Submitted by आनंदयात्री on 10 June, 2012 - 01:58
आज, १० जून २०१२ च्या सहाव्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परत एकदा चांगला भाग. वादातीत
परत एकदा चांगला भाग. वादातीत भाग. !
अपंग व्यक्तींच्या
अपंग व्यक्तींच्या आयुष्याबद्दल, चांगला भाग आहे . मला वाटते १ भाग चांगलं आणि एक भाग वादग्रस्त असे रोटेशन ठेवले आहे आमीर ने .........
काल रात्री स्टार पल्स आणि
काल रात्री स्टार पल्स आणि युनिटच्या अन्य चॅनेल्सवरून आमीर खान स्वतःच सांगत होता : "दोस्तो, हीरो बनने के लिये क्या क्या जरुरी होता है ? पर्सनॅलिटी ? खूबसूरती ? टॅलेन्ट ? नही, इसके सिवा भी एक और चीज की जरूरी है, और वो क्या है ये देखीये इस रविवार ११ बजे के सत्यमेव जयते एपिसोड मे" ~ यावरून मी अंदाज बांधला होता की बहुधा आजचा एपिसोड बॉलीवूड ड्रीम संदर्भातच असेल.
पण तसे झाले नसले तरी आमीर खानने वेगळ्या अर्थाने 'यशस्वी हीरो' च दाखविले आणि त्यांच्या यशस्वीततेची कहाणी.
प्रथमच कोणत्याही डोळे पुसणे वगैरे सेन्टीमेन्टल प्रकारापासून दूर राहून 'जन्मजात जिद्द' अंगी असली की एक विकलांग व्यक्तीही सक्षम कशी बनू शकते हे सोदाहरण त्याने दाखविले.
सुंदर आणि प्रोत्साहनात्मक होता आजचा एपिसोड....विकलांग अपत्य असलेल्या प्रत्येक आईवडिलांना धीर देऊ शकणारे सादरीकरण.
शेवटचे समूहनृत्य.....सलामच्या त्या टीमला आणि नृत्यदिग्दर्शकाना.
अशोक पाटील
मला वाटते १ भाग चांगलं आणि एक
मला वाटते १ भाग चांगलं आणि एक भाग वादग्रस्त असे रोटेशन ठेवले आहे आमीर ने ......... >>>>>> कोणताच भाग तसे म्हणले तर वादग्रस्त नव्हता. डॉक्टरांच्या भागावर वाद निर्माण केला गेला भ्रष्ट डॉक्टरांकडुन स्वतःला वाचविण्याकरता!
mala aajcha bhag aawadla,
mala aajcha bhag aawadla, mala watate jya shala aasha mulana pravesh nakartat tya sarkarne band kelya pahije
jai hind
खूप सकारात्मक, प्रेरणादायक व
खूप सकारात्मक, प्रेरणादायक व प्रसन्न भाग होता आजचा!!
आपणही काहीतरी करायला हवं असलं असे वाटू लागले आहे !!!
revu<< +1 anumodan
revu<< +1 anumodan
अशोक व चाणक्य यांचेशी
अशोक व चाणक्य यांचेशी सहमत
शेवटचे समूहनृत्य दाखवतांना क्लोज अप घेऊन अपंगत्व असूनही कलाकार ज्या हाल्चाली सफाईदारपणे करीत होते ते थोडे दाखवले असते तर बरे झाले असते. होते तेही अप्रतीम होते.
य ट्यूबवर दाक्षिणात्य भाषेत
य ट्यूबवर दाक्षिणात्य भाषेत दिसतेय. अजून हिंदी भाग उपलब्ध नाही
http://m.youtube.com/watch?v=
http://m.youtube.com/watch?v=5x9ika_SOX0
हा घ्या हिंदितून कार्यक्रम.
चांगला विषय होता
चांगला विषय होता आजचाही.
(जावेद आबिदी यांना स्टेजवर पाहून - आणि नंतर शेवटचे नृत्य पाहतानाही - सहज मनात आलं, आमिरने या कार्यक्रमाचे स्टेज बनवताना अपंगांना खुर्चीसह स्टेजवर प्रवेश करता यायला पाहिजे असा विचार करून तशी सोय केली असेल का? असेल तर खरंच कौतुकास्पद! )
मस्त एपिसोड
मस्त एपिसोड
छान आणि प्रसन्नपणे सादर झाला
छान आणि प्रसन्नपणे सादर झाला हा भाग
हा भाग अतिशय आवडला. हेल्पर्स
हा भाग अतिशय आवडला.
हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड, आनंदवन यांसारख्या अपंगांसाठी झटणार्या संस्थांबद्दल न बोलता एकटी व्यक्ती काय करू शकते, हे कार्यक्रमात दाखवलं गेलं, आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे.
अपंगांसाठी पायाभूत सुविधा नाहीत, आपण त्यांचा सपशेल अनुल्लेख करतो, हे समोर आलं.
सामान्य शाळा अपंगांना प्रवेश देत नाहीत, हे खरं आहे. मात्र अनेक शाळा याला अपवाद असतात. माझे एक अंध शिक्षक अकोल्यातल्या पाचसहा शाळांमध्ये फिरून तिथल्या अंध विद्यार्थ्यांना शिकवायचे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ही त्यांची नोकरी होती. त्या सहाही शाळांमध्ये अपंग विद्यार्थी नियमितपणे शिकत होते. त्यांच्यासाठी वेगळ्या सोयी नसल्या तरी त्यांच्या शिक्षणात कुठलाही अडथळा नव्हता, हे महत्त्वाचं. आमच्या महानगरपालिकेतल्या अतिभ्रष्ट अधिकार्यांमुळे या शिक्षकांची नोकरी गेली, तो भाग वेगळा.
सुंदर भाग. अमर ज्योती स्कूल
सुंदर भाग. अमर ज्योती स्कूल सारख्या शाळांना सलाम!
आभार भान, नंतर
आभार भान, नंतर बघितला.
आपल्याला कल्पनाच नसते कि फिजीकली चॅलेंज्ड (याला मराठी शब्द सूचवा ना, विकलांग/ अपंग हे शब्द मला तेवढे पटत नाहीत) लोकाना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना किती त्रास होत असेल याचा.
सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास बघून, सर्वाना प्रेरणा मिळेल, असे वाटते.
मस्त भाग होता कालचा
मस्त भाग होता कालचा ..........आवडला......
ते केतन म्हणून गृहस्थ आले
ते केतन म्हणून गृहस्थ आले होते, तेर अफाट बोलले..
आवडला हा भाग. अतिशय
आवडला हा भाग. अतिशय प्रेरणादायी.
भागाची सुरूवात ज्या मुलीच्या व्हिडियोने झाली- तिची मॅच्युरिटी पाहून थक्क झाले! फार कौतुक वाटलं तिचं.
कृष्णकुमार आणि त्यांचे कुटुंबिय- काय मस्त होते ते सगळेच.
दक्षिणा.... तू केतन
दक्षिणा....
तू केतन यांच्याबद्दल दोन शब्द लिहिलेस ते आवडले मला. फार मोठे कार्य आहे श्री.केतन कोठारी यांचे अंधांना सर्वार्थाने "सक्षम" बनविण्याचे. ते स्वतः अंध असूनही ती आपल्यातील एक न्यून आहे असे कधीच मानले नाही. आज ते रीजनल प्रोग्राम डेव्हेलोपमेन्ट अॅडव्हायझरच्या पदावर मुंबईत कार्यरत आहेत. तत्पूर्वी "साईटसेव्हर्स" या संस्थेशी ते १५ वर्षे संलग्न होते.
ज्या प्रभावी वाणीने ते कार्यक्रमात बोलत होते त्यावरून त्यांचा या क्षेत्रातील दबदबा नक्कीच जाणवत होता. 'राज्यशास्त्र' विषयात त्यानी एम.ए. केले असून त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम.बी.ए. प्राप्त केले आहे.
अशोक पाटील
पूनम +१. ती मुलगी मै जैसीभी
पूनम +१. ती मुलगी मै जैसीभी हू खुश हू म्हणाली तेव्हा अक्षरषः काटा आला अंगावर.
निशाची केस फारच रेअर असते ना?
त्या एका गृहस्थानी डिफरन्टली एबल्ड वर मस्तच बोलले.
मामा थँक्स, ही माहीती अधिक
मामा थँक्स, ही माहीती अधिक आहे.
एक खरं सांगु का? तो कृष्णकांत माने नावाचा माणूस मला थोडा आगाऊ वाटला.
आवडला कालचा भाग!
आवडला कालचा भाग!
थोडेसे विषयांतर ---- एका
थोडेसे विषयांतर ----
एका प्रोजेक्ट मध्ये आम्हाला वेब एप्लिकेशन blind आणि फिझीकल चेलेन्ज्ड युझर्स साठी एक्सेसिबल बनवायचे होते. त्या संदर्भात ट्रेनिंग साठी बंगलोर ला गेले होते. त्या ट्रेनिंग मध्ये blind users ना सराईत पणे की बोर्ड हाताळताना बघितले. ते की बोर्ड नॉर्मल कीबोर्ड पेक्षा वेगळे असतात . अक्षरे ब्रेल लिपीत असतात आणि काही साउंड सिग्नल्स असतात. US मध्ये हे कीबोर्ड subsidies किमतीत मिळतात. भारता मध्ये खूप महाग आहेत.
US किंवा UK च्या प्रोजेक्ट्स रीक्वयारमेंट मध्ये software application accessibility बद्दल क्लीअरली मेन्शन केले असते . पण हेच भारतीय कंपनीच्या प्रोजेक्ट मध्ये आढळत नाही.
US Rehabilitation Act. अंतर्गत कोणतीही disability असलेल्या व्यक्ती ला इंटरनेट कुठल्याही अडथळ्याशिवाय वापरता आले पाहिजे.
Web accessibility means that people with disabilities can perceive, understand, navigate, interact and contribute to the Web.
या प्रोजेक्टच्या निमित्ताने या विषयावर खूप R &D करता आली. दोन प्रोजेक्ट्स स्वतंत्र पणे handle केली . पण त्यातील एकही भारतीय कंपनी साठी न्हवते.
Web accessibility संदर्भात प्रत्येक देशाच्या पोलिसिज आहेत पण भारताच्या अजूनही क्लिअर पोलिसिज नाहीत.
अधिक माहिती
'Maharashtra Right to Information Rules, २०००' अंतर्गत वेब accessibility बंधनकारक आहे पण कुणीही seriously follow करत नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी जो
कार्यक्रमाच्या शेवटी जो प्रश्न विचारला....पाच वर्षांत सर्वसमावेशक सोयी न देऊ शकणार्या शाळांच्या मान्यता रद्द करण्याबद्दल....तो जरा utopian वाटला.
भारतातल्या किती शाळांमध्ये सोयी म्हणण्यासारख्या उपलब्ध असतात.
शिक्षकांच्या एकंदर सर्वसाधारण गुणवत्तेवर व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह असताना (त्याची कारणे लक्षात घेऊनच लिहितोय, पण वस्तुस्थिती आहे ती आहे) स्पेशल स्किल्स घेतलेले शिक्षक प्रत्येक शाळेत उपलब्द असावेत असा आग्रह धरणे स्वपरंजन वाटले.
हे 'श्रीमंत' शाळांबद्दल म्हटले असेल तर ठीक आहे.
कालच्या कार्यक्रमातून मी घेतलेला बोध : अपंगांना करुणा किंवा दया यांपेक्षा अन्य लोकांशी वागू त्याच सहानुभूतीने वागावे. माझी एक सहकर्मी बॅचमेट पोलियोबाधित होती, ती कधीही स्वतःला वेगळी ट्रीटमेंट (कामाच्या बाबत - जसे तळमजल्यावरचे पोस्टिंग मागत नसे).
स्पेशल मुलांनी आपल्या मुलांबरोबर शाळेत शिकणे पालकांना खटकते हे मात्र पाहिले/ऐकले आहे. महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातील पालकांनी एचायव्ही पॉझिटिव्ह मुलांना शाळेत प्रवेश देण्यास विरोध केला होता याची आठवण होते.
इंडियन माउथ अँड फूट पेंटर्स असोसिएशन . पर्यावरणाच्या र्हासाला आपला हातभार नको म्हणून शुभेच्छापत्रे पाठवायचे मी थांबविले होते. पण मग या संस्थेची शुभेच्छापत्रे विकत घेऊन परिचितांना पाठवू लागलो.
काल दुपारचीच बातमी.
काल दुपारचीच बातमी. योगायोग?
The National Advisory Council, NAC has recommended giving tax benefits to private employers of persons with disabilities. Giving its suggestions on the draft Rights of Persons with Disabilities Bill (RPDB), the NAC, chaired by Mrs. Sonia Gandhi has also suggested extending subsidies and financial incentives for starting small scale income generation activities by household of persons with disabilities.
In a recent communication to the government, the advisory panel made thesse suggestions. Voicing concern over non-recognition of full legal capacity of Persons with Disabilities, the NAC has recommended that the Law Ministry review all statutes in order to include an acknowledgement of full legal capacity for such persons. It has pitched for stronger anti-discrimination provisions to lower barriers to their productive employment, thus enabling greater participation of these persons in the workforce.
The NAC also recommended that families with disabled members should be given higher weightage during identification of poor households and surveys for Below Poverty Line BPL and food insecure households.
The panel also suggested setting up a single National Disabilities Commission and State Disability Commission to replace diverse institutions concerned with the rights of persons with disabilities.
भरत, स्वतःच्या पायावर उभे
भरत, स्वतःच्या पायावर उभे असलेले स्पेशल लोक, आपणहून अशा आर्थिक सवलती नाकारतील, असे वाटते मला.
निसर्गतः एखादे ज्ञानेंद्रीय काम करत नसेल तर दुसरे एखादे जास्त सक्षम होते असे वाटते. किंवा ते लोक मुद्दामहून त्यासाठी प्रयत्न करत असावे. अंध लोकांची स्मरणशक्ती पण उत्तम असते.
मी काही वर्षांपूर्वी जिथे काम करत होतो, तिथले मॅनेजिंग डायरेक्टर डोळ्याने अधू होते. अक्षरशः त्यांचा हात धरून, कागदपत्रावर सह्या घ्याव्या लागत.
एकदा मी सहज त्यांना विचारले कि त्यांना आम्ही योग्य त्या कागदावरच त्यांच्या सह्या घेतो आहोत, हे त्यांना
कसे कळते, तर ते म्हणाले तूम्ही ज्या तर्हेने माझा हात धरता, त्यावरुन मला कळते. जर तूमचाच हात कापत
असेल, तर मला सहजच कळते.
कर सवलती अपंगांना नव्हे,
कर सवलती अपंगांना नव्हे, अपंगांना नोकर्या देणार्या उद्योगांना.
पौर्णिमा, नंदिनी अनुमोदन!
पौर्णिमा, नंदिनी अनुमोदन! आईच्या कष्टाची या वयात जाणीव म्हणजे...
KK खूप जिंदादिल व आत्मनिर्भर व्यक्तीमत्व आहे, कौतूक वाटलं.
तो कृष्णकांत माने नावाचा माणूस मला थोडा आगाऊ वाटला>>
दक्षिणा, काहीही कर्तृत्व नसलेली माणसे आईबापाच्या जीवावर माज करताना बघितली तर चीड येणे साहाजिक आहे, पण या कृष्णकुमारने स्वतःच्या सामर्थ्याने बरंच काही प्राप्त केलेय, अर्थात त्याच्या आईवडीलांची अथक मेहनत विसरता येणार नाहीच. पण तरीही मला त्याचा फाजील आत्मविश्वास आवडला! अर्थात हेमावम. असो.
कालचा भाग उगाच रडगाणी न गाता, दया सहानुभूती न दाखवता एका आशावादी व प्रसन्न वातावरणात सादर केल्याने जास्त आवडला. आधीच्या भागांपेक्षा खूपच पॉझिटिव्हली सादर केला हा भाग.
निशाच्या कहाणीमध्ये मॉलमधली एक बाई तिच्यावर थंकली हे ऐकून धक्का बसला. असं करू शकतात खरंच? हिस्टरी चॅनेलवर सयामी जुळ्यांची कथा सांगत असताना त्यांच्या आजीलाही असाच अनुभव आला होता, अशा (म्हणजे कशा???) मुलींना तुम्ही बाहेर कशाला आणता टाईप्स प्रश्न विचारले गेले. एका प्राध्यापिकेने म्हटल्याप्रमाणे लोकांची मानसिकता विकलांग असते, भारतात काय किंवा भारताबाहेर काय!!!
शेवटचा परफॉर्मन्स पण मस्त
शेवटचा परफॉर्मन्स पण मस्त होता!
Pages