फ्रेंच ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 23 May, 2012 - 03:58

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच

अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोला,

>> गेम्स तरी कशाला मग? पॉईंट्सच मोजूया. कसे?

हो चालेल की! नवीन पद्धत उदयास येउद्या! नाहीतरी फूलधोपटीमध्ये (बॅडमिंटन) फक्त गुणंच मोजतात. जो सर्वात अगोदर १८ गुण मिळवेल त्याला तो सेट मिळेल. मात्र किमान फरक ५ गुणांचा हवा. एव्हढा फरक नसल्यास प्रथम २७ गुण मिळवेल त्याच्या खाती सेट. मात्र फरक किमान ४ गुणांचा हवा. पुढच्या स्तरासाठी ३६ गुण आणि फरक ३. पुढे ४५ गुण आणि फरक २.

२ गुणांचा फरक म्हणजे कोंडीफोड (टायब्रेकर) सारखं झालं. ४५ च्या पुढे जो सलग २ गुण मिळवेल त्याचा तो सेट.

कसे वाटतात माबो ग्रँड स्लॅमचे नियम? Proud

आ.न.,
-गा.पै.

अहो गामा पैलवान

तुमच्या माबो ग्रँड स्लॅम नियमांपेक्षा तुमचे "कोंडीफोड" व "फुलधोपटी " हे शब्द फारच आवडले..वाचुन ह. ह. पु. वा.! Happy

एनिवे.. ज्या पद्धतीने राफा या टुर्नामेंटमधे खेळत आहे त्यावरुन तरी त्याला यावर्षी इथे हरवणे जोको किंवा फेडरर या दोघांपैकी कोणालाही जमेल असे वाटत नाही..

फेडरर जर फायनलला आला तर राफा व त्याच्यातली ही नववी(९!) ग्रँड स्लॅम फायनल असेल व जोको फायनलला आला तर राफा व त्याच्यातली ही पाचवी(५) ग्रँड स्लॅम फायनल असेल . राफा व जोको जर फायनलला आले तर ही त्यांच्यातली लागोपाठ चौथी ग्रँड स्लॅम फायनल असेल!

गेल्या १० वर्षातल्याच नाही तर ऑल टाइम टॉप प्रतिद्वंदिता(म्हणजे रायव्हलरीज.. गामा पैलवानांना जरुर आवडेल हा मराठी शब्द!)मधल्या दोन ग्रेटेस्ट प्रतिद्वंदिता म्हणता येतील अश्या या राफा-जोको व राफा-फेडरर यांच्यातल्या प्रतिद्वंदिता आहेत.(दुसर्‍या टॉप प्रतिद्वंदितांमधे बोर्ग्-मॅकेन्रो, बोर्ग्-कॉनर्स, कॉनर्स्-मॅकेन्रो ,लेंडल्-मॅकेन्रो,लेंडल-विलँडर ,बेकर्-एडबर्ग व सँप्रास- अ‍ॅगॅसी या प्रतिद्वंदिता सगळ्यांना आठवत असतीलच)

एकंदरीत राफाबरोबर कोणीही फायनला आले तरी या रविवारचा फ्रेंच ओपन फायनलचा दिवस सार्थकी लागणार हे नक्की! Happy

गताड्या व भांडकुदळ विलिअम्स भगीनीं(खासकरुन सेरेना) पहिल्या व दुसर्‍याच फेरीत गारद झालेल्या बघुन फार फार आनंद झाला.

मुकुंद,

आपल्याला शब्द आवडल्याचं सांगितल्याबद्दल आभार! खरंतर फूल धोपटणे हा शब्दप्रयोग पु.ल. देशपांड्यांनी 'असा मी असामी' मध्ये केला होता. त्यामुळे फूलधोपटी या शब्दाचं श्रेय त्यांना आहे.

अवांतर : फूलधोपटीचा खेळ पुण्यात सुरू झाला. पुण्यात कायकाय सापडेल!! गंमत आहे नाही? Happy

आ.न.,
-गा.पै.

गो इर्रानी! Happy
ठोसरबाईंनी चुकापण फार केल्या.

शारापोव्हा फायनला जाईल का?
तिचा ग्रँड स्लॅम पूर्ण होईल का?
अजून कोणाचा होईल का?

शारापोव्हा फायनलला पोचली !!!!!!
क्विटोव्हाने फार चुका केल्या.. बरेचसे पॉईंट्स क्विटोव्हाने बाहेर मारल्यानेच शारापोव्हाला मिळाले.. शारापोव्हाने सर्व्हिस चांगली केली चक्क ! आणि चुकाही कमी केल्या.

इर्रानी ठोसरबाई पण भारी झाली मॅच. ठोसर बाईंनी सुरूवातीला आणि शेवटच्या दोन गेम्समध्ये केलेल्या चुका महागात पडल्या.

शारापोव्हा नंबर १ झाली आता. उद्या मजा येणार.

महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडगोळीचं अभिनंदन!

लोला, माझ्या आगोदर भूपती आणि मिर्झाचं अभिनंदन केल्याबद्दल आपलंही अभिनंदन! Happy

आ.न.,
-गा.पै.

नदाल किरकोळीत मारणार फेररला.. नदाल चांगलाच फॉर्ममध्ये आहे... आणि जोको, फेडेक्स ५ - ५ सेटर खेळताहेत.. फायनल पण किरकोळीत होणार का???

लालालय्यो लय्यो लय्यो!

हुर्रे! हुर्रे!

२०११ का कर्ज उतरेगा शायद!

Pages