांनी राधाचा या घरावरचा हक्क पुसून टाकलाय. तिला वाटणारच ना असुरक्षीत? तिची परीस्थिती तर ना घर की ना घाट की अशी झालीये त्यामुळे.
ह्या सीरियलमधल्या तुझ्या विना
ह्या सीरियलमधल्या तुझ्या विना ह्या नवीन सिचुएशनल गाण्याचं उद्घाटन/ प्रकाशन कुहूच्या हस्ते व्हायचं होतं म्हणे
भुंग्या, कुठायेस?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
संपदा, त्याच सोहळ्याचे फुकट पास कुठे मिळतात का ते शोधत "उडतोय" सध्या
अरे एखाद्या भागात बाईक अॅक्सिडेंटमध्ये "प्रभात" गेल्याचं दाखवा रे
कसला जीव मधात पडेल माझा
त्या चवळीच्या शेंगेबरोबर तो लाल भोपळा शोभतो का
मग प्रभात ''गेल्यावर'' तुझा
मग प्रभात ''गेल्यावर'' तुझा चान्स है का क्कॉऑऑऑऑऑऑऑऑय??
आता नहुतेक के छाप सिरीयल पहावी लागणार. दरीत कोसळलेल्या अन तरीही वाचलेल्या प्रभातची प्लास्टीक सर्जरी होते अन भुंगा येतो नवा अन आजारपणात बारीक झालेला ''प्रभात'' बनून
तो लाल भोपळा शोभतो
तो लाल भोपळा शोभतो का>>>>>>>>> का? का? घना चालतो तुम्हाला...... आणि बिचारा प्रभात का नाही?? छान आहे तो पण
का? का? घना चालतो
का? का? घना चालतो तुम्हाला...... आणि बिचारा प्रभात का नाही?? छान आहे तो पण
>>>>>>>>>>>>>>>>
तुम्हाला नाही ग...... मलाच तो प्रभात नकोसा वाटतोय
हम्म्म्म्म्म
हम्म्म्म्म्म
दरीत कोसळलेल्या अन तरीही
दरीत कोसळलेल्या अन तरीही वाचलेल्या प्रभातची प्लास्टीक सर्जरी होते अन भुंगा येतो नवा अन आजारपणात बारीक झालेला ''प्रभात'' बनून
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
माझ्या अडीचपट आहे ग तो हे म्हणजे लाल भोपळ्याजागी दूधी भोपळा आणल्यासारखं होईल......... हो पण निदान दुधीचा हलवा तरी करता येईल
लाल भोपळ्याजागी दूधी
लाल भोपळ्याजागी दूधी भोपळा<<<<<<<<<< भोपळा आहे ना मग झालं तर, लाल काय न दुधी काय! (कै च्या कै पांशा वाक्य वाटतंय हे :अओ:)
चला म्हणजे मंजिरीताईंकडे लाल
चला म्हणजे मंजिरीताईंकडे लाल भोपळ्याचा पण हलवा करतात तर
भोपळा आहे ना..... मग लाल काय नी दुधी काय घाला खवा आणि करा हलवा......
आता बघा .... येत्या दहा
आता बघा .... येत्या दहा एपिसोडमध्ये एकदा तरी काळे नाहीतर देसाईंच्या घरात दुधी हलवा केलेला दाखवतील
. येत्या दहा एपिसोडमध्ये एकदा
. येत्या दहा एपिसोडमध्ये एकदा तरी काळे नाहीतर देसाईंच्या घरात दुधी हलवा केलेला दाखवतील >>>>>>
येत्या दहा एपिसोडमध्ये एकदा
येत्या दहा एपिसोडमध्ये एकदा तरी काळे नाहीतर देसाईंच्या घरात दुधी हलवा केलेला दाखवतील >>> आणी या हिशेबाने प्रभातचे पण काही खरे नाही आता.
भुंग्या, तो चिमा तुझ्याकडेच
भुंग्या, तो चिमा तुझ्याकडेच येतो काय रे संध्याकाळचा डायलॉग लिहायला???
गिरी, मला ऑफर आली की तुला आधी
गिरी, मला ऑफर आली की तुला आधी कळवेन रे
चिमाने डायलॉग नाही लिहीलेत
चिमाने डायलॉग नाही लिहीलेत मनस्विनी लिहीते!
कोण मनस्विनी? संवाद - चिन्मय
कोण मनस्विनी? संवाद - चिन्मय मांडलेकर असं दाखवतात ना?
Pages