Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे गिरीश जोशी आणि रसिका ओक
हे गिरीश जोशी आणि रसिका ओक कोण आहेत?<<<
गिरीश जोशी हा उत्तम लेखक आहे. 'फायनल ड्राफ्ट'चा लेखक. अधून्मधून अभिनय करतो तो. सध्या एलदुगो मधे विनोद काकाचा रोल करतोय.
रसिका ओक-जोशी ही अप्रतिम अभिनेत्री होती. दुर्दैवाने खूप लहान वयात तिला कर्करोगाने गाठले. १० वर्ष लढली ती. तिला जाऊन एक वर्ष होईल आता.
रसिका गिरीशची बायको.
रसिका ओक-जोशी म्हनजे त्याच
रसिका ओक-जोशी म्हनजे त्याच ना भुलभुलैया मध्ल्या परेश रावल च्या बायको चा रोल केलेल्या..?
हो
हो
मलाही गिरीश जोशी कॅमेरासमोर
मलाही गिरीश जोशी कॅमेरासमोर अवघडल्यासारखा वाटतो थोडा...
बाकी, ते पॉझसकट राधा >>> अगदी
रसिका-मुक्ता या दोघी घडलंय
रसिका-मुक्ता या दोघी घडलंय बिघडलंय मध्ये एकत्र असायच्या ना?
प्रपंचमध्येही होती ती.
मिलिंद फाटकसोबत तिने व्हाइट लिलि नाइट रायडर हा नवीनच यशस्वीपणे केला होता.
मला कालचा शेवटचा सीन आवडला
मला कालचा शेवटचा सीन आवडला ज्यात राधा शेवटी घनासमोर ती डळमळीत झालीय हे कबूल करते. गिरीश जोशींचा कॅमेर्यासमोरचा वावर सहज वाटत नाही. देहबोली अवघडलेली आहे. ललिता + १. त्यांना बघताना अपरिहार्यपणे रसिका आठवतेच दर वेळी. कॅमेर्यासमोर तिच्याइतका बिनधास्त वावर कुणाचा नसेल
उका कसला गोड दिसलाय प्रोमोजमध्ये. घरातल्या बाकीच्यांचे सीन्स जास्त असतील त्यादिवशी भाग फार बोअर होतो. उकाचे सीन्स बघताना निदान ते तरी होणार नाही. त्यामुळे कितीही प्रेडिक्टेबल ट्विस्ट असेल तरी लेखकाला माफी
छे! मला घना जामच आवडायला
छे! मला घना जामच आवडायला लागलाय. ती व्यक्तिरेखा इतकी मस्त झालीये की त्याचा बावळटपणा पण भाबडेपणा वाटतोय. त्याचं राधाशी आणि त्याच्या आईशी हळवं, गोड वागणं पण सहीच्च. तो तिला किती छान सांगतो," मला तुझे भास व्हायला लागलेत यार (सुप्रसिद्ध पॉझ) राधा! " त्यावेळी राधाची रिअॅक्शनही मस्तच. स्वप्निल जोशी चा घना सहीये. राधाचा (मुब) चा तर प्रश्नच नाही. ती पण मस्तच. क्युट जोडी !
मला घना आणि राधानी मिळुनच हा तिढा सोडवुन एकत्र आलेलं आवडलं असतं. अरे हे सुद्धा समजायला जर तिसर्या कोना/णा ची गरज पडली तर पुढे कसं व्हायचं यांचं? हे म्हणजे तिसर्या गोष्टीला आमंत्रणच!
घनाचे चुका करुन त्यानंतर भाबडा चेहरा करुन माफी मागणे, राधाला रागावू नकोस ना म्हणणे आणि राधाचे राग आटोक्यात ठेवत चिडचिड दाखवणे हे सगळे एकदा, दोनदाही क्यूट वाटलं पण आता अगदीच डोक्यात जातय. अॅक्टींगची स्टाईल रिपिट होतेय, सीन्स रिपिट होताहेत हे दिग्दर्शकाला कळत नाहीये का? >>>>>> जौद्या झालं. त्यांचे स्वभावच आहेत तसे त्यामुळे कुठल्याही प्रश्नाशी डील करतांना ते तसेच रिअॅक्ट होतात असं दिसतय. पण सीन्स मात्र बरेचदा तेच तेच बघतोय असं नक्कीच वाटतं. भाटेकाकु आणि घना याच्यातल्या संभाषणात तर काकु कितीतरी वेळा तीच ती वाक्य बोलत होत्या.
>>घनाचं ते चाचरत चाचरत बोलणं
>>घनाचं ते चाचरत चाचरत बोलणं बोर व्हायला लागलंय!<<<
अनुमोदन
मेला एक वाक्य न अडखळता बोलेल तर शपथ
'म्हणजे काय झालय की, आअय मीन ,म्हणजे असं होऊ शकतं ना, म्हणजे असं होतंच ना, तसंच झालंय........................राधा
उपमा काय ..शिरा काय ...आम्ही ऐकतोय म्हणून काहीही बोलायचं म्हणजे....
संवाद त्याला चिमां लिहून देतो की स्वतःच झोपेत बडबडतो देव जाणे!
...............
स्वप्नील जोशी झिंदाबाद ! दुसरा कोणी नाय पायजेल ...अशी पोस्ट टाकणारी मीच का ती ?
की हा उ का येतोय त्याचा परिणाम ?... confused
संवाद त्याला चिमां लिहून देतो
संवाद त्याला चिमां लिहून देतो की स्वतःच झोपेत बडबडतो देव जाणे!<<<
चिमा संवाद लिहित नाही. मनू लिहिते.
मला कधी नव्हे ते स्वजो बरा वाटतो.
चिन्मय मांडलेकर ह्या मालिकेशी
चिन्मय मांडलेकर ह्या मालिकेशी रिलेटेड आहे का ? वाचल्याचं आठवत नाही.
चु ची दु....चिमां नाही
चु ची दु....चिमां नाही ...मनस्विनी !
पटकथा त्याची आहे.
पटकथा त्याची आहे.
कथा - रंगा पटकथा - चिमा संवाद
कथा - रंगा
पटकथा - चिमा
संवाद - मनू
स्वजो चा मोबाईल मागून
स्वजो चा मोबाईल मागून कॅसेटसारखा दिसतो आधी मी गंडलेच होते ते पाहून
आज चिमा आवडला. सॉरी इथेच
आज चिमा आवडला. सॉरी इथेच लिहीले. ती शमिका त्याला शिरा भरवते आणि तो भरवायला जातो तर ती घेत नाही भरवून. ( क्काय पण बायका असतात?
अभिर म्हणजे ज्याला इतके
अभिर म्हणजे ज्याला इतके सिरिअलचे एपिसोड बघूनही भिरभिरी आलेली नाही असा तो......
म्हणून घेतलाय त्याला
रसिका ओक-जोशी म्हनजे त्याच ना
रसिका ओक-जोशी म्हनजे त्याच ना भुलभुलैया मध्ल्या परेश रावल च्या बायको चा रोल केलेल्या..?
>>>>>>>>>>>
अरे लोकांना हिंदी सिनेमेच आठवतात पटकन तिने व्हाईट लिली नाइइट रायडर नाटक मस्त केलं होतं.
वास्तुशास्त्रमधली मोलकरीण पण भन्नाट होती..... छोट्या छोट्या रोल्समध्ये पण रसिकाची दखल घ्यावी लागेल असा लक्षात राहणारा अभिनय करायची. ग्रेट कलाकार..
रसिका जोशीने 'एक हसीना थी'
रसिका जोशीने 'एक हसीना थी' मधे उर्मिलाबरोबर किती छोटासा रोल केला होता, पण अगदी लक्षात राहिली ती. काय सुंदर अभिनय करायची.
मला आश्चर्य वाटतं कि मुक्ताचे कपडे तिनेच निवडले कि त्यांना सांगतील तेच कपडे घालणं बंधनकारक असतं. काय भयाण कॉम्बीनेशन्स आहेत. काल तिने बेज पतियालावर पांढरीशुभ्र ओढणी घेतली होती. आज डार्क ऑरेंज पतियाला विथ मल्टीकलर्ड फ्लावर्स आणि वर अबोली ओढणी ? लग्न झालं तरी नाइटसुट नविन नाही घेतले वाटतं? तिच्याकडे एकच हॅन्डबॅग आहे. तिचा कलरपण अगदी तुळशीबाग स्टाइल चिप आहे. आज तिच्या फुटवेअरकडे लक्ष गेलं, मराठी मालिकांमधे नॉन-ग्लॅमरस रहावं असा नियम आहे का? हिंदी मालिकांसारखं झोपतानासुद्धा टकाटक नसलं तरी जरा कपड्यांचं बजेट वाढवायला हरकत नसावी. (कथानक गंडलं कि करायचं काय? मग या गोष्टींकडे लक्ष जातंच. )
shreerang godbole na ranga
shreerang godbole na ranga mhanaycha, manswini la manu mhanaycha mhanje me tyanchi kiti close friend ahe te samast mb walyana kalla pahije. cchya. nava kahi kam pan nahi milatay.
ranga chi bayko tiche kapde
ranga chi bayko tiche kapde tharavte. kahi mhanu naka ranga la rag yeil. :-/
मालिका सध्या परत रुळावर आलीय
मालिका सध्या परत रुळावर आलीय अस वाटतय. भाग, संवाद, अभिनय सगळ जुळुन येतय. मानव वैगेरेच जरा अतिच दाखवलय पण ओके. राधाच कैरेक्टर छान वळण घेतय. तिचा हेड स्ट्राँग स्वभाव, लग्न झाल्यानंतर एवढ्या माणसांत लागलेला लळा, कुठच्याकुठे हरवलेला एकाकीपणा, छान जमतय. घनामात्र डोक्यात जातो बरेचवेळा. लग्न होऊनसुद्धा बालीशपणे वागतोय, पसारा, गेम खेळण, चुका करुन सॉरी म्हंटल की संपल, नात्यांना सीरीयस्ली न घेण, स्वतःपुरताच विचार करण आणि सगळ्यात हाईट म्हंणजे अमेरीकेत जायच खुळ.....स्वनिल जोशी ने तरी छान साकारलाय पण आता त्याला जबाबदारयांची जाणीव होताना दाखवल पाहीजे जरा......
बाकी ईकडे माबोवर ज्याप्रमाणे टीका होते छोट्या छोट्या गोष्टींसाठी...तेवढी काही ही मालीका वाईट नाहीय.....मागचे काही एपिसोड वगळता आता मालिका परत रुळावर आलिय अस वाटतय
आज राधा चा अभिनय रडताना
आज राधा चा अभिनय रडताना खालावला चांगलाच! स्वप्नील जोशी अत्यंत चांगला कलाकार बनला आहे.
सॉरी म्हंटल की संपल>>> सॉरी
सॉरी म्हंटल की संपल>>> सॉरी नाही ... बॉरी पण म्हणतो तो कधी कधी
पावसाळा सुरू झाल्यावर
पावसाळा सुरू झाल्यावर कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे काही आयडीच मधुनच उगवतात आणि चांगल्या चाललेल्या गंमतीत उगीच त्यांच्या पोटातली मळमळ ओकतात...
कालचा एपिसोड आवडला. आज्जीबाईंचा खरेच काहीतरी प्लअॅन शिजतोय. ज्ञानामुळे त्यांनी दिगाला अॅड केले आता त्यात. ज्ञानाने काल खरेच त्याचे कर्तव्य नीट बजावले.
मने, खरेच ती सलवार ओढ्णी जरा
मने, खरेच ती सलवार ओढ्णी जरा विचित्रच दिसत होती. तसेच कुडत्याची लेंग्थ पण जरा ऑड आहे. त्यामुळे ती उगीचच जाड दिसते. पर्स पण अजून जरा एलिगंट चालेल नै. मानवाचा मेक ओव्हर पाहिला का? ( रंगिलातल्या आमिर ची आठवण आली.) पण मुक्ता व तिच्या बाबांचे नाते पण अगदी सही दाखविले आहे. ह्या मुली असेच पिडतात.
बर्याच जणांच्या डोक्यात
बर्याच जणांच्या डोक्यात गेलेला घना आणि त्याच्या आईमधला संवाद मला खूप आवडला. महत्प्रयासाने झालेले मुलाचे लग्न मोडताना पाहून होणारी आईची मनःस्थिती इला भाटें+ मनस्विनी यांनी सुरेख रंगविली.>>>>+१.
उकाची विंट्री मिसली मी काल....साबा चतुर्थीचे जेवण करण्यात व्यग्र असल्याने देवयानी ऐवजी एलदुगो पाहता आले. पण आरती घेताना उकाने तिकडे बेल वाजवली अन मी इकडे टीव्ही बंद केला उका शेफ आहे म्हणजे विआंशी चांगलेच पटेल त्याचे.
बाकी राधाचा अभिनय गंडलाय किंवा खालावलाय हे मुळीच पटत नाहीय. उलट तिने घनाला सिक्रेट फोडल्याचे आवडले नसल्याचे स्पष्ट सांगितले ते आवडले, तसेच मोजक्या शब्दात ''मला कशी या घराची , इथल्या माणसांची आणि पर्यायाने तुझी(हे इनडिरेक्टली) सांगितले. थोडक्यात काय तर सगळं आलबेल सुरू आहे सध्या.
''मी तुमच्यापेक्षा मॉडर्न आहे'' असं दिग्या काकाला ठणकावणारी माई आज्जी खासच!
एक सिक्रेटः माई आज्जी म्हणजे माझ्या आजेसाबांची डिक्टो कॉपी आहेत. बोलणं-चालणं, मान डोलावून गाणी म्हणणं, तरूण पीढीसोबत दंगा करणं, टापटीपपणा अगदी शेम टू शेम!
शी! त्या मानवाला हद्दपार केला
शी! त्या मानवाला हद्दपार केला पाहिजे... लोचट मेला! एवढ्या वेळा तोंडावर आपटतो तरी अक्कल कशी येत नाही म्हणते मी... पण मजा येईल आता, आधी घना होताच आता अबीर आलाय.. त्यामुळे हा गरिबांचा शाहरूख बोंबलणार आता
घनाला इन्सिक्युरिटी आणण्यासाठी त्या अबीर रानडे चं पात्र आणलं असावं. (हा राजवाडे आडनावं पण एक एक सिलेक्ट करून घेतो अक्षरश:)
मानव अचाट आहे. काल काय तो
मानव अचाट आहे. काल काय तो पिवळा शर्ट का टी शर्ट घातलेला.
राधाने ढूंकूनपण नै पाहिलं, वर म्हणाली निदान ऑफिसल येताना तरी बरे कपडे घालत जा >>>>>
आय डोंट फॉलो धिस सिरिअल
आय डोंट फॉलो धिस सिरिअल नाऊअडेज......... आय जस्ट फॉलो दी फॉलोवर्स
काय बारकाईने बघताय सगळे सिरिअल्स..........
DCH मधे कसं आमिर खान
DCH मधे कसं आमिर खान प्रीटीच्या मामाला नुसतं 'महेश' म्हणतो, तसं आबिर का कोण म्हणणार वाटतं विनय आपटे ला
Pages