एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

उका क्यूट दिसतोय Happy ( पण स्वप्नीलपेक्षा नाहि Wink )
मालिकेला चांगलं वळण दिलय. लवकर संपायची नाहि Happy

कधी दाखवल उकाला?? त्याची एंट्री तर अजुन व्हायचिये ना? काल फक्त त्याने फोन केला होता पेइंग गेस्टसाठी विनय आपटेंना जो राधाने उचलला होता.
असो. पुन्हा तेच दळण दळणार का?

आला आला आला. उका आला पण स्वजोऐवजी दुसर्‍या रोलसाठी आलाय. उद्या काय ते नक्की कळेल. माईआजीला बारश्यासाठी पुण्याला पाठवून उकाचे एक नवे क्यार्‍याक्टर आणले आहे. आत्या व माईआजी पुण्याला एकत्र चालल्यात असा मला मेलीला सौशय आलाय. Wink
उकाबरोबर राधाचे नवे दळण चालू होणार. पुन्हा आपली चिडचिड.;)

प्राची, तुझी क्लिप पाहिल्या नंतर आत्ती स्वप्निलला जमाईबाबू न म्हणता जमाईबापूच म्हणते असं मला आढळुन आलेलं आहे. Proud

मला कालच्या भागातल्या आज्जी आवडल्या. नक्कीच काहीतरी शिजतेय...

काल राधा-घनाचा घनाच्या रुममध्ये दरवाजा सताड उघडा ठेऊन त्या दोघांचा लग्नाच्या सिक्रेटविषयी सुसंवाद चालला होता तेव्हा काळे कुटूंबात दुस-यांचे बोलणे चोरुन ऐकायची पद्धत नाही याचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. त्यांच्यात हिंदी मालिका पाहात नाहीत काय?? तिथे तर दरवाजे बंद असतानाही बाहेरच्याला सगळे ऐकु येते.

बर्‍याच जणांच्या डोक्यात गेलेला घना आणि त्याच्या आईमधला संवाद मला खूप आवडला. महत्प्रयासाने झालेले मुलाचे लग्न मोडताना पाहून होणारी आईची मनःस्थिती इला भाटें+ मनस्विनी यांनी सुरेख रंगविली.

(घना ऑफिसांतल्या कॉम्प्युटरच्या एएमसीज घेतो. ते कॉप्स कधी बिघडतच नाहीत. त्यामुळे त्याला कामही पडत नाही आणि फुकट पैसा मिळतो हे कळले.)

राधाच्या आत्याचे पात्र रंगविताना कोणीही अजिबात मेहनत केलेली दिसत नाही.

पुढचे वाक्य लिहिणे अशिष्ट आहे. पण....
व्हीलचेअरवरून फिरणार्‍या आजी आणि हात मोडलेल्या आत्याबाई राधाघनाच्या संसारासाठी कट शिजवताहेत हे पाहून मला काळजी वाटू लागली आहे.

साधना , अगदी हाच विचार माझ्या पण मनात आला... Happy

काल साबा ची फिरती असल्यामुळे भाग बघता आला. आजपासून परत 'देवयानी' चालू.... Sad

व्हीलचेअरवरून फिरणार्‍या आजी आणि हात मोडलेल्या आत्याबाई राधाघनाच्या संसारासाठी कट शिजवताहेत हे पाहून मला काळजी वाटू लागली आहे.>>>> का?

अमृता, हो मीही ऐकले नीट. पण मला तो शब्द खटकत नाही. कारण, बर्‍याचदा ऐकला आहे मैत्रिणींकडून. Happy

खरं तर, तिचं असं हिंदी बोलणंही खटकत नाही. कारण, आजूबाजूला असे मध्येच हिंदी शब्द वापरणारे पाहिले आहेत. घरात मराठी आणि बाहेर हिंदीत बोलणे होत असेल. तर अशी भाषेची भेळ होतेच.

देवयानी के नक्की काय प्रकरण आहे? कलाकार कोण आहेत? (हे विचारून मी पायावर धोंडा मारून घेतोय का?)

राधाची आत्या आता इंदूरनिवासिनी असली तरी मूळची इथलीच (म्हणजे बहुतेक मुंबईची) इंदूरमधल्या माझ्या ५+ वर्षांच्या वास्तव्यात मला हिंदी मराठीची भेळ करणारी मराठी माणसे दिसली नाहीत.एकतर मराठीत बोलतील नाहीतर हिंदीत. मराठीला बरीक हिंदीची फोडणी असते. 'काय करून राहिला' एवढंच आता लक्षात आहे. असो. जावयाचे नाव न घेता त्याला जमाईबापू म्हणण्याएवढा संस्थानी प्रभाव आता राहिलेला नाही.
विनय आपटेंचे स्पष्ट स्वच्छ सुंदर शब्दोच्चार एकताना सुकुमो फारच खटकतात.

तो नवा कोरा पीजी राधाच्या वडिलांना चक्क महेश म्हणणार आहे का?

का?: आत्याबाई एका हाताने आजींना सांभाळून कट कोणत्या हाताने शिजवणार? की आजीबाई स्वतःच शिजवणार? खरोखर पुण्याला न जाता मुंबईतच लपून बसणार असतील तर ठीक आहे.

काल कॉफीचा कप समोर ठेवून घनाचे वडील जसे बसले होते ते पाहून घनाला आळशीपणा वारश्यात मिळालाय असे वाटले. मग कळले की त्यांना कशातच उत्साह वाटत नाही आहे.

काल कॉफीचा कप समोर ठेवून घनाचे वडील जसे बसले होते ते पाहून घनाला आळशीपणा वारश्यात मिळालाय असे वाटले. मग कळले की त्यांना कशातच उत्साह वाटत नाही आहे. >>> Happy
पण राधा आल्यावर असे जास्त कुठे काय झाले की अगदी उत्साहा चा धबधबा वगैरे वाहायला... :-o

कालचा राधा-घना संवाद अगदीच बोर. फोनवरचा आणि नंतर घरातलाही. घनाचे चुका करुन त्यानंतर भाबडा चेहरा करुन माफी मागणे, राधाला रागावू नकोस ना म्हणणे आणि राधाचे राग आटोक्यात ठेवत चिडचिड दाखवणे हे सगळे एकदा, दोनदाही क्यूट वाटलं पण आता अगदीच डोक्यात जातय. अ‍ॅक्टींगची स्टाईल रिपिट होतेय, सीन्स रिपिट होताहेत हे दिग्दर्शकाला कळत नाहीये का?

विनोद आणि घनाचा सीनही त्यामुळेच बोर झाला. विनोदचं काम करणारा आहे कोण तो? अगदीच कंटाळवाणी अ‍ॅक्टींग करतो. आसावरी जोशीच्या व्हायब्रन्ट कॅरेक्टरपुढे तर अगदीच नीरस दिसतो. त्यांचे पटले नाही हे बरोबरच.

विनोदचं काम करणारा आहे कोण तो? अगदीच कंटाळवाणी अ‍ॅक्टींग करतो. आसावरी जोशीच्या व्हायब्रन्ट कॅरेक्टरपुढे तर अगदीच नीरस दिसतो. त्यांचे पटले नाही हे बरोबरच.>>> +१
विवेक लागूंचे बोलणेही फार नाटकी वाटते.

काल सकाळ ला बातमी होती-

एलदुगो मधे उमेश कामत ची एन्ट्री!
तो एक अत्यंत गुणी व्यक्ती आणि निपूण नेमबाज.
पप्पाला आवडायला लागतो लगेच.
आधी राधाला तो आवडत नाही- म्हणून ती त्याच्यावर चिडचिड करते (स्वभावधर्मच तिचा :फिदी:).
पण घनाला कधीही न जमू शकणार्‍या सगळ्या चांगल्या गोष्टी तो लीलया करतो म्हणे (बापरे, म्हणजे 'नेमके' काय काय :अओ:)त्यामुळे राधाला तो हळू-हळू आवडायला लागतो व दोघांत (गहरी का काय) फ्रेंडशिप होते, ह्याचा सुगावा घनाला लागतो आणि मग कहाणीत ट्विस्ट आहे म्हणे!

आता हे सगळं, ह्या धाग्यावर कित्त्त्त्त्त्त्त्त्तीतरी आधी प्रेडिक्ट झालेय, हे त्यांना माहितीच नसावे बहुधा Proud

शर्मिला, तो गिरिश जोशी. कॉन्ट्राडिक्शन असं, की तो स्वतः उत्तम लेखक आहे Happy पण देहबोली नाही आवडली.
उल्का आत्यांचे बजेट वाढवले पाहिजे. एकाच साडीत असतात कायम! Uhoh
आजींचे रजेचे आठ दिवस सुरू झाले अस्तील. पाळीपाळीने एकेकाला सुट्टी असते ह्या मालिकेत. भाटेकाकू-लागूकाका, स्वप्निल, सुप्रियाकाकू आणि आता आजी.

देवयानी के नक्की काय प्रकरण आहे? कलाकार कोण आहेत? (हे विचारून मी पायावर धोंडा मारून घेतोय का?)>
ही दुसरी सिरीयल आहे. स्टार प्रवाह वर येते. जशी 'पुढच पाउल' स्टार प्लस वरील 'साथ निभाना साथीया' ची मराठी व्हर्जन आहे तशीच 'देवयानी', 'प्रतीग्या' सिरीयल चे मराठी व्हर्जन आहे.

ही दुसरी सिरीयल आहे. स्टार प्रवाह वर येते. जशी 'पुढच पाउल' स्टार प्लस वरील 'साथ निभाना साथीया' ची मराठी व्हर्जन आहे तशीच 'देवयानी', 'प्रतीग्या' सिरीयल चे मराठी व्हर्जन आहे.

ज्ञानपिठ अवॉर्ड मिळालेले दोन दोन दिग्गज ज्या मातीत जन्मले त्या मातीला आता उसने वाण घ्यावे लागतेय... आणि तेही कोणाकडुन?? एकादशीच्या घरी शिवरात्र......

'अभीर' ऐकल्यावर माझ्या मनात ' बधीर' का येते कुणास ठाउक Happy

बाकी, उका क्यूट दिसतोय ( पण स्वप्नीलपेक्षा नाहि )>>>>>> यासाठी भानला १००० मोदक Proud

ज्ञानपिठ अवॉर्ड मिळालेले दोन दोन दिग्गज ज्या मातीत जन्मले त्या मातीला आता उसने वाण घ्यावे लागतेय... आणि तेही कोणाकडुन?? एकादशीच्या घरी शिवरात्र......>>>> Uhoh

<< स्वजो-मुब कशी मॅच्युर्ड जोडी वाटते.

ह्याला अनुमोदन Happy

उ का जबरी आहे Happy अर्थात स्वजो ह्या कॅरॅक्टरसाठी पर्फेक्ट आहे Happy

खर तर घना राधा प्रेम कहाणी १-२ भागात उरकून मालिका संपवणं सहज शक्य होत, हे पेईंग गेस्ट, गहिरी मैत्री, नागमोडी वळण वगैरे सगळं निव्वळ लांबण लावणं आहे.

स्वप्निल किती गोड म्हणतो ना एक पॉज घेऊन 'राधा' Happy

उमेश कामतचा अँगल चांगल्या पद्धतीने घेतला तर मजा येईल पहायला.

'साथ निभाना साथिया'ला बदनाम करू नका. कदाचित 'पुढचं पाऊल'ची सुरूवात त्यासारखी असेल पण बायकांनी एकमेकींच्या झिंज्या ओढणे, शॉक देणे, बडवणे, तुडवणे हे प्रकार किमान त्या मालिकेत तरी नाहीयेत. त्यामुळे पुढचं पाऊलचं योग्य ते क्रेडिट त्याच्या डोकं नसलेल्या क्रियेटिव्ह हेडकडेच राहूद्या. आणि ह्या सर्वांवर उहापोह करण्यासाठी एक निराळा धागा आहे. इथे फक्त 'एका लग्नाची..' वरच बोलूया कृपया.

मला मेलीला सौशय आलाय. >>>>>>>. मैना मलापण(मेलीला!!) दाटच सौशय!
देवयानी के नक्की काय प्रकरण आहे? कलाकार कोण आहेत?>>>>मंदार जौद्याना!!
>>> (हे विचारून मी पायावर धोंडा मारून घेतो>>>>>>>> होहोहो!!!अगदी अगदीच!
हे गिरीश जोशी आणि रसिका ओक कोण आहेत?
आता राधा आणि घनाचं ते चाचरत चाचरत बोलणं बोर व्हायला लागलंय!

Pages