समुद्र - १ : किनारा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अरे हो हो..
ही आपली सामायिक वहिवाटीची जागा आहे
हे मान्य..
तू इथंच आत-बाहेर असतोस
हे मान्य..
मी इतक्या लांबून कधी कधीच इथं येते
हे ही मान्य..
पण म्हणून मी इथं विसावलेली असताना
तू असं अवचित इथंच झेपावावंस..
तेही तुझ्या भरतीच्या वेळा, आवेग आणि प्रवाह बदलून?
चुकीचं नाही का हे?
नाही ना..
बरं.. हेही मान्यच.. Happy

विषय: 
प्रकार: 

Happy

बरं.. हेही मान्यच.. >>>>

शेवटी त्याच्या समोर तुम्हीही मान तुकवलीच ना!

समुद्र - १ >>> म्हणजे सीरीज येणार आहे का?

श्यामली होय.. दे की.. वाट पहातेय..
(टिंबं दिली की साहित्तिक मूल्य वाढतं लिखाणाचं म्हणून दिलेयत. Happy )