फ्रेंच ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 23 May, 2012 - 03:58

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच

अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पराग, चुका खूप वाटत होत्या. पावसानंतर राफाच्या जास्तच चुका होत होत्या. पण मॅचमध्ये चुरस वाटत होती. ती मधली ४४ शॉटची रॅली भारी होती.

मॅच बोअर चालली होती काल. >>>> खरंच कंटाळा आला काल जे काही बघायला मिळालं, ते बघताना Sad ग्रँड स्लॅम फायनल आहे असं वाटतच नव्हतं.

४४ शॉट्सची रॅली खरच जबरी होती....

दोघांवरही कसले तरी प्रचंड दडपण वाटत होते काल खेळताना.. त्यामुळे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे असे होत होते.. खरं तर दोघेही सेमी फायनल सरळ सेट मध्ये जिंकून फायनलला पोहोचलेले आहेत त्यामुळे फारसे दमलेले नसूनही ढेपाळलेले वाटत होते... पावसा नंतर जोको बरा खेळत होता.. चवथा सेट तो घेईल असे वाटते आहे...

मॅच सुरु किती वाजता होणार आहे???

हो वेदर.कॉम वर दिवसभर पाऊस दाखवतो आहे.
मॅच एक वाजता म्हणजे अजून २० मिनिटांनी सुरु होणार आहे..जर वेळेत सुरु झाली तर.

राफा जिंकणार........................ १ का ३

मयेकर दोन दिवस लागल्यामुळे हुश्श म्हणताय का??? काल पुढे झाली असती मॅच तर कदाचित वेगळा निकाल बघायला मिळाला असता... कारण तेव्हा राफा थोडा ढेपाळल्यासारखा वाटत होता... आज परत आल्यावर त्याने पहिल्या दोन सेट सारखा खेळ करून मॅच जिंकलेली आहे...

दोन दिवस लागले म्हणून हुश्श नाही हो, जिंकला एकदाचा म्हणुन हुश्श.
एकतरी गड राखला आमच्या बाळ्याने. बाकीचे गड परत घेणं कठीण आहे, जोको असाच खेळत राहिला तर. त्याच्या खेळावर आपल्याकडे सध्यातरी उत्तर नाही असे राफाने म्हटले तो सध्या बराच लांबलाय.
या मॅचमध्ये स्पेक्टॅक्युलर शॉट्स फारसे नव्हते तरी श्वास रोखून धरायचे क्षण बरेच आले.
मॅच ग्रेट नाही झाली याचा दोष आपण पावसावर टाकूया.

काही का असेना............शेवटी राफा वरुन ज्याकोचे भुत उतरले.........शेवटी............:)

उदयन, मध्येच नाही. राफा जिंकल्यावर आले. एनबीसी स्पोर्ट्स ऑनलाईन स्ट्रीमिन्गच बघावे लागले, आज टीव्हीवर कुठे दिसली नाही.

इतक्या लवकर ग्रँड स्लॅम वगैरे होत नसतो. फार कष्ट पडतात त्याला. Proud
फ्रेंच ओपनचा 'नवीन' विजेता जो असेल तो आधी मरे असेल, जोको नाही. (भविष्यवाणी उर्फ विशफुल थिंकिन्ग) Proud

एकतरी गड राखला आमच्या बाळ्याने. >>>> Proud
जिंकेल हो जिंकेल बाकी ठिकाणी पण आशा सोडू नका.. आणि तसाही ज्योको जिंकला तरी चालेल.. बाकी कोणी नको.. Wink

काल पुढे झाली असती मॅच तर कदाचित वेगळा निकाल बघायला मिळाला असता... कारण तेव्हा राफा थोडा ढेपाळल्यासारखा वाटत होता >>>> ते कोर्ट खराब झालं होतं म्हणून... तू बघितलस तर पावसानंतर राफ लगेच ढेपाळला नाही. जसं कोर्ट ओलं होत होतं तश्या त्याच्या हालचाली मंदावत होत्या...

असो जिंकला हे महत्त्वाचं...

बाकी त्रिविक्रम उर्फ विक्रमकाका उर्फ विक्रमसिंह दिसले तर त्यांना सांगा मला संपर्क साधा पार्टीचं बोलावणं करायचं आहे. Proud

(सुमंगल ताई फिरकल्या नाहीत अजिबात ह्यावेळी!)

Men's फायनल अगदीच थोडी पाहिली ...आज दाखवली का?

पराग मोनिका DWTS मध्ये येऊन गेली . मला वाट्त सर्वात पहिले की दुसरीच बाद झाली..यावेळी Martina N होती ..लगेच गेली ...:P

विक्रमसिंह दिसले तर त्यांना सांगा मला संपर्क साधा पार्टीचं बोलावणं करायचं आहे.>> आहे, आहे. Happy
जरा उशीराच , पण क्वांग्राटस. हिरवळीवर भेटूच.

Pages